Yashwantrao Chavan Centre

Yashwantrao Chavan Centre NGO founded in 1985 aiming to create equal opportunities for all individuals for a progressive and prosperous society. | Serving With Trust and Excellence.
(1)

Yashwantrao Chavan Centre, a Public Charitable Trust, was registered in September, 1985, under Bombay Public Trusts Act. The main objective of forming this Trust was to perpetuate the memory of late Shri Yashwantrao Chavan, who made outstanding and invaluable contribution to India’s socio-political life, particularly to the betterment of the common man’s life. In the last 30+ years Chavan Centre has emerged as a leading organization which provides platform for constructive discussion on socio-economic issues. These discussions lead to innovative field action programmes for awareness, betterment of social services and advocacy. The activities of the Chavan Centre are carried out from the Chavan Center across the Maharashtra.

चला, आपण सगळ्यांनी मिळून आठवणी विसरणाऱ्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी समजूतदार, प्रेमळ आणि समावेशक समाज घडवूया.
21/09/2026

चला, आपण सगळ्यांनी मिळून आठवणी विसरणाऱ्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी समजूतदार, प्रेमळ आणि समावेशक समाज घडवूया.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान' घोषित करण्यात आले. एकूण सहा...
21/09/2026

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान' घोषित करण्यात आले. एकूण सहा ज्येष्ठ नागरिकांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच 'यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघ आणि संस्था राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान' देखील घोषित करण्यात आले. हा कृतज्ञता सन्मान दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ रोजी चव्हाण सेंटर, मुंबई येथे होणार आहे.

महिला विभागातून नवी मुंबई (रायगड) येथील वृषाली मगदुम आणि नांदेड येथील भागीरथी बच्चेवार यांची निवड करण्यात आली आहे. पुरुष विभागातून लातूर येथील प्रकाश घादगिने व ठाणे येथील बबन पाटणकर यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे, तर दिव्यांग प्रवर्गातून पुणे येथील मानव कांबळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

तसेच 'यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघ आणि संस्था राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान' अंतर्गत सन्मानार्थी संघ म्हणून जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील ज्येष्ठ नागरिक संघ आणि सन्मानार्थी संस्था म्हणून पुणे येथील जनसेवा फाउंडेशन यांची निवड करण्यात आली आहे.

सेवानिवृत्त झाल्यानंतर, आपल्या अनुभवाच्या जोरावर समाजाभिमुख कार्य करणारे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत. जे कोणत्याही स्वार्थाशिवाय कार्य करीत आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान व्हावा हा सेंटरचा उद्देश आहे.

सन्मानाचे स्वरूप रोख रक्कम, सन्मान चिन्ह आणि मानपत्र असे आहे. सर्वांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!

18/09/2026

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे 'परिवर्तनवादी चळवळीचा नायक प्रा. विलास वाघ' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहिले. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिल्या जाणाऱ्या शरद पवार इन्स्पायर फेलोशिप अंतर्गत फेलो राहिलेल्या गणेश उफाडे यांनी हे पुस्तक लिहिले आहे. प्रा. विलास वाघ यांचे कार्य जाणून घेण्यासाठी मधूश्री पब्लिकेशनने प्रकाशित केलेले हे पुस्तक नक्की वाचा!

Yashwantrao Chavan Centre

17/09/2026
17/09/2026

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा आणि त्यांचे कार्य अखंडितपणे सुरु रहावे या विचारातून दिवंगत एस. एम जोशी, स्व. वसंतदादा पाटील यांच्यासह आदरणीय पवार साहेब यांच्या पुढाकारातून इतर सहकाऱ्यांच्या साथीने 17 सप्टेंबर 1985 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची म्हणजेच आत्ताच्या यशवंतराव चव्हाण सेंटरची ( Yashwantrao Chavan Centre ) स्थापना झाली. संस्थेच्या स्थापनेला आज 41 वर्षे पुर्ण झाली. या चार दशकांच्या काळात संस्थेने शिक्षण, आरोग्य,सहकार,सामाजिक न्याय, सांस्कृतिक, कृषी, युवक कल्याण, आदिवासी विकास, साहित्य-संस्कृती अशा विविध क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करीत स्व. चव्हाण साहेबांच्या विचारांचा वसा आणि वारसा जपण्याचे काम उत्तमरीतीने केले आहे. 'विश्वासार्ह सर्वोत्तम सेवा' हे या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. याला अनुसरुन आधुनिक, समृद्ध समाजाच्या निर्मितीसाठी सर्व घटकांना समान संधी निर्माण करुन देण्याचा दृष्टीकोन संस्थेने सदैव बाळगला आहे. याच भूमिकेतून गेली चार दशके आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था काम करीत आहे. यापुढेही स्व. चव्हाण साहेबांच्या विचारांचा कृतीशील वारसा पुढे घेऊन जाण्याच्या भूमिकेतून 'यशवंतराव चव्हाण सेंटर' सदैव काम करीत राहील असा मला विश्वास आहे. चव्हाण सेंटरचे सर्व पदाधिकारी, सहकारी आणि कार्यकर्त्यांना वर्धापनदिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.

"यशवंतराव चव्हाण सेंटरचा ४१ वा वर्धापन दिवस"आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वार...
17/09/2026

"यशवंतराव चव्हाण सेंटरचा ४१ वा वर्धापन दिवस"

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा व त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी स्व. वसंतदादा पाटील, दिवंगत एस.एम. जोशी यांच्यासह मा. शरदचंद्रजी पवार यांनी पुढाकार घेऊन सहकाऱ्यांना एकत्र येऊन १७ सप्टेंबर १९८५ रोजी "यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान"ची स्थापना केली. आज ते "यशवंतराव चव्हाण सेंटर" म्हणून ओळखले जाते. आज यशवंतराव चव्हाण सेंटरला ४१ वर्षे पूर्ण होत आहेत. स्थापनेपासून ही संस्था शिक्षण, युवा, आरोग्य, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, कृषी, सहकार,राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक न्याय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहे. ही संस्था धर्मनिरपेक्ष, पक्षनिरपेक्ष आणि लोकशाही विचारांचे व्यासपीठ आहे. येथे विविध क्षेत्रातील विचारवंत, तज्ज्ञ, जाणकार माणसं एकत्र येतात, विविध विषयांवर चर्चा करतात आणि त्या चर्चेतून महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासाला दिशा देणारी धोरणे आखतात.

यशवंतराव चव्हाण सेंटरचे कार्य पुढे नेण्यासाठी काम करत असलेले सर्व विश्वस्त, पदाधिकारी, सहकारी, सहयोगी संस्था व हितचिंतकांचे यानिमित्ताने मनापासून आभार.

"विश्वासार्ह सर्वोत्तम सेवा" हे ब्रीदवाक्य घेऊन "आधुनिक आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीकरिता सर्व घटकांना समान संधी निर्माण करून देणे" हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चव्हाण सेंटर कार्यरत आहे.

स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सम्यक आणि समग्र दृष्टिकोनावर चालण्याची भूमिका घेऊन ठामपणे व दृढपणे संस्था यापुढे वाटचाल करत राहील.

सर्व सहकारी व कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

बालकवी आणि बहिणाबाईंचा निसर्गकाव्याचा वारसा समर्थपणे चालवणारे ना. धों. महानोर यांनी तब्बल ६० वर्षे शब्दांच्या माध्यमातून...
16/09/2026

बालकवी आणि बहिणाबाईंचा निसर्गकाव्याचा वारसा समर्थपणे चालवणारे ना. धों. महानोर यांनी तब्बल ६० वर्षे शब्दांच्या माध्यमातून निसर्गाची भाषा बोलली आणि वाचक-रसिकांना आपल्या काव्यसृष्टीने वेड लावले. पळसखेडच्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या महानोरांचे शिक्षण तुटले आणि ते शेतीत रमले; पण याच मातीच्या कुशीत त्यांच्या अद्भुत काव्यप्रतिभेला बहर आला. निसर्ग आणि स्त्री ही त्यांच्या कवितेची केंद्रस्थाने होती. त्यांच्या काव्यात निसर्गाच्या विविध गंधांसोबतच, त्याच्या स्पर्शाने फुललेला शृंगार आणि कृषिसंस्कृतीतील उत्कट वेदना-संवेदना ओथंबून वाहतात.

‘जैत रे जैत’ सारख्या चित्रपटातील अजरामर गाण्यांपासून ते ‘रानातल्या कविता’, 'अजिंठा’ हे खंडकाव्य आणि ‘पळसखेडची गाणी’, ‘वही’ या लोकसाहित्य संग्रहांपर्यंत त्यांनी मराठी साहित्याला समृद्ध केले. काव्यासोबतच ‘गांधारी’ कादंबरी आणि व्यक्तिचित्रणात्मक ललित लेखनातून त्यांनी आपली अष्टपैलू प्रतिभा सिद्ध केली. महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार, पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी योगदान दिले. आज १६ सप्टेंबर, त्यांच्या जयंतीदिनी, मातीचा गंध जपणारी त्यांची ‘हिरवी बोली’ प्रत्येक रसिकाच्या हृदयात सदैव जिवंत राहील.

यशवंतराव चव्हाण सेंटरचे 'यशवंत संवाद' हे जुलै - ऑगस्ट या महिन्यांचा आढावा घेणारे द्वैमासिक वाचकांसाठी डिजिटल स्वरूपात ऑन...
13/09/2026

यशवंतराव चव्हाण सेंटरचे 'यशवंत संवाद' हे जुलै - ऑगस्ट या महिन्यांचा आढावा घेणारे द्वैमासिक वाचकांसाठी डिजिटल स्वरूपात ऑनलाईन उपलब्ध आहे. यामध्ये यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमांचा आढावा आहे. हा अंक वाचण्यासाठी चव्हाण सेंटरच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वेबसाईट लिंक-
https://chavancentre.org/media-page/e-magazine/sep-2026

Address

General Jagannathrao Bhosle Marg
Mumbai
400021

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yashwantrao Chavan Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Yashwantrao Chavan Centre:

Shortcuts

Share