20/06/2026
Green Window Solutions
*काळी मिरी (Piper nigrum L.)*
_उपयुक्त अंग:-_
🌿 फळे
__गुणधर्म_ :-
🌿 उत्साहवर्धक, पाचक, रक्तशुद्धीकर, वेदनाशामक, प्रतिकारशक्ती वाढवणारी.
_माहिती:-_
🌿 मसाल्याच्या पदार्थांची सम्राज्ञी म्हणजे ही काळी मिरी, सदाहरित मजबूत वेल.
🌿 पाने काहीशी मळकट, हिरव्या रंगाची, जाडसर, विड्याच्या पानांच्या आकाराची पण मोठी.
🌿 प्रत्येक पेरांपासून बारीक मुळ्या फुटतात. त्याच्या साहाय्याने मिरी वर झेपावते.
🌿 लोंबणाऱ्या पुष्पमंजिऱ्या व त्यांचेच पुढे मिरीचे घोस पानाआडून आपल्याशी लपाछपी खेळतात.
_घरगूती वापराचे आरोग्यदायी फायदे:-_
🌿 चटणी, चहा, काढा यात ताजी मिरी आवर्जून वापरतात.
🌿 खूप जास्त सर्दी झाली तर मिरी दुधात उकळून, हळद टाकून, घोट घोट घेतल्यास बरे वाटते.
🌿 पाचक असल्याने ताजी मिरी किंवा मिरपूड आणि जिरे ताकाबरोबर घेतले तर चविष्ट लागते.
🌿 सॅलड किंवा कोशिंबीरत सजवायला मिरीची हिरवी ताजी गोलाकार फळे मस्त वाटतात.
🌿 जलजीरासारख्या उत्साहवर्धक पेयांमध्ये ताजी मिरी छान लागते.
🌿 ताज्या मिरीचे लिंबू पिळलेले लोणचे रुचकर लागते.
_घरी कसं लावाल:-_
🌿 खोडाच्या पेरांपासून किंवा बियांपासून रोप करता येते.
🌿 कुंडीत आधारासाठी एखादा बारीक बांबू ठोकून घेतला आणि त्याला वेल वेढली तर गॅलरीतील कोपराही चमकदार दिसतो.
🌿 पांगारा, शेवगा, नारळ, सुपारीसारख्या सरळ वाढणाऱ्या वृक्षाबरोबर लावली तर मिरी त्यांना बिलगून मस्त वाढते.
🌿 सुपीक माती व थोडेसे शेणखत आणि हवेत आद्रता मिळाली तर हा वेल सावलीत छान वाढतो.
🌿 हिरव्या, चमकदार पानांनी नटलेल्या छोटासा मिरीचा मांडवही बागेची शोभा वाढवतो.
*Green window solutions*
Spine road,district center Bhosari.
संपर्क:-
8484913538
8484823538
8484023538
*कफ, जंत आणि अजीर्णावर गुणकारी, पाचक, टपोरी काळी मिरी...*
📑 मुळ माहिती:- पूर्वा जोशी(Bio concept)
अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक ला भेट द्या
https://www.facebook.com/Green-Window-Solutions-103777031425017/