18/08/2026
निसर्ग संवर्धनाचा वसा जपत नेचर फ्रेन्ड सोसायटी (NFS), पनवेल या संस्थेचा १० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
निसर्ग, वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनासाठी गेल्या १० वर्षांपासून कार्यरत असलेल्या नेचर फ्रेन्ड सोसायटी (NFS), पनवेल या संस्थेचा १० वा वर्धापन दिन सोहळा सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी पळस्पे-पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला.
१० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात संस्थेच्या गेल्या १० वर्षांतील विविध समाजोपयोगी तसेच निसर्ग व वन्यजीव संवर्धनाच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. संस्थेच्या कार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. मंगेश वाकडीकर हे प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर श्री. गणेश दिघे (वनपाल, पनवेल), श्री. संतोष उदरे (संस्थापक-अध्यक्ष, नेचर फ्रेन्ड सोसायटी (NFS), पनवेल), श्री. रमेश हुद्दार (माजी सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत नांदगाव), श्री. कुणाल नाईक (श्री रामा डेव्हलपर्स), श्री. वैभव कुलकर्णी (ज्येष्ठ सर्पमित्र), श्री. मयूर नाईक (सुप्रसिद्ध गायक), श्री. निखिल भोपळे (फाउंडर, ग्रीन वर्क ट्रस्ट), श्री. घनश्याम गवंडी (सहायक पोलीस निरीक्षक), श्री. अशोक निकम (सदस्य, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती), सौ. अश्विनी फडके (सदस्य, वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र), श्री. जनार्दन चिखलेकर (मुख्याध्यापक, छत्रपती शिवाजी विद्यालय, पळस्पे), श्री. लहू पांडुरंग तातरे (मुख्याध्यापक, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके माध्यमिक विद्यालय, शिरढोण), सौ. अनुपमा कासारे (मुख्याध्यापक, रा. जि. प. शाळा, मोठे भिंगार) आणि श्री. सुनील साळवी सर (मुख्याध्यापक, रा. जि. प. शाळा, नांदगाव) यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
या १० व्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेतर्फे नागपंचमीच्या निमित्ताने ‘सर्प’ या विषयावर निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत चार शाळांमधील इयत्ता पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
रायगड जिल्हा परिषद शाळा, नांदगाव
1. प्रथम क्रमांक – आकांक्षा किरण हुदार
2. द्वितीय क्रमांक – आरोही रंजित खटले
3. तृतीय क्रमांक – स्विटी अखिलेश भारती
छत्रपती शिवाजी विद्यालय, पळस्पे
1. प्रथम क्रमांक – दानिश खान
2. द्वितीय क्रमांक – नेहा राजेश म्हात्रे
3. तृतीय क्रमांक – भास्कर अनुज चौधरी
रायगड जिल्हा परिषद शाळा, मोठे भिंगार
1. प्रथम क्रमांक – प्रिषा हेमंत कोंडिलकर
2. द्वितीय क्रमांक – धनश्री प्रकाश पाटील
3. तृतीय क्रमांक – श्रेया रविंद्र शेंद्रे
आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके माध्यमिक विद्यालय, शिरढोण
1. प्रथम क्रमांक – स्नेहा शेखर कांबळे
2. द्वितीय क्रमांक – ऋत्विज सुशांत वेदक
3. तृतीय क्रमांक – पार्थ गुरुनाथ म्हात्रे
या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. तसेच श्री. जीवन कोंडिलकर यांच्या उल्लेखनीय व जीवनदायी सेवाकार्याबद्दल त्यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. संतोष उदरे यांनी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची तसेच संस्थेच्या माध्यमातून रेस्क्यू करण्यात आलेल्या वन्यजीवांची माहिती दिली. यावेळी त्यांनी वन्यजीव रेस्क्यू ऑपरेशनची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. तसेच वन्यजीव रेस्क्यू करताना सर्पमित्रांना येणाऱ्या विविध समस्या व अडचणींबाबतही त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. मंगेश वाकडीकर (रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष) यांनी संस्थेच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देत संस्थेच्या कार्याचे कौतुक करून अभिनंदन केले. संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना संस्थेला आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच सर्व सन्मानित कार्यकर्ते आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
श्री. गणेश दिघे (वनपाल, पनवेल) यांनीही संस्थेच्या कार्याचे कौतुक करत वनविभागाकडून आवश्यक ती मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच उपस्थित इतर सर्व मान्यवरांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.