12/02/2026
धावपळीच्या जीवनशैलीमुळे मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून त्याचे शारीरिक व मानसिक परिणाम होऊ शकतात.
या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी रविवार, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी “मानसिक आरोग्य – आजार आणि उपचार” या विषयावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात डॉ. अमृता कुलकर्णी (MD Psychiatrist) मानसिक आजारांचे प्रकार, त्यांची कारणे आणि उपचारपद्धती याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.