Chakrabhedi social foundation CSF NGO

Chakrabhedi social foundation CSF NGO CSF

💔 आत्महत्या करण्यापूर्वी फक्त एकदा आमच्याशी बोला...!कितीतरी महिला आणि तरुणींनी सासरच्या जाचाला, नवऱ्याच्या मानसिक व शारी...
03/11/2026

💔 आत्महत्या करण्यापूर्वी फक्त एकदा आमच्याशी बोला...!

कितीतरी महिला आणि तरुणींनी सासरच्या जाचाला, नवऱ्याच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून आपलं आयुष्य संपवलं आहे. तर काहींना तर क्रूरपणे मारून टाकण्यात आलं आहे.

आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलणाऱ्या त्या जीवाची त्या क्षणी काय अवस्था झाली असेल, मनात किती वादळं उठली असतील, किती असह्य वेदना सहन केल्या असतील, याची कल्पनाही आपण करू शकत नाही.

आपण सहज म्हणतो, "आत्महत्या करायला नको होती!"

पण असं म्हणणं खूप सोपं असतं. ज्या महिलेने रोजचा छळ, अपमान, अवहेलना आणि मानसिक घुसमट सहन केली आहे, तिच्या मनाची तगमग तिलाच माहीत असते.

आपल्या समाजात लहानपणापासून मुलींच्या मनावर एक विचार बिंबवला जातो की, पती म्हणजेच सर्वस्व, पती म्हणजेच आपलं संपूर्ण विश्व! संसार सुखाचा असेल तर आयुष्य सुंदर, अन्यथा आयुष्याला काहीच अर्थ नाही.

अशा विचारांच्या ओझ्याखाली जगणाऱ्या महिलेच्या आयुष्यात जेव्हा नवऱ्याचा छळ, सासरच्यांचा जाच, अपमान आणि त्यातच नवऱ्याच्या आयुष्यात आलेली तिसरी स्त्री, तिचे नातेवाईक यांच्याकडून होणारा त्रास सुरू होतो, तेव्हा ती पूर्णपणे खचून जाते.

एकीकडे समाजाची भीती, दुसरीकडे संसार मोडण्याची भीती, मुलांच्या भविष्याची चिंता आणि रोजचा मानसिक छळ... या सगळ्यांतून बाहेर पडण्याचा मार्ग तिला दिसेनासा होतो.

प्रत्येक महिलेमध्ये संघर्ष करण्याची ताकद असेलच असं नाही. प्रत्येक जणीला परिस्थितीशी लढण्याचं धैर्य मिळेलच असं नाही.

पण महिलांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा...

तुमचा नवरा म्हणजे तुमचं संपूर्ण आयुष्य नाही. तुमचा संसार म्हणजेच तुमचं अस्तित्व नाही.

तुम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. अन्याय सहन करणं ही तुमची जबाबदारी नाही आणि कोणत्याही परिस्थितीत तुमचं आयुष्य संपवणं हा त्यावरचा उपाय नाही.

महिलांनो, हिंमत करा... मदतीचा हात स्वीकारा!

तुम्ही एकट्या नाहीत. तुमचं दुःख ऐकण्यासाठी, तुमच्या पाठीशी उभं राहण्यासाठी आणि योग्य मार्ग शोधण्यासाठी आम्ही आहोत.

चक्रभेदी सोशल फाउंडेशन, देवरुख, रत्नागिरी

🙏 आत्महत्येचा विचार मनात येण्यापूर्वी फक्त एकदा आमच्याशी बोला.

तुमची वेदना ऐकली जाईल. तुम्हाला समजून घेतलं जाईल. तुम्हाला एकटं सोडलं जाणार नाही.

तुमचं आयुष्य अनमोल आहे. ते संपवू नका, नव्याने उभं करा!

सौ. वैदेही प्रभावती सुधीर सावंत
अध्यक्षा – चक्रभेदी सोशल फाउंडेशन, देवरुख, रत्नागिरी
📞 संपर्क : ९१३०२०४४४७

एक पाऊल सकारात्मक परिवर्तनाकडे!

31/10/2026
https://youtube.com/?si=xR4bUL9D-cG0xVXyhttps://www.facebook.com/share/1DPr3Joh9k/🌺🚩 शुभ घटस्थापना! 🚩🌺आई जगदंबेच्या आशीर...
11/10/2026

https://youtube.com/?si=xR4bUL9D-cG0xVXy

https://www.facebook.com/share/1DPr3Joh9k/
🌺🚩 शुभ घटस्थापना! 🚩🌺

आई जगदंबेच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य नांदो. स्त्रीशक्तीचा सन्मान वाढो आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडो! 🙏🏻🌼

घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा! 💐

🌿 चक्रभेदी सोशल फौंडेशन 🌿
एक पाऊल सकारात्मक परिवर्तनाकडे

अध्यक्षा सौ. वैदेही सुधीर सावंत
९१३०२०२४४४७

Share your videos with friends, family, and the world

ही आहे पुरुषांची वाढत चाललेली विकृत मानसिकता 🤷🏻‍♀️😢
06/10/2026

ही आहे पुरुषांची वाढत चाललेली विकृत मानसिकता 🤷🏻‍♀️😢

पुढच्या पिढीला चांगला निसर्ग, शुद्ध पाणी, शुद्ध हवा याची जास्त गरज आहेवैदेही सुधीर सावंतदेवरुखरत्नागिरी 🙏🏻🙂9130204447देण...
06/10/2026

पुढच्या पिढीला चांगला निसर्ग, शुद्ध पाणी, शुद्ध हवा याची जास्त गरज आहे
वैदेही सुधीर सावंत
देवरुख
रत्नागिरी 🙏🏻🙂
9130204447
देणगी साठी सपंर्क साधा.. संस्थेला आपल्या सहकार्यची गरज आहे 🙂🙏🏻

Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.

आमची चक्रभेदी सोशल फौंडेशन ही संस्था समाजात सकारात्मक परिवर्तन साठी काम करते..शासनाला फंड मागितला त्यांच लक्षच नाही... ह...
06/10/2026

आमची चक्रभेदी सोशल फौंडेशन ही संस्था समाजात सकारात्मक परिवर्तन साठी काम करते..शासनाला फंड मागितला त्यांच लक्षच नाही... हे महत्वाचं वाटत नाही. रस्ते पाखाड्या यासाठी लाख करोड रुपये आहेत.. पण जीवन कौशल्य कार्यशाळा मुलं मोबाईल मध्ये अडकत आहेत. आत्महत्या करत आहेत.. त्यांना योग्य दिशा देण्यासाठी चांगल्या कामासाठी नाहीत 🤷🏻‍♀️😢

Address

Ratnagiri

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chakrabhedi social foundation CSF NGO posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share