05/03/2026
पिंपरी चिंचवड सीकेपी मंडळाचा २८ वा. वर्धापन दिन रविवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. रजिस्ट्रेशन व स्वागत समिती श्री किरण चिटणीस श्री आशिष प्रधान व श्री जयेश सुळे यांनी सांभाळली. आनंदी फडणीस यांच्या गणेश वंदना नृत्यने कार्यक्रमास सुरुवात झाली. कोषाध्यक्ष श्री आशिष कुळकर्णी यांनी वार्षिक अहवाल सादर केला. काही अपरिहार्य कारणामुळे प्रमुख पाहुणे श्री रवींद्र जयवंत (उद्योगपती ) उपस्थित राहू शकले नाही.
अध्यक्ष श्री संजय प्रधान यांनी आपले मनोगत व्यक्त केले व त्यांच्या विशेष विनंती मुळे जेष्ठ सभासद सौ सुषमा सुळे यांनी त्यांचे काही अनुभव कथन केले.
त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाले.
कार्यक्रमांमध्ये सौ मधुरा प्रधान, सौ भारती चिटणीस, व सौ अदिती देशपांडे यांनी नागपंचमी व दुर्गे दुर्घट भारी नवरात्र नृत्य सादर केले. पौर्णिमा कुळकर्णी कल्याणी चिटणीस व वैशाली चिटणीस यांनी विठ्ठल संक्रांत मंगळागौर आणि दिवाळी या विविध सण नृत्याच्या माधमातून सादर केली. त्यानंतर वैशाली चिटणीस यांनी अवधूत गुप्ते यांचे "राजं आलं, राजं आलं जिंकूनिया जगभरी. "शिवबा राजं" नाव गाजं जी. ".. हे छत्रपती शिवाजी राजे यांच्यावरील वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्वराज्यासाठी असलेली निष्ठा व बलिदानावर आधारित पावनखिंड या चित्रपटातील गीत सादर केले, अध्यक्ष श्री संजय प्रधान कार्यवाह श्री केतन कारखानिस कोषाध्यक्ष श्री आशिष कुळकर्णी तसेच समिती सदस्य श्री किरण चिटणीस श्री आशिष प्रधान श्री चिंतामणी देशपांडे श्री निखिल चिटणीस श्री जयेश सुळे श्री रोहन चिटणीस तसेच चि. अकुल कारखानीस या सर्वांनी कोरस साठी त्यांची साथ दिली. या गीता अंती छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना वंदन करणाऱ्या घोषणेने तर संपूर्ण सभागृह दणाणून गेला.
कु.अनिता सुळे यांनी कथा सादर केली.
त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अध्यक्ष श्री संजय प्रधान कार्यवाह श्री केतन कारखानीस व कोषाध्यक्ष श्री आशिष कुळकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
साहित्य -- श्री जयेश सुळे
पीएचडी --- कु अनिता सुळे
ज्योतिष शास्त्र--- श्री गौरव दुर्वे
वर्धापन दिन कार्यक्रमासाठी विनामूल्य बँक्वेट हॉल दिल्याबद्दल सौ ऐश्वर्या प्रधान.
श्री श्रीकांत कारखानीस यांनी आर्थिक सहाय्य केल्याबद्दल.
सुरुवातीला विनयशील पद्धतीने सूत्रसंचालन किरण चिटणीस यांनी केले. त्यानंतर पूर्वार्धात पौर्णिमा कुलकर्णी यांनी हलक्या फुलक्या विनोदी अंदाजामध्ये सूत्रसंचालन करीत श्रोत्यांची मन जिंकली.
थोडा ब्रेक घेऊन चहापानानंतर कार्यक्रम सुरू झाला...
श्री राजेंद्र देसाई यांनी अनेक हिंदी सदाबहार गीत सादर केली. तसेच सौ वैशाली चिटणीस यांनी देखील मराठी भावगीते सादर केली. चि. पार्थ तुंगारे याने उत्कृष्ट गायन सादर केले. स्त्री आणि पुरुष अशा दुहेरी आवाजातले गाणे त्याने एकट्याने सादर केले त्याला प्रेक्षकांनी मनःपूर्वक दाद दिली.सौ. केतकी कारखानिस यांनी जोगवा या चित्रपटातील अजय अतुल यांचे "लल्लाटी भंडार" या प्रसिद्ध गाण्यावर नृत्य सादर करीत सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. हेमप्रभा राजे (मूळच्या ग्वाल्हेर च्या) यांनी देखील हिंदीतून कविता सादर केले आणि वयाची परवा न करता स्टेजवर बार बार देखो हजार बार देखो या राजेंद्र देसाई यांच्या लाईव्ह परफॉर्मन्सवर डान्स देखील केला सर्वांनी त्यांना टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.
यंदा प्रथमच वर्धापन दिना निमित्त सीकेपी फूड फेस्टिवल चे आयोजन केले होते. सी के पी म्हटलं की खाद्य प्रेमी. पदार्थांची नावे ऐकली तरी लगेच तोंडाला पाणी सुटते चिकन पाणीपुरी, चिकन कच्ची दाबेली,
( सौ केतकी कारखानीस व सौ मनाली पोतनीस) चिकन पॅटीस, ( सौ श्वेता प्रधान) चिकन रोल्स, व्हेज रोल्स,
(संयुक्ता प्रधान) प्रॉन्स व चिकन लोणचे ( सौ साकेती देशपांडे) आणि डेजर्ट मध्ये टेरामिस्यु आणि ब्यासस्कू (शर्वरी देशपांडे) खाण्यासाठी एकच गर्दी, झाली. भरभरून प्रतिसाद प्रत्येक स्टॉल धारकांना मिळाला. पण विशेष कौतुक कार्यकारणी कमिटीचे कारण सर्व पदार्थांचे सिलेक्शन आणि माफक किंमत याचा नेमका मिलाफ त्यांच्याच प्रयत्नातून घडून आला. प्रचंड मिळालेल्या प्रतिसादामुळे पुढील वर्षी अधिक मोठ्या प्रमाणामध्ये फूड फेस्टिवल करण्याचा प्रयत्न असणारच,
अध्यक्ष या नात्याने उपस्थित ज्ञाती कुटुंबीयांसमोर आपले मनोगत मांडण्याची संधी मिळाली. मागील वर्षी अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर २९ सदस्यांची समिती स्थापन केली, वर्षभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. सर्व समिती सदस्यांची साथ लाभली व वर्षभरामध्ये चार उत्कृष्ट कार्यक्रम आम्ही घेऊ शकलो. सुरुवातीला वर्षभरात तीन कार्यक्रम घ्यायचे अशी योजना तयार केली होती. वर्धापनाच्या दिवशी आम्ही या तीन कार्यक्रमांसाठी रू १५००/- याप्रमाणे कुपन्स दिली. होळी, चित्रपट, स्नेहभोजन एवढेच ठरले होते पण प्रत्येक कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत गेला. कार्यक्रम देखील अतिशय रंजकदार होत गेले.
पहिला होळीचा कार्यक्रम टाटा मोटर्स हॉलमध्ये घेण्यात आला. विविध खेळ, खाद्य पदार्थ, तसेच विविध वस्तूंचे स्टॉल्स ठेवण्यात आले होते. पुरणपोळी बरोबरच विशेष मटन भाकरीचे जेवण होते कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाला.
दुसरा कार्यक्रम दशावतार या मराठी चित्रपटाचा प्रीमियर शो सभासदांना पाहण्यासाठी आयोजित केला होता. चित्रपटातील सिने कलाकारांसह चित्रपट बघण्याचा आनंद सर्वांनी घेतला. मुख्य नाईका प्रियदर्शनी इंदलकर व नायक सिद्धार्थ दोघेही याप्रसंगी उपस्थित होते. सर्वांनी त्यांच्याबरोबर छायाचित्रे देखील घेतली सरप्राईज म्हणून प्रियदर्शनी यांनी लकी ड्रॉ काढला होता. त्यामध्ये दोघांना ठाणे येथील सुप्रसिद्ध दुकानातील साड्या बक्षीस म्हणून मिळाल्या. प्रियदर्शनीच्या आई अस्मिता इंदलकर ह्या स्वतः येऊन बक्षीसांचा वाटप केला. चिंचवड येथील एल प्रो मॉल येथील संपूर्ण थिएटर याकरिता आरक्षित करण्यात आले होते, सर्वांसाठी हा वेगळाच अनुभव होता. तसेच पुढे स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील रेट्रो या थीमचा वापर करून आयोजित केला होता तो देखील अतिशय उत्कृष्ट झाला. अंताक्षरी हौजी अशा विविध कार्यक्रमाचा आनंद सर्वांनी लुटला हो शिवाय खास मटन भाकरीचे जेवण चितळेंचा साजूक तुपातला मुगाचा हलवा मस्तच मेनू असल्याने सर्वच खुश होते. नवरात्रात गृहणींसाठी हृदयाच्या जवळ असा कुंकूमार्चन कार्यक्रम देखील सुंदर झाला. वर्षभरात सर्वच कार्यक्रम अतिशय छान झाले.
यंदा मागील वर्षीपेक्षा काहीतरी वेगळे कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करणार आहोत..