Aman Foundation Kolhapur

Aman Foundation Kolhapur Our vision.. We believe in enabling every autistic child to understand and manage their differences so that they grow into self-reliant adults.

"ऑटिझम विषयी सर्व काही"    💙 Understanding and acceptance are key ..
19/04/2026

"ऑटिझम विषयी सर्व काही"


💙 Understanding and acceptance are key ..

https://youtu.be/1r1Gq21TLSI?si=WUhe1dsJbSckBKxQALL about Autism   Bnews Kolhapur
19/04/2026

https://youtu.be/1r1Gq21TLSI?si=WUhe1dsJbSckBKxQ
ALL about Autism

Bnews Kolhapur

स्वमग्नता जागरूकता दिनानिमित्त कोल्हापुरात झाली कार्यशाळा, ऑटीझमग्रस्त मुलं आत्मविश्वासानं वावरतील यासाठी सम...

It's "ALL About AUTISM"Workshop On the occasion of   Together, we can make a difference! Aman Foundation Kolhapur in ass...
19/04/2026

It's "ALL About AUTISM"
Workshop On the occasion of
Together, we can make a difference!

Aman Foundation Kolhapur in association with CSIBER, Kolhapur

27/02/2026

⚡केअर चे पुढचे पाऊल..
सर्वसाधारण शाळेत शिकत असताना शैक्षणिक गतिमंदत्व असणाऱ्या मुलांसाठी विशेष शिक्षकांकडून वैयक्तिक मार्गदर्शन, उपचारात्मक शिकवणी तास...
अधिक माहिती करिता 9922096999

स्वावलंबी बनवण्यासाठी अमन फाउंडेशन चे पाठबळ 🩵
27/02/2026

स्वावलंबी बनवण्यासाठी अमन फाउंडेशन चे पाठबळ 🩵

13/12/2025
💫 *आली आली दिवाळी , कृतीच्या वस्तू घेण्याची वेळ झाली*✨🩵आपल्या मुलाला स्वावलंबी बनवण्यासाठी अमन फाउंडेशनच्या विशेष मुलांच...
08/10/2025

💫 *आली आली दिवाळी , कृतीच्या वस्तू घेण्याची वेळ झाली*✨
🩵आपल्या मुलाला स्वावलंबी बनवण्यासाठी अमन फाउंडेशनच्या विशेष मुलांच्या आई पालकांनी पुढाकार घेऊन दोन वर्षांपूर्वीच्या दिवाळीत इकोफ्रेंडली "कृती" प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर आपणा
सर्वांचा उदंड प्रतिसाद लाभला,जो आमच्या मुलांना आणि आई पालकांना प्रोत्साहन देणारा ठरला🥰
यंदाही 💚पर्यावरणाशी मैत्री करून 🔅 क्रिएटिव्ह निर्मिती तून साकारलेले नव्या रूपातले कागदी फ्लूरोसंट छोटे आकाशदिवे /शोपीस, तसेच पारंपारिक, विविध आकाराचे आकाश कंदील, hand-made चंदन ,गुलाब केशर साबण आणि चंदन ,मोगरा उटणे सेट
👉गेल्या वर्षी ऐनवेळी शेवटच्या दोन दिवसात अचानक वाढलेल्या ऑर्डर्स मुळे काही जणांना वस्तू पुरविता आल्या नाहीत.
💫तेव्हा वेळ न दवडता त्वरित ऑर्डर द्या आणि यंदाची दिवाळी तेजोमय आणि इकोफ्रेंडली बनवा ❣️
👉 संपर्क:
साची 70200 56225

🩵केअर च्या स्वमग्न मुलांच्या, पालक आणि स्टाफच्या सहवासात "योगा डान्स स्टुडिओ आणि ग्रोबिझ कनेक्ट फोरम  (GBC)" यांनी साजरा...
16/08/2025

🩵केअर च्या स्वमग्न मुलांच्या, पालक आणि स्टाफच्या सहवासात "योगा डान्स स्टुडिओ आणि ग्रोबिझ कनेक्ट फोरम (GBC)" यांनी साजरा केला अनोखा स्नेहबंधन राखी कार्यक्रम💝
केअरच्या टीमकडून मनःपूर्वक धन्यवाद 🙏

11/06/2025

🧩श्री ला सूर गवसतोय...🎶🪘

साधारण तीन वर्षांपूर्वी साडेतीन वर्षाच्या श्री ला केअर ला घेऊन आलेले आई बाबा आठवतात. कडेवरचे कर्कश रडणारे ते मूल! मल्टिपल डिसबिलिटी. त्यात ऑटीझम हे निदान.ना दृष्टी, ना उभे रहाणे, भिंतीला टेकून कसे बसे बसवावे तर आईच्या मांडीवरून खाली उतरवले की भोकाड पसरलेच.. आवाजही इतका दणदणीत की उरली सुरली पोरही घाबरून रडायला सुरुवात..
अशा या मुलाच्या भोंग्यामुळे त्याच्या आई बाबांना रेंट चे घरही महिनाभरात सोडायला लागायचे.
एकूणच सगळीकडे नाकारलेले हे पोर स्वीकारायचे ठरवले. गंधा बाबत संवेदना तीक्ष्ण असल्याने आई शेजारून हलली तरी कळायचे.आणि मग कसबस कंट्रोल केलेलं रडं दुप्पट व्हायचे.पहिले 15 दिवस आईसोबत बसू दिले. त्याच्या रडण्याचा त्रास होऊन इतर मुलांचे हात सतत कानावर असायचे. एक दोन पालकांनीही नाराजी व्यक्त केली.
थोड्क्यात, सगळे वातावरण बिघडले होते. शिक्षक सुद्धा जरा कुरकुर करायला लागले होते. त्याला पुढे 6 महिन्यांनी बोलावू असेही आडून आडून सुचवले गेले. पण आशावादी मन पराभव मानायला तयार नव्हते.
चिकाटीचा महिना गेला. आई काही वेळासाठी बाहेर बसू लागली.
हळू हळू टाईम स्पॅन वाढवला. मग फक्त आईची ओढणी आधाराला सोबत देऊ लागली. Separation anxiety कमी होऊन आम्हाला विश्वासाने स्वीकारायची वेळ यायला तिसरा महिना आला. तारस्वरातील पट्टी खाली येत येत यथावकाश पूर्ण थांबली. आता ओठावर गोड निरागस हसूही तरळायला लागले होते.
कालांतराने असा रुळला की श्री खूप रडायचा हे इतिहासजमा झाले. एक कठीण परिक्षा पास झाल्याचा आनंद होता. श्री पासून काही वेळासाठी स्वातंत्र्य मिळाल्याने त्याची आई अभ्यास करून परिक्षा देऊ लागली. आणि लवकरच LLM ही पूर्ण केले.
आता श्री च्या आवश्यक त्या थेरपी सुरू झाल्या. हे चॅलेंज स्वीकारताना केअर मध्ये अनेक नवीन साधनांची भर केली गेली.अथक प्रयत्नांनी तो स्वतंत्र बसू लागला. आता चालायलाही सुरवात झाली आहे. स्वतःचे मूल पहिल्यांदा चालल्यावर जितका आनंद झाला नव्हता त्याहीपेक्षा जास्त आनंद श्री ने पहिले पाऊल टाकले तेव्हा केअर च्या स्टाफला झाला .
या मुलांना उपजत काही कला असतात. बहुतांशी मुलांना म्युझिक मध्ये रस असतोच. पण श्री चे हात काही शोधत असायचे. जवळ असणाऱ्या प्रत्येक वस्तूवर थाप मारून आवाजाचा कानोसा घ्यायचा. गेल्या आठवड्यात केअर ला थेरपी करता मैत्रिणीकडून भेट मिळालेला ड्रम (जेम्बे) श्री च्या हाताला लागला. आणि बोटे त्याच्या कलाने फिरवून सुर कसे निघतात याचा कानोसा घेऊ लागला. आम्ही अवाक होऊन पहात होतो.
🎼नेमका सूर सापडून श्री चे भविष्य उज्वल व्हावे याच सदिच्छा ❣️
(झेंबे श्री च्या हातात आल्यावरचा पहिला वहिला व्हिडिओ नक्की पूर्ण पहावा)

10/05/2025

Address

Panchavati Bunglow , Plot No. 45, Sanyukt Maharashtra Hsg Society, Rajarampuri Kolhapur
Kolhapur

Opening Hours

Monday 11am - 3pm
Tuesday 11am - 3pm
Wednesday 11am - 3pm
Thursday 11am - 3pm
Friday 11am - 3pm
Saturday 11am - 2pm

Telephone

+917559243188

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aman Foundation Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Aman Foundation Kolhapur:

Share