12/08/2026
💐🤝💐🤝💐🤝💐🤝💐🤝💐🤝
#अहमदपूर_आगाराच्या_नूतन_आगार_व्यवस्थापकांचा_इंटक_संघटनेच्या_वतीने_स्वागत_सत्कार
💐🤝💐🤝💐🤝💐🤝💐🤝💐🤝
दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अहमदपूर आगारात नव्याने रुजू झालेले आगार व्यवस्थापक माननीय श्री. नरसिंगजी निम्मनवाड साहेब यांचा महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या वतीने स्वागतपर सत्कार करण्यात आला.
श्री. नरसिंगजी निम्मनवाड साहेब यांनी नांदेड विभागातील बिलोली आगारातून विनंती बदलीने अहमदपूर आगारात नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या मागील सुमारे दहा वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी कर्मचारी, कर्मचारी संघटना आणि प्रशासन यांच्यात सलोख्याचे व सहकार्याचे संबंध कायम ठेवत कामगारांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. त्यांच्या या कार्यपद्धतीबद्दल यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
अहमदपूर आगारातील कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी व प्रश्न समजून घेऊन त्यावर नियमानुसार व न्याय्य पद्धतीने तोडगा काढावा, तसेच एस.टी. महामंडळाचे हित आणि कर्मचारी हित यांचा समतोल राखत आगाराचा कारभार पारदर्शक, सकारात्मक आणि सलोख्याच्या वातावरणात चालवावा, अशी सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली. प्रशासन आणि कर्मचारी संघटना यांच्यातील सकारात्मक संवादातून अहमदपूर आगाराच्या प्रगतीला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वासही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यावेळी राज्य सहसचिव इस्माईल पठाण यांनी नूतन आगार व्यवस्थापक श्री. निम्मनवाड साहेबांचे स्वागत करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. कर्मचारी हिताच्या प्रश्नांवर संघटना प्रशासनासोबत सकारात्मक संवाद ठेवून काम करेल, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.
या स्वागतपर कार्यक्रमास विभागीय उपाध्यक्ष सत्यवान औरादे, आगार अध्यक्ष प्रशांत ठाकूर, सचिव निसार पठाण, कार्याध्यक्ष उमेश पोपलायत, महिला संघटक इंद्रायणी सिरसाठ (जायभाये), सहसचिव प्रमोद कोल, सहसचिव रवी रुद्देवाड, भगवान गुंडवाड, पिराजी तोगरे,अवकाश माने, बालाजी महाके, श्रीकांत देवईबोने, सदूराम कांबळे, अमोल कामाळे, प्रशांत चारोळे, प्रकाश माळी, श्रीधर पदातुरे, चक्रधर फुलारी, वामन वाघमारे, गणेश दहिफळे आदी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नूतन आगार व्यवस्थापक श्री. नरसिंगजी निम्मनवाड साहेब यांच्या अनुभवी व सकारात्मक कार्यपद्धतीचा लाभ अहमदपूर आगाराला मिळून कर्मचारी हित, प्रवासी सेवा आणि महामंडळाच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
💐🤝💐🤝💐🤝💐🤝💐🤝💐