Samidha Pratishthan,Kolhapur

Samidha Pratishthan,Kolhapur Samidha Pratishthan, Kolhapur is a
Non - profit organization which been closely working with social issues in Kolhapur since 2004.

29/07/2026

#शिशु_विद्या_विहार मध्ये आज गुरुपौर्णिमेचा सोहळा अत्यंत भावूक आणि मांगल्याच्या वातावरणात पार पडला. या निमित्ताने शाळेत **'शिक्षक आणि मातृपूजन'** पार पडले.
आपल्या आईचे पूजन करताना चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा तो निरागस भाव आणि मनातील भक्ती इतकी ओसंडून वाहत होती की, ते दृश्य पाहून मातांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. सर्व मातांनीही आमच्या सर्व शिक्षिकांचे आदराने आणि यथोचित पूजन करून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
पूर्व-पहिलीच्या पालकांनी अतिशय सुंदर असा 'सुशोभन कट्टा' सजवला होता, ज्यामुळे संपूर्ण वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता आणि मांगल्य पसरले होते.

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक छोटासा प्रयत्न! 🌸श्री करवीर निवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्रीपूजक मंडळ...
17/07/2026

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक छोटासा प्रयत्न! 🌸

श्री करवीर निवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्रीपूजक मंडळ आणि समिधा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. गेली अनेक वर्षे सातत्याने राबविण्यात येणारा हा उपक्रम अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नवी उमेद आणि बळ देत आहे.
या समाजोपयोगी कार्याची विविध वृत्तपत्रांनी घेतलेली दखल ही सेवाभावाची आणि समाजाच्या विश्वासाची पावती आहे. शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याचे भविष्य उज्ज्वल व्हावे, हीच आई अंबाबाईच्या चरणी प्रार्थना.
"विद्यादान हेच श्रेष्ठ दान!" 🙏📖

गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी दप्तर अभियानाचा शेवट अतिशय गोड झाला. टोप येथील श्री शाहू युवक मंडळ,  संचलित कै. सौ. वत्स...
13/07/2026

गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी दप्तर अभियानाचा शेवट अतिशय गोड झाला. टोप येथील श्री शाहू युवक मंडळ, संचलित कै. सौ. वत्सलाबाई बापूसाहेब पाटील विद्या मंदीर आणि माध्यमिक विद्यालय या संस्थेबरोबर एक वेगळेच नाते निर्माण झाल्याचे जाणवले. दोन वर्षांपूर्वी ६०/७० च्या आसपास पट असलेल्या शाळेत आज २०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिकत असल्याचे पाहून सह कुटुंब २४ तास विद्यार्थ्यांना देणारे संस्थेचे सर्वेसर्वा श्री. अमित पाटील आणि मुख्याध्यापिका सौ. चव्हाण बाई यांचे कौतुक वाटले. आम्ही शाळेत पोहोचल्यापासून लहानग्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. बाईंनी सांगितल्याप्रमाणे शाळेच्या पहिल्या दिवसापासून मुले त्यांना ‘ अंबाबाईचे पुजारी कधी येणार ‘ असे विचारत होती. त्यामुळे आम्हाला आणि दप्तरांना पाहिल्यावर त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. दप्तरे घेतल्यावर त्यांचे उजळलेले चेहरे पाहून कृतकृत्य वाटत होत. कार्यक्रमादरम्यान श्री. अमित पाटील यांनी सुरू केलेल्या दोन उपक्रमांचं कौतुक आणि आश्चर्य दोन्ही वाटलं. त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतः च पुस्तक लिहिण्याचा उपक्रम दिला आहे आणि ४ विद्यार्थिनींनी त्यातून लिहिलेली पुस्तके बघून अचंबा वाटला. मोठ्या वर्गातील मुले लहान वर्गातील मुलांचा पाठ घेतात, परीक्षा घेतात आणि आपल्या साठविलेल्या पैशातून त्यांना बक्षिसे देतात हे पाहून मन भारावून गेले.
या मुलांना इतर मोठ्या मोठ्या शाळात मिळणार नाही असे संस्कार देणारे, अनंत अडचणीतून संस्थेला मोठं करण्याचा ध्यास घेतलेले अमित आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांबाबत खूप अभिमान वाटला. अमित पाटील असोत की सह्यगिरी शैक्षणिक मंच चे रघुनाथ शिंदे सर असोत अशा कर्मयोगी लोकांसोबत गाठ पडली ही श्री जगदंबेची कृपाच !

काल स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या रा. छ. शाहू हायस्कूल आणि कै. डॉ. दीपक साळुंखे विद्यालय येथे दप्तर वाटपाचा कार्यक्...
09/07/2026

काल स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या रा. छ. शाहू हायस्कूल आणि कै. डॉ. दीपक साळुंखे विद्यालय येथे दप्तर वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी संस्थेचे आजीवन सेवक श्री. श्रीराम साळुंखे, मुख्याध्यापक श्री. सावंत सर, श्रीपूजक मंडळाचे श्री. मनोज मुनिश्वर, भाजपा चे माजी जिल्हाध्यक्ष आज सामाजिक कार्यकर्ते श्री. संदीप देसाई, श्री. योगेश जोशी, श्री. युवराज खाडे, श्री. ऋतुराज नढाळे उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांनी स्थापन केलेल्या सह्यगिरी शैक्षणिक विचार मंच या संस्थेच्या माध्यमातून राधानगरी आणि पन्हा...
05/07/2026

कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांनी स्थापन केलेल्या सह्यगिरी शैक्षणिक विचार मंच या संस्थेच्या माध्यमातून राधानगरी आणि पन्हाळा तालुक्यातील सुमारे पावणे दोनशे गरजू विद्यार्थ्यांना काल वाघुर्डे येथे झालेल्या कार्यक्रमात दप्तरे प्रदान करण्यात आली.

**काही संवाद आवाजाविनाही खूप काही बोलून जातात**राजे दिलीपसिंह जयसिंगराव घाटगे स्मृतिनिवासी कर्णबधिर विद्यालय कागल या शाळ...
02/07/2026

**काही संवाद आवाजाविनाही खूप काही बोलून जातात**
राजे दिलीपसिंह जयसिंगराव घाटगे स्मृतिनिवासी कर्णबधिर विद्यालय कागल या शाळेमध्ये काल दप्तर वाटप पार पडले. दप्तरे हातात मिळाल्यावर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वहात होता.
नियतीने त्यांच्याकडून बोलण्याची ताकद हिरावून घेतली असेल, पण काल त्यांच्या मूक भावनांनी, त्यांच्या इवल्याशा हातांच्या हालचालींनी आणि कृतज्ञ नजरेने आमच्याशी इतका जिवंत, इतका गहिरा संवाद साधला की या उपक्रमाची कृतकृत्यता वाटली. यावेळी श्रीपूजक मंडळाचे सचिव माधव मुनिश्वर, मनोज मुनिश्वर, मुख्याध्यापक गायकवाड सर, माजी शिक्षिका सौ. संध्या कुलकर्णी, सौ. स्वाती मुजुमदार आदि उपस्थित होते.

01/07/2026

आज महानगरपालिकेच्या गंजीमाळ येथील द्वारकानाथ कपूर विद्यालयात दप्तर वाटप उपक्रमावेळी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी उपस्थिताना अतिशय चांगले मार्गदर्शन केले. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासात शिक्षक, पालक आणि समाज या तिघांचेही योगदान महत्वाचे असते. शिक्षक आणि समाज आपापल्यापरीने हे योगदान देतच असतात पण सर्वात जास्त महत्वाचे योगदान हे पालकांचे असते. पालकांनी मुलांना पुरेसा वेळ देणं हे मुलांच्या विकासासाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी विषद केले. आपल्या स्वतःच्या प्रतिकूल परिस्थितीतील शिक्षणाचा प्रवास सांगतानाच त्यांनी बाळचमुला भरपूर शिकण्यासाठी आवाहन केले. माझ्या आजवरच्या राजकीय आयुष्यात प्रत्येक विषयात खोलवर विचार असलेले आणि आत्मियतेने काम करणारे पहिलेच आयुक्त मी पाहिले. कोल्हापूर महानगरपालिकेला बऱ्याच वर्षांनी एक चांगले अधिकारी मिळाले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

महानगरपालिकेच्या भागशाळा गंजीमाळ द्वारकानाथ कपूर विद्यालय येथे आज महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, मनपा प्राथमिक ...
01/07/2026

महानगरपालिकेच्या भागशाळा गंजीमाळ द्वारकानाथ कपूर विद्यालय येथे आज महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, मनपा प्राथमिक शिक्षण प्रशासनाधिकारी जयश्री जाधव, श्रीपूजक मंडळाचे सचिव माधव मुनिश्वर, शैक्षणिक पर्यवेक्षक माळी सर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना दप्तर वाटप केले.

दप्तर अभियानांतर्गत नूतन मराठी विद्यालय, मिरजकर तिकटी
30/06/2026

दप्तर अभियानांतर्गत नूतन मराठी विद्यालय, मिरजकर तिकटी

Address

Kolhapur , A Ward
Kolhapur

Telephone

+918482869989

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samidha Pratishthan,Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Samidha Pratishthan,Kolhapur:

Shortcuts

Share