11/03/2026
आनंदी शाळा उपक्रमांतर्गत टेंभूली जिल्हा परिषद शाळेत दोन नव्या वर्गखोल्यांचे हस्तांतरण 🎓🏫
दिनांक २४ फेब्रुवारी, जिल्हा परिषद केंद्र शाळा, टेंभूली येथे आनंदी शाळा उपक्रमांतर्गत दोन वर्गखोल्यांच्या हस्तांतरणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमासाठी Super Bond Adhesives Pvt. Ltd. तसेच Inner Wheel Club of Hiranandani Estate, Thane यांच्या आर्थिक सहभागातून पडीक व दुरवस्थेत असलेल्या वर्गखोल्यांचा संपूर्ण कायापालट करण्यात आला.
या कामांमध्ये नवीन बांधकाम, नवीन छत, नवीन दारे, संरक्षक जाळी, हवेशीर खिडक्या, लादी बसविणे तसेच संपूर्ण रंगकाम अशा विविध कामांचा समावेश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता स्वच्छ, सुरक्षित आणि आनंददायी वातावरणात शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
आनंदी शाळा उपक्रमांतर्गत अशा अनेक जिल्हा परिषद शाळांचे संपूर्ण नूतनीकरण करण्याचा Fandry Foundation चा निर्धार असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
On 24 February, a classroom handover ceremony for two renovated classrooms was successfully conducted at Zilla Parishad Central School, Tembhuli under the Anandi Shala Initiative.
With the financial support of Super Bond Adhesives Pvt. Ltd. and the Inner Wheel Club of Hiranandani Estate, Thane, the classrooms that were previously in a dilapidated and unused condition have been completely transformed.
The renovation work included new structural construction, new roofing, installation of new doors, protective grills, well-ventilated windows, new flooring, and complete painting of the classrooms.
Through the Anandi Shala Initiative, Fandry Foundation aims to renovate and transform many such Zilla Parishad schools. The foundation is committed to improving school infrastructure and providing rural students with a safe, clean, and inspiring learning environment.