11/03/2026
पूर्वी इलेक्शन मध्ये लोकांनी यावे vote करावे म्हणून voter स्लिप बरोबर पैशाचे पाकीट देत असत.
आता लग्नात पत्रिकेसोबत अशी प्रलोभने देण्याची प्रथा सर्वत्र सुरू आहे.
हुंड्या इतकी नाही, पण तशी वाईटच असलेली अहेरांची प्रथा बंद होण्या ऐवजी अधिकच कम्पल्सरी होत चालली आहे.
सोने चांदी प्रचंड महाग झाले. ते गिफ्ट देणे अर्वसामान्यांना परवडण्यासारखे नाही.
गृहउपयोगी वस्तू प्रत्येकाकडे असतातच.
सौंदर्यप्रसाधनांचा संच, पोरींकडे ढिगाने असतो.
कापड घ्यावे तर शिवलेले कपडे वापरणे म्हणजे outdated फॅशन झालीय. त्यात ही 80% ऑफ असलेले ऑनलाईन सेलर आहेतच. म्हणजे कपडा देऊन चालणार नाही.
रेडीमेड घ्यावे तर टाइट फिटिंग ची फॅशन. म्हणजे रेडीमेड कापडे नाही देता येत.
वॉल पीस वगैरे..आरे देवा..ही इंटेरियर डिझाइनर नावाचे राक्षस एकदा इंच पण घरात जागा ठेवत नाही..मग ते वॉल पीस कुठे लावणार?
सुटसुटीत पाकीट द्यावे तर 3 धोके. तुम्ही आउटडेटेड वाटणार. फोटो चांगला नाही येणार. बुके ने कसा छान फोटो येतो. दुसरे ते कुणी ढापले तर समोरच्याला कळणार नाही, तू.ही दिले म्हणून..आणि त्यात डॉलर वधारला तर रुपयाची किंमत कमी😁 म्हणजे तेही नाही.
एकूण काय लग्नाला जायचे म्हणजे आनंदापेक्षा हेच tension जास्त. यामुळे अनेक आप्त जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत ते प्रचंड संकोच करतात.
त्यावरची काडी म्हणजे पत्रिकेसोबत आहेर डोक्यावर आपटाने. Voters card सोबत पैशाच्या पाकिटासारखे..
देवाणघेवणीचे प्रेम वर्षभर इतर सण वार यानिमित्ताने वैयक्तिक स्तरावर नाही का करता येणार व्यक्त..
मी तर खूप आधीच ठरवले आहे. पत्रिका आली तर लग्नाला जायचे पण हात हलवत. गोड नमस्कार करायचा. गिफ्ट नाही नेले तर स्टेजवरचा आपला फोटो त्यांनी नाही काढला तरी फरक पडत नाही. तुंबड जेवायचे आणि रिटर्न गिफ्ट न घेता पोबारा करायचा..
नाही हो..पत्रिकेसोबत रिटर्न गिफ्ट आले तर आधीच लाभ झालेला असल्याने लग्नाला जायची गरजच नाही😁😁😁😁