29/05/2026
नीरा गावात एक छोटी रूम रेंट वर घेऊन हळूहळू Equibridge चं ऑफीस सेट करतोय. त्यासाठी लागणारं फर्निचर काही दिवसांपूर्वी अरविंद सरांनी दिलं. फर्निचर आल्यावर सर्वात आधी पुस्तकांचं कपाट लावलं. गावातल्या मुला-मुलींसोबत वाचन कट्टा सुरू करायचा आहे. आज नकळत त्याची सुरुवात गल्लीतल्या दोन मुलींनी केली. एक साधू वाचतेय तर एक की की कीटक... काय भारी वाटतंय सांगू. ❤️