Prabodh Vasant Davkhare

Prabodh Vasant Davkhare Working for social progress, youth empowerment, and community welfare. Entrepreneur, philanthropist, and public servant committed to positive change.

“सत्य, अहिंसा आणि स्वच्छता... हीच भारताची खरी ताकद!”  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांनी देशाला स्वातंत्र्याचा ...
02/10/2026

“सत्य, अहिंसा आणि स्वच्छता... हीच भारताची खरी ताकद!”

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांनी देशाला स्वातंत्र्याचा आणि एकात्मतेचा मार्ग दाखवला. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस आणि विचारांना विनम्र आदरांजली!

“Truth, non-violence, and
cleanliness are the true pillars of our nation.”

Remembering the Father of
the Nation, Mahatma Gandhi, on his birth anniversary. His ideals of peace, harmony, and simplicity continue to guide and inspire us all.

#सत्यआणिअहिंसा #महात्मागांधी

अग्निवीरांसाठी महाराष्ट्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय! अग्निवीरांना पोलीस आणि तत्सम शासकीय पदांवर समावून घेण्यासाठी अनेक...
01/10/2026

अग्निवीरांसाठी महाराष्ट्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय!

अग्निवीरांना पोलीस आणि तत्सम शासकीय पदांवर समावून घेण्यासाठी अनेक दिलासादायक बदल.


संकटाच्या काळात बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे... राष्ट्रवादी काँग्रेस - महायुती सरकार! राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील २६४ ...
29/09/2026

संकटाच्या काळात बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे... राष्ट्रवादी काँग्रेस - महायुती सरकार!

राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील २६४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करून सरकारने शेतकऱ्यांसाठी तातडीने उपाययोजना लागू केल्या आहेत:
• जमीन महसुलात सूट व कर्जवसुलीस स्थगिती
• वीजबिलात सवलत व वीज जोडणी सुरळीत ठेवण्याचे निर्देश
• परीक्षा शुल्कमाफी, चारा व पाण्याचे काटेकोर नियोजन

शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, हाच सरकारचा निर्धार!

जनसेवेचा ध्यास, विकासाची दृष्टी आणि जनतेशी थेट जोडलेली नाळ…!आदरणीय अजितदादा आज आपल्यात प्रत्यक्ष उपस्थित नाहीत ही उणीव आ...
29/09/2026

जनसेवेचा ध्यास, विकासाची दृष्टी आणि जनतेशी थेट जोडलेली नाळ…!

आदरणीय अजितदादा आज आपल्यात प्रत्यक्ष उपस्थित नाहीत ही उणीव आणि खंत प्रत्येक क्षणी मनाला चटका लावून जाते. दादांचे कणखर नेतृत्व, कामाचा प्रचंड उरक, शिस्तबद्ध कार्यशैली आणि विकासाची दूरदृष्टी आजही आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या हृदयात दीपस्तंभासारखी तेवत आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहण्याची त्यांची शिकवण आपल्याला प्रत्येक पाऊल पुढे टाकताना नवी ऊर्जा आणि प्रेरणा देते.

दादांनी आयुष्यभर घालून दिलेले जनसेवेचे संस्कार हृदयात घट्ट जपत, त्यांनी दाखवलेल्या मार्गावर अविरत चालत राहणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. सर्व घटकांच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अखंड कार्यरत राहून, दादांचे स्वप्न पूर्ण करत ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी’ नव्या ताकदीने आणि निष्ठेने पुढे घेऊन जाण्याचा आमचा ठाम संकल्प आहे.

आदरणीय दादांच्या पावन स्मृतीस आणि त्यागास त्रिवार वंदन!

— प्रबोध वसंतराव डावखरे
युवा नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

दादा, तुमची उणीव प्रत्येक क्षणी जाणवते…!राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री मा.ना. श्रीम...
28/09/2026

दादा, तुमची उणीव प्रत्येक क्षणी जाणवते…!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री मा.ना. श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी आज विद्या प्रतिष्ठान, बारामती येथे आदरणीय अजितदादांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक होत त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले.

आदरणीय दादांना आपल्यातून जाऊन आज आठ महिने पूर्ण झाले, तरीही जनतेच्या मनातील त्यांचे स्थान अढळ आहे. त्यांनी दिलेली शिकवण, विकासाचा ध्यास, सर्वसामान्यांसाठी अखंड झटण्याची वृत्ती आणि माणुसकीची घट्ट नाती आजच्या घडीला आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी दीपस्तंभासारखी मार्गदर्शक आहेत.

दादांचे विचार आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मा.वहिनींच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत.

आदरणीय दादांच्या पवित्र स्मृतीस माझे विनम्र अभिवादन!

- प्रबोध वसंतराव डावखरे
युवा नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

🙏 श्री गणेशाय नमः! गणपती बाप्पा मोरया! 🙏दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी ठाण्यातील सिद्धिविनायक मित्र मंडळाला भेट देऊन श्री गणर...
26/09/2026

🙏 श्री गणेशाय नमः! गणपती बाप्पा मोरया! 🙏

दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी ठाण्यातील सिद्धिविनायक मित्र मंडळाला भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. मंडळाच्या २३ व्या वर्षानिमित्त आयोजित श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाच्या मंगलमय सोहळ्यात सहभागी होण्याचे सौभाग्य लाभले.

बाप्पाच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना केली. मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏

– प्रबोध वसंतराव डावखरे

⸻

🙏 Ganpati Bappa Morya! 🙏

On 23rd September 2026, I visited Siddhivinayak Mitra Mandal, Thane, and sought the blessings of Shri Ganesh on the auspicious occasion of the Mandal’s 23rd anniversary. It was a privilege to be part of the Shri Satyanarayan Mahapuja and Mahaprasad ceremony.

Prayed for everyone’s happiness, good health, prosperity, and well-being. Heartfelt wishes to all the members and volunteers of the Mandal for continued success in their endeavours. 🙏

– प्रबोध वसंतराव डावखरे

संकटाच्या काळात बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परंपरा आहे. राज्यातील दुष्काळसदृश...
26/09/2026

संकटाच्या काळात बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परंपरा आहे. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत पिकांची पाहणी करणार आहेत. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी आम्ही कटिबद्ध आहोत!

#राष्ट्रवादी_काँग्रेस #बळीराजा

शासकीय योजना घराघरापर्यंत पोहोचवणारे राष्ट्रवादी काँग्रेस - महायुती सरकार! मा. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या ने...
24/09/2026

शासकीय योजना घराघरापर्यंत पोहोचवणारे राष्ट्रवादी काँग्रेस - महायुती सरकार!

मा. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली, ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत भटके-विमुक्त बांधवांसाठी विशेष शासकीय कागदपत्र शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

🗓️ दिनांक: २७ ते २९ सप्टेंबर २०२६
📍 शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एकाच ठिकाणी दाखल्यांचे सुलभ वाटप!

सर्व समाजबांधवांनी या शिबिरास आवर्जून उपस्थित राहून आपल्या हक्काचे दाखले मिळवावेत.

GovernmentSchemes

शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत विकासाचा रस्ता! ​आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक सुलभ करण्यासाठी ‘शेत सेतू’ महापाणंद ...
23/09/2026

शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत विकासाचा रस्ता!

​आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक सुलभ करण्यासाठी ‘शेत सेतू’ महापाणंद गतीशक्ती अभियानाचा शुभारंभ! डिजिटल मॅपिंगच्या माध्यमातून राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत होणार असून, प्रत्येक शेतकऱ्याला शेतापर्यंत हक्काचा रस्ता मिळणार.

Connecting every farm to development!

Empowering our farmers through modern technology with the launch of the ‘Shet Setu’ Mahapanand Gatishakti campaign! Through digital mapping, the state’s network of farm access roads will be strengthened, ensuring every farmer gets direct and reliable connectivity to their fields.

NCP

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prabodh Vasant Davkhare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share