28/05/2026
युवाशक्तीचा सामाजिक आविष्कार:
VSM तर्फे ‘Youth Social Camp २०२६’
चे आयोजन विद्यादान सहाय्यक मंडळ (VSM) तर्फे २९ ते ३१ मे २०२६ दरम्यान सरलांबे (शहापूर) येथे तीन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. केवळ करिअर नव्हे, तर समाज, पर्यावरण आणि शाश्वत विकासाची जाणीव युवकांमध्ये रुजवण्यासाठी हे शिबिर एक महत्त्वाचे पाऊल आहे.
शिबिराची वैशिष्ट्ये:
• वैविध्यपूर्ण सहभाग: राज्यभरातील कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, कृषी आणि वैद्यकीय क्षेत्रातील पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा सहभाग.
• वास्तववादी शिक्षण: "पुस्तकी ज्ञान आणि वास्तव जीवन" यांची सांगड घालणारी विशेष संवाद सत्रे.
• अनुभवाधारित उपक्रम: 'Step into Someone’s Shoes', 'Bridge the Gap' आणि 'Village Visit' याद्वारे ग्रामीण वास्तवाचा प्रत्यक्ष अनुभव.
• तज्ज्ञ मार्गदर्शक: अभिषेक आकोटकर (युवा आणि समाजकारण), स्वप्नील अधिकारी (शाश्वत शेती), आणि कैवल्य दांडेकर (राष्ट्रनिर्माण) यांसारख्या तज्ज्ञांशी संवाद.
अनुभवातून कृतीकडे...
या शिबिराचे समन्वयक वैभव सोनोने (माजी विद्यार्थी व कार्यकर्ता, VSM) हे आहेत. वैभव यांचा ३० हून अधिक शिबिरांच्या समन्वयाचा, परदेशातील शिक्षणाचा आणि मध्य भारतातील आदिवासी क्षेत्रातील ८ वर्षांच्या कामाचा प्रदीर्घ अनुभव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.
Vaibhav Vimal Ganesh