Jidnyasa

Jidnyasa Jidnyasa Charitable Trust Is non profit Organization, Working with Marginalized Migrant children's.

Bank Account No:-Bank of Baroda A/C No:-04340200000933 IFSC CODE; BARBOSHIKOL

15/06/2026

नवीन शैक्षणिक वर्षाचे जल्लोषात स्वागत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबजामच्या गोडव्याने करण्यात आले. जिज्ञासा संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस आनंददायी, उत्साहवर्धक आणि संस्मरणीय करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांना गुलाबजाम आणि राजगिरा लाडू वाटप करून करण्यात आली. शाळेत प्रथमच दाखल झालेल्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष "हातठसा, पायाचे तळवे ठसा उपक्रम" घेण्यात आला. या उपक्रमातून मुलांनी आपल्या शैक्षणिक प्रवासाची आनंदी सुरुवात केली.

याशिवाय गाणी, गप्पा, चित्रकला, सर्जनशील खेळ, कार्टूनद्वारे मनोरंजन आणि विविध सहभागात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुलांनी या सर्व उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. संपूर्ण शाळा परिसर मुलांच्या हास्याने आणि उत्साहाने भरून गेला होता.

शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांमध्ये शाळेविषयी आपुलकी निर्माण करणे, भीती दूर करणे आणि आनंदी वातावरणात शिक्षणाची सुरुवात करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. जिज्ञासा संस्थेच्या या उपक्रमाचे शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी स्वागत केले.

ग्रामीण व वंचित मुलांसाठी गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षणाचा श्रीगणेशा केला

15/06/2026

🎒✨ A new academic year, a new beginning, and one more step towards quality education!

From the academic year **2026–27**, Jidnyasa Charitable Trust is happy to expand its journey by adding **Vidya Mandir Ramakrishna nagar** to our educational initiatives.

Today, we joyfully celebrated the **First Day of School** with our First Standard students — welcoming them with smiles, excitement, and dreams for a bright future. 📚🌸

Every child’s first step into school is the beginning of endless possibilities. Wishing all our little learners a wonderful year ahead! ❤️

15/06/2026
शिक्षणाच्या क्षेत्रातील बहुमोल योगदानाचा राष्ट्रीय पातळीवर गौरव! 🏆 'जिज्ञासा संस्थेच्या' संस्थापिका दिपाली पाटील यांना C...
10/06/2026

शिक्षणाच्या क्षेत्रातील बहुमोल योगदानाचा राष्ट्रीय पातळीवर गौरव! 🏆 'जिज्ञासा संस्थेच्या' संस्थापिका दिपाली पाटील यांना CII फाउंडेशनचा प्रतिष्ठित 'वुमन एक्सेम्प्लर अवॉर्ड' प्रदान. हार्दिक अभिनंदन! 🎉✨

17/05/2026

*जिज्ञासा संस्थेसाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ✨*

दरवर्षी * CII Foundation* तर्फे शिक्षण, आरोग्य, समुदाय सक्षमीकरण आणि सूक्ष्म उद्योजकता या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २० तळागाळातील महिला नेतृत्वांचा गौरव करण्यात येतो. यावर्षी शिक्षण क्षेत्रातील हा पुरस्कार जिज्ञासा संस्थेचे संस्थापक दिपाली चौगुले यांना मिळाला आहे .

हा पुरस्कार सोहळा दिल्ली येथील ताज हॉटेलमध्ये भारताचे माननीय केंद्रीय शिक्षण मंत्री श्री. धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत पार पडला.
*CII Foundation तर्फे Woman* *Exemplar Award 2026** हा पुरस्कार शिक्षण क्षेत्रात ग्रामीण व वंचित मुलांसोबत केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला

गेल्या सहा वर्षांपासून आम्ही ग्रामीण भागातील तसेच स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षित बालपणासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत. तसेच आपल्या जिल्हा परिषद शाळेत विद्या मंदिर वंदूर येथे ग्रंथालय, संगणक कक्ष आणि मुलांसाठी भाषा , गणित विकासासाठी प्रयत्न करीत आहोत ,अनेक अडचणी आणि आव्हानांमधूनही मुलांच्या चेहऱ्यावरचं निरागस हसू, शिकण्याची उत्सुकता आणि त्यांची स्वप्नं आम्हाला सतत प्रेरणा देत आली आहेत.

*आमच्या या प्रवासात कायम विश्वासाने साथ दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!!!*

ह्या प्रक्रियेमध्ये सामील सर्वांचे मनापासून आभार
जिज्ञासा सहकारी , मुलं, पालकांचा, शिक्षकांचा, ग्रामपंचायत सदस्य ,सरपंच , मित्रपरिवार , शाहू सहकारी साखर शाळा प्रकल्प सर्व मान्यवर , देणगीदारांचा आणि सतत साथ देणाऱ्या सर्व शुभेच्छुकांचे आभार.

*जिज्ञासा  संस्थेसाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ✨* दरवर्षी * CII Foundation* तर्फे शिक्षण, आरोग्य, समुदाय सक्षमी...

Address

Kagal , KOLHAPUR
Kolhapur
416216

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jidnyasa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Jidnyasa:

Share