12/11/2025
नमस्कार, ह्या विशेष भागात *मदर्स ऑन व्हील्स* टीम सोबत ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमधील स्टुडिओतून खास गप्पा मारण्यात आल्या आहेत.
*दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता* यांनी, राष्ट्र उभारणीत मातांचे महत्त्व सांगून, *प्रतीकात्मक फ्लॅग-ऑफ* करून मार्च २०२५ मध्ये सुरू झालेला हा उपक्रम, म्हणजे *माधुरीताई सहस्रबुद्धे* (फाउंडेशन फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट इन ॲकॅडेमिक फिल्ड - *FHDAF* च्या संस्थापिका) यांच्या नेतृत्वाखालील भारतीय महिलांचा *एक खास कार प्रवास* आणि जागतिक-सामाजिक अभ्यास आहे.
प्रमुख प्रवास:
* पहिली मोहीम (२०१८): या महिलांच्या पथकाने दिल्ली ते लंडन असा तब्बल २२ देशांतून (२३,००० किमी) प्रवास केला.
* *दुसरी मोहीम (सध्या सुरू)*आग्नेय आशिया (South East Asia), भूतान, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड सारखे देश
ह्यात सहभागी झाले आहेत
*माधुरी सहस्रबुद्धे* (Madhuri Sahasrabudhe)
*अवंती दीक्षित* (Avanti Dixit)
*उर्मिला जोशी* (Urmila Joshi)
*शीतल देशपांडे* (Sheetal Deshpande)
प्रवासाचा उद्देश:
* *मातृत्वाचा अभ्यास*: जगभरातील विविध संस्कृतीत आईची भूमिका (मातृशक्ती) आणि कुटुंब रचना कशी बदलत आहे, याचा प्रत्यक्ष अभ्यास करणे.
* *मूल्यशिक्षण*: कुटुंबाला ‘पहिली पाठशाळा’ मानून, आईच्या भूमिकेद्वारे मुलांमध्ये मुल्ये आणि चारित्र्य रुजविण्यात येणाऱ्या प्रयत्नांना बळ देणे.
* जागरूकता: या प्रवासात भेटलेल्या *जागतिक मातांच्या कथा आणि अनुभव एकत्र करून, गोळा केलेला डेटा संकलित*, विश्लेषण केला जातो आणि भारतात आयोजित केलेल्या *आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर* केला जातो.
ह्या गप्पा मारताना अनेक प्रकारच्या घटना आणि प्रसंगांचे वर्णन आहे.
आधुनिक दृष्टीकोन: फेमिनिझम (Feminism) कुटुंबातील मुलांचे संगोपन किंवा त्यांच्या वाढीवर कसा परिणाम करते? एक आई म्हणून याकडे कसे पाहवे?
प्रवासातील किस्से: एवढ्या देशांमध्ये फिरताना शुद्ध शाकाहारी (Vegetarian) राहण्याचे आव्हान त्यांनी कसे पेलले? सोबत कोणते खास पदार्थ घेऊन गेल्या? तसेच सीमा ओलांडताना आलेल्या काही मजेदार आणि तणावपूर्ण प्रसंगाच्या गोष्टीही त्यांनी शेअर केल्या आहेत!
कृपया ही मुलाखत तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा. 🙏
https://youtu.be/awo1y527Sdk?
तुमच्या आशीर्वादाने, आम्ही सलग तिसऱ्या वर्षी, हा उपक्रम चालू ठेवायचा प्रयत्न करणार आहोत आणि नवनवीन पाहुण्यांसोबत गप्पा मारणार आहोत. 😀
Reach out to Sameer +610433509643) for sponsorship and collaboration*
पहा आणि आम्हाला प्रतिक्रिया कळवा . 🙏
*Borkars Media* talkshow *Talkaleidoscope* Telling Stories and Spreading Smiles 😊
We are incredibly excited to welcome the inspiring team from *Mothers on Wheels* to our Melbourne studio!Meet the four incredible ladies who decided to drive...