18/08/2026
शिक्षणासाठी योग्य वातावरणही तितकंच महत्त्वाचं असतं.
रोहा येथील चिल्हे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याच्या मदतीसोबतच शाळेच्या आवश्यक सुविधांसाठी पंखे आणि ट्यूबलाईट्स उपलब्ध करून देण्यात आले.
वर्गात पुरेसा प्रकाश आणि हवा असणे ही केवळ सुविधा नाही, तर विद्यार्थ्यांना एकाग्रतेने, आनंदाने आणि आरामदायी वातावरणात शिकता यावे यासाठीची गरज आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास अधिक सुखकर व्हावा आणि त्यांना शिकण्यासाठी आवश्यक वातावरण मिळावे, यासाठी साई फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट आणि नाईटिंगेल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
कारण... शिक्षणाची सुरुवात पुस्तकापासून होते, पण योग्य वातावरण मिळालं तर त्यातून भविष्य घडतं.
या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
साई फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, नाईटिंगेल चॅरिटेबल ट्रस्ट
शिक्षण • संस्कार • मार्गदर्शन • प्रेरणा*
#शिक्षण #शैक्षणिकमदत #रोहा #चिल्हे #विद्यार्थी #शाळा #सामाजिककार्य