21/04/2026
महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल; विलासराव देशमुख फाउंडेशनतर्फे
प्रभाग क्र १७ मधील ७३ महिलांना शिलाई प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रदान.
विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने प्रभाग क्र. १७ मधील तुळजाभवानी नगर येथे सुरू करण्यात आलेल्या मोफत शिलाई प्रशिक्षण केंद्राचा यशस्वी समारोप सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या ७३ महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाने आणि ट्वेंटीवन ॲग्री लि.च्या संचालिका सौ.अदिती अमित देशमुख यांच्या पुढाकारतून हे प्रशिक्षण केंद्र चालवण्यात आले होते.
महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे आणि स्वयंरोजगाराची संधी मिळावी,या उद्देशाने फाउंडेशनने हा उपक्रम सुरू केला आहे.
या केंद्रात महिलांना ३ महिन्यांचे व्यावसायिक शिलाई प्रशिक्षण देण्यात आले.या प्रशिक्षणात शिलाईच्या विविध पद्धती,डिझाइनिंग आणि कटिंग यांसारख्या विषयांचे सखोल ज्ञान देण्यात आले.
प्रशिक्षक क्रांती उफाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या ७३ महिलांनी शिलाई कामातील सर्व कला आणि कौशल्ये आत्मसात केली.
या माध्यमातून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांचा प्रमाणपत्र वितरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाला विलासराव देशमुख फाउंडेशनच्या विभाग प्रमुख संगीता मोळवणे,माजी उप सरपंच अविनाश देशमुख,कविता वाडीकर,प्रवीण सूर्यवंशी-समनव्यक सोशल मीडिया प्रमुख,अभिषेक देशमुख,साक्षी घोटाळे,श्रीशैल्य गडगडे,काँग्रेस आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष-ॲड.शरद देशमुख,श्री.वाडीकर सर,प्रशिक्षक-क्रांती उफाडे,गजानन बोयणे,सोमनाथ कावळे यांच्यासह प्रशिक्षणार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
-—————————————