Utkarsha Mandal Vile Parle

Utkarsha Mandal Vile Parle NGO and Social Service. Initiative for helping society in multiple areas

जे जे आपणास ठावे, ते दुसऱ्यासी देई,शहाणे करुन सोडी, सकळं जना,तोची गुरु खरा, आधी चरण तयाचे धरा,गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!...
29/07/2026

जे जे आपणास ठावे, ते दुसऱ्यासी देई,
शहाणे करुन सोडी, सकळं जना,
तोची गुरु खरा, आधी चरण तयाचे धरा,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा! 🙏🏻

भक्तीचा सुगंध दरवळू दे, विठ्ठल नामाचा जयघोष घुमू दे, आनंद आणि समाधानाने जीवन फुलू दे. आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!🙏🏻      ...
25/07/2026

भक्तीचा सुगंध दरवळू दे, विठ्ठल नामाचा जयघोष घुमू दे, आनंद आणि समाधानाने जीवन फुलू दे. आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!🙏🏻

24/07/2026

नमस्कार 🙏🏻

अुत्कर्ष मंडळ विलेपारले च्या पुढाकाराने आणि म. ल. डहाणूकर वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त) राष्ट्रीय सेवा योजना यांच्या सहकार्याने पालघर जिल्ह्यातील कोलीमसरोवर, वाडा येथे वृक्षारोपण उपक्रम उत्साहात पार पडला.

या उपक्रमात ४६ राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वृक्षारोपणाचा अनुभव मिळाला तसेच पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे महत्त्व, निसर्गाप्रती जबाबदारी आणि सांघिक कार्य याविषयी मौल्यवान शिकवण मिळाली.

या उपक्रमामध्ये १४० हून अधिक रोपांची लागवड करण्यात आली.

या प्रसंगी मंडळाचे पदाधिकारी तसेच महाविद्यालया चे प्राध्यापक हयांनी विद्यार्थ्यांसोबत श्रमदान करून वृक्षारोपणात सहभाग घेतला. त्यांच्या उत्साहाने आणि मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आणि हा उपक्रम अधिक अर्थपूर्ण ठरला.

या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व स्वयंसेवकांचे, मान्यवरां

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच न्याय, समता आणि बंधुतेचा अनोखा संगम! त्यांच्या विचारांनी लाखो लोकांचे जीवन उजळवले, अन्याया...
14/04/2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच न्याय, समता आणि बंधुतेचा अनोखा संगम! त्यांच्या विचारांनी लाखो लोकांचे जीवन उजळवले, अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ दिलं. दरवर्षी १४ एप्रिल रोजी साजरी होणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे फक्त एक स्मरण दिन नव्हे, तर हा दिवस आहे प्रेरणेचा, परिवर्तनाचा आणि आत्मपरीक्षणाचा. भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांनी केवळ कायदे बनवले नाहीत, तर प्रत्येक वंचित घटकाला आपलं हक्काचं स्थान दिलं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!🙏🏻
#जयभीम #बाबासाहेब_आंबेडकर #जयंती #महामानव #भारतरत्न

✨ श्री राम नवमीच्या पावन पर्वाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🙏🏻✨   🚩
26/03/2026

✨ श्री राम नवमीच्या पावन पर्वाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🙏🏻✨
🚩

अुत्कर्ष मंडळ विलेपारले तर्फे श्री महागणपती रुग्णालय, टिटवाळा येथे वैद्यकीय उपकरणांचे वितरण.नमस्कार,'सेवा परमो धर्म:'याच...
21/03/2026

अुत्कर्ष मंडळ विलेपारले तर्फे श्री महागणपती रुग्णालय, टिटवाळा येथे वैद्यकीय उपकरणांचे वितरण.

नमस्कार,
'सेवा परमो धर्म:'
याच भावनेतून टिटवाळा येथे सामाजिक बांधिलकीतून उभारलेल्या 'श्री महागणपती रुग्णालयाला' अुत्कर्ष मंडळा तर्फे अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे देऊन सहाय्य करण्यात आले. 🩺✨
अलिकडेच मंडळाच्या कार्यवाहांनी या रुग्णालयाला सदिच्छा भेट दिली आणि तेथील आरोग्य सुविधांची पाहणी केली. रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी, या हेतूने मंडळाने दिलेली ही उपकरणे रुग्णालयासाठी उपयुक्त ठरत आहेत.

📢 दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित सराव परीक्षा २०२५-२६: अुत्कर्ष मंडळ विलेपारले चा यशस्वी उपक्रम! ✍️​नमस्कार,​दहावीच्या...
21/03/2026

📢 दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित सराव परीक्षा २०२५-२६: अुत्कर्ष मंडळ विलेपारले चा यशस्वी उपक्रम! ✍️

​नमस्कार,
​दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित विषयाचा सराव हा अत्यंत गरजेचा आहे. त्यांना गणित विषयात चांगले गुण मिळावेत व त्यांचा पुरेसा सराव व्हावा, यासाठी अुत्कर्ष मंडळ विलेपारले तर्फे एक विशेष सराव परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मंडळ हा उपक्रम गेली ३ वर्षे चालवत आहे.

उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये:
📝 विषय: गणित - १ व गणित - २
​📍 सहभागी शाळा:
पार्ल्यातील दीक्षित रोड महानगरपालिका शाळा, नित्यानंद शाळा, GMES शाळा आणि पार्ल्याबाहेरील इतर ७ शाळांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.

​📊 विद्यार्थी संख्या: एकूण ८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा लाभ घेतला.

✅ विद्यार्थ्यांचे पेपर्स अनुभवी Moderators कडून तपासून पुन्हा विद्यार्थ्यांना देण्यात आले, जेणेकरून त्यांना आपल्या चुका समजतील.
✅ केवळ परीक्षाच नाही, तर विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञ Moderators चे विशेष मार्गदर्शन व्याख्यान (Lecture) देखील आयोजित करण्यात आले होते.

नमस्कार,🙏🏻✨​आज चैत्र प्रतिपदा! आजपासून आपल्या मराठी नववर्षाची सुरुवात होत आहे. अुत्कर्ष मंडळ विलेपारले च्या वतीने, आपल्य...
19/03/2026

नमस्कार,🙏🏻✨

​आज चैत्र प्रतिपदा! आजपासून आपल्या मराठी नववर्षाची सुरुवात होत आहे. अुत्कर्ष मंडळ विलेपारले च्या वतीने, आपल्या सर्व सन्माननीय सदस्यांना आणि विलेपार्लेकरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🏻💐

​हे नवीन वर्ष आपल्या सर्वांसाठी:
🔹 अपार यश घेऊन येवो 🏆
🔹 आरोग्यदायी असो 💪🏼
🔹 आनंदाने आणि समृद्धीने भरलेले असो 💰🎁

​ *उंच गुढी, नवा उत्साह आणि नव्या जोमाने आपण आपल्या मंडळाच्या कार्याला आणखी पुढे नेऊया. आपल्या सर्वांचे सहकार्य सदैव मिळो, हीच इच्छा.*

​ *नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!*
​— अुत्कर्ष मंडळ विलेपारले.

📢 विशेष भेट: सुभाष रोड अभ्यासिका - विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 📖नमस्कार,माजी नगरसेवक श्री. अभिजित सामंत यांच्या...
17/03/2026

📢 विशेष भेट: सुभाष रोड अभ्यासिका - विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 📖
नमस्कार,

माजी नगरसेवक श्री. अभिजित सामंत यांच्या प्रयत्नातून मनपा ने बांधलेली सुभाष रोड येथील अभ्यासिका गेली दीड वर्षे कार्यान्वित असून, त्याला विद्यार्थ्यांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे. या अभ्यासिकेचा दैनंदिन खर्च आणि देखभाल अुत्कर्ष मंडळ विलेपारले करीत आहे.

अलिकडेच भारतीय जनता पक्ष मुंबई चे अध्यक्ष श्री. अमित साटम यांनी अभ्यासिकेस भेट दिली. ह्या प्रसंगी आपले लोकप्रिय आमदार श्री पराग अळवणी, नगरसेविका सौ.अंजली सामंत, माजी नगरसेवक श्री. अभिजित सामंत आणि मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवाव्रती पुरस्कार २०२५
17/03/2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवाव्रती पुरस्कार २०२५

Address

Malaviya Road, Utkarsha Mandal Chowk, Vile Parle East
Mumbai
400057

Opening Hours

Monday 2:30pm - 7:30pm
Tuesday 2:30pm - 7:30pm
Wednesday 2:30pm - 7:30pm
Thursday 2:30pm - 7:30pm
Friday 2:30pm - 7:30pm
Saturday 2:30pm - 7:30pm

Telephone

+919372421174

Alerts

Be the first to know and let us send you an email when Utkarsha Mandal Vile Parle posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Utkarsha Mandal Vile Parle:

Shortcuts

Share