Ankur Samajik Sanstha, Navi Mumbai

Ankur Samajik Sanstha, Navi Mumbai Ankur - NGO of committed members who dream for a green earth with their relentless efforts.

We council and guide society, school, individual on how can one achieve the target of zero waste, thereby reducing our carbon footprints.

01/05/2026
आपल्याला नको असलेली वस्तू कुणासाठी तरी खूप मौल्यवान ठरू शकते…3R म्हणजेच Reduce, Reuse, Recycle या संकल्पनेला अंगीकारुन अ...
26/04/2026

आपल्याला नको असलेली वस्तू कुणासाठी तरी खूप मौल्यवान ठरू शकते…

3R म्हणजेच Reduce, Reuse, Recycle या संकल्पनेला अंगीकारुन अंकुर सामाजिक संस्था तर्फे उलवे येथे 25 एप्रिल 2026 रोजी डोनेशन ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमाला स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मनापासून सहभाग नोंदवला. कपडे, पुस्तके, स्टेशनरी,खेळणी आणि इतर उपयोगी वस्तू देऊन अनेकांनी गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला.

हा उपक्रम केवळ वस्तू देण्यापुरता मर्यादित नसून, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणारा आहे .

आपल्या छोट्याशा योगदानातून कुणाच्या चेहऱ्यावर आनंद फुलू शकतो… चला, 3R चा अवलंब करूया आणि समाजासाठी एक पाऊल पुढे टाकूया! बदल घडवू या.

स्त्री ही शक्ती, श्रद्धा आणि प्रेरणेचाअखंड स्रोत आहे.तिच्या कर्तृत्वाने तीजगाला प्रेरणा देत आहे.अशा कर्तृत्ववान महिलांना...
08/03/2026

स्त्री ही शक्ती, श्रद्धा आणि प्रेरणेचा
अखंड स्रोत आहे.

तिच्या कर्तृत्वाने ती
जगाला प्रेरणा देत आहे.

अशा कर्तृत्ववान महिलांना
मनःपूर्वक सलाम!

✨ जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨

दि. 1 मार्च रोजी अंकुर सामाजिक संस्थेच्यावतीने उलवे, नवी मुंबई येथे लहान मुलाकरीता होळीसाठी ऑरगॅनिक रंग तयार करण्याचे वर...
01/03/2026

दि. 1 मार्च रोजी अंकुर सामाजिक संस्थेच्यावतीने उलवे, नवी मुंबई येथे लहान मुलाकरीता होळीसाठी ऑरगॅनिक रंग तयार करण्याचे वर्कशॉप उत्साहात पार पडला.

या कार्यशाळेत मुलांनी नैसर्गिक फुले, हळद, बीटरूट, पालक इत्यादी सुरक्षित घटकांचा वापर करून स्वतः होळीचे रंग तयार केले. ह्यावेळी पर्यावरणपूरक होळी कशी साजरी करावी, रासायनिक रंगांपासून कसे दूर राहावे याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

मुलांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला आणि “पर्यावरणपूरक व सुरक्षित होळी”चा संदेश सगळ्यांना देण्याचे वचन दिले.

अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण होत असून, सुरक्षित व पर्यावरणपूरक सण साजरा करण्याची प्रेरणा मिळते.

चला, ही होळी ऑरगॅनिक रंगांसह आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करूया.



मकर संक्रांतीच्या शुभदिनी अंकुर सामाजिक संस्थे तर्फे उरण तालुक्यातील विंधणे गावातील ग्रामस्थांना Dry Waste Collection सं...
15/01/2026

मकर संक्रांतीच्या शुभदिनी अंकुर सामाजिक संस्थे तर्फे उरण तालुक्यातील विंधणे गावातील ग्रामस्थांना Dry Waste Collection संदर्भात माहिती देण्यात आली. गावातर्फे प्लास्टिक, कागद, पॅकेजिंग मटेरियल यांसारख्या कोरड्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व पुनर्वापर करण्याबाबत चर्चा झाली.

पर्यावरण रक्षणासाठी कचरा वेगळा करण्याची सवय आणि रिसायकल होणारा कचरा योग्य ठिकाणी पोहोचवणे ही आजची गरज आहे. या उपक्रमात ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग घेतला व पुढील कार्यासाठी सहकार्याची हमी दिली.

कचऱ्याचे योग्य विभाजन व रिसायकलिंग हे केवळ स्वच्छतेसाठी नाही, तर भावी पिढ्यांसाठी पर्यावरणाचं देणं जपण आहे. विंधणे ग्रामस्थांचा उत्साह आणि सकारात्मक सहभाग पाहून नवी ऊर्जा मिळाली.
छोट्या पावलांनी मोठा बदल घडवता येतो — हाच या उपक्रमाचा विश्वास!

पर्यावरणासाठी एक पाऊल — स्वच्छ गाव, हिरवे गाव 🌱

अंकुर सामाजिक संस्था
(उरण — विंधणे)

#स्वच्छगावहिरवेगाव #स्वच्छभारत #विंधने

अंकुर सामाजिक संस्थेतर्फे आज कपडे आणि खेळण्यांच्या donation drive चे यशस्वी आयोजन करण्यात आले.या उपक्रमात सहभागी होऊन सह...
11/01/2026

अंकुर सामाजिक संस्थेतर्फे आज कपडे आणि खेळण्यांच्या donation drive चे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य करणाऱ्या सर्व दात्यांचे व स्वयंसेवकांचे मनापासून आभार.
आपले योगदान समाजासाठी प्रेरणादायी आहे 🙏

Address

Navi Mumbai (New Mumbai)
400706

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ankur Samajik Sanstha, Navi Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Ankur Samajik Sanstha, Navi Mumbai:

Share