27/09/2025
जागतिक पर्यटन दिनानिमित्त भारत देशाचा जगाच्या पाठीवर वैशिष्ट्यपूर्ण अमूल्य वारसा ठेवा कोंकणातील अश्मयुगीन कातळशिल्प ( konkan Geoglyphs) जतन संवर्धन तसेच प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन (MTDC) आणि निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी यांच्या मध्ये सामंजस्य करार पार पडला.
महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री मा. श्री शंभूराज देसाई, राज्य मंत्री पर्यटन मा. श्री इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली प्रधान सचिव पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र डॉ.अतुल पाटणे (IAS), व्यवस्थापकीय संचालक, एमटीडीसी, महाराष्ट्र शासन मा. श्री नीलेश गटने, यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यासाठी कार्यक्रमाची आखणी महाव्यवस्थापक एमटीडीसी श्री चंद्रशेखर जैसवाल यांनी केली. याउपक्रमाअंतर्गत जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन (MTDC) आणि निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी यांच्या मध्ये भारत देशाचा जगाच्या पाठीवर वैशिष्ट्यपूर्ण अमूल्य वारसा ठेवा कोंकणातील अश्मयुगीन कातळशिल्प ( konkan Geoglyphs) जतन संवर्धन तसेच प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धीसाठी सामंजस्य करार पार पडला.
युनेस्को जागतिक वारसा स्थळ दर्जा मिळण्याच्या प्रक्रियेत समाविष्ट असलेली कोंकणातील अश्मयुगीन कातळशिल्प. भवितव्यात कोंकण पर्यटन क्षेत्रात आणि त्याअनुषंगाने सर्वांगीण विकासात महत्वपूर्ण भूमिका निभावणार आहे.
हा अनमोल वारसा ठेवा संरक्षित व्हावा, त्याचा सुयोग्य आणि नेटका प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धी व्हावी या प्रमुख उद्देशाने कातळ शिल्प या विषयावर पूर्णवेळ कार्यरत असलेली निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन (MTDC) यांच्या मध्ये जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत सामंजस्य करार करण्यात आला. जागतिक पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री नीलेश गटने सर यांनी रत्नागिरी स्थित कोंकणातील कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे भेट दिली. तसेच त्यांच्या प्रमुख उपस्थितीत गणपतीपुळे येथे आयोजित कार्यक्रमात निसर्गयात्री संस्था, रत्नागिरीचे संस्थापक अध्यक्ष तसेच कोंकणातील कातळशिल्प शोधकर्ते व अभ्यासक श्री सुधीर रिसबूड रत्नागिरी आणि प्रादेशिक व्यवस्थापक एमटीडीसीचे श्री दीपक माने या दोघांच्या स्वाक्षरीने हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.
या प्रसंगी गणपतीपुळे येथील एमटीडीसीचे रिसोर्ट चे व्यवस्थापक श्री वैभव पाटील, गणपतीपुळे येथील पर्यटन व्यावसायिक श्री केळकर, श्री काळोखे व अन्य मंडळी तसेच निसर्गयात्री संस्थेचे श्री सुधीर रिसबूड, ऋत्विज आपटे, अजिंक्य प्रभुदेसाई, तार्किक खातू आणि श्री मकरंद केसरकर उपस्थित होते.
एम टी डी सी ने घेतलेल्या या पुढाकाराबद्दल प्रधान सचिव पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र डॉ.अतुल पाटणे (IAS), व्यवस्थापकीय संचालक, एमटीडीसी, महाराष्ट्र शासन मा. श्री नीलेश गटने महाव्यवस्थापक श्री शेखर जैस्वाल सर, श्री दीपक माने प्रादेशिक व्यवस्थापक तसेच श्री वैभव पाटील यांचे मनःपूर्वक धन्यवाद.
On the occasion of World Tourism Day, a significant Memorandum of Understanding (MoU) was signed between the Maharashtra Tourism Development Corporation (MTDC), Government of Maharashtra, and the Nisarg Yatri Sanstha, Ratnagiri, for the conservation, promotion, and global recognition of India’s unique and invaluable Konkan Geoglyphs — prehistoric rock art found in the Konkan region.
Under the leadership of Hon’ble Maharashtra Tourism Minister Shri Shambhuraj Desai and Minister of State for Tourism Shri Indranil Naik, and under the guidance of Dr. Atul Patne (IAS), Principal Secretary, Directorate of Tourism, and Shri Nilesh Gatne, Managing Director of MTDC, this initiative was planned by MTDC’s General Manager Shri Chandrashekhar Jaiswal to mark the celebration of World Tourism Day.
This MoU aims to safeguard the rare Konkan Geoglyphs — an ancient heritage that is currently in the process of being included on UNESCO’s World Heritage Sites list. These geoglyphs are expected to play a crucial role in the future development of tourism in the Konkan region and its overall socio-economic growth.
With the primary objective of protecting this invaluable heritage and ensuring its systematic promotion and global outreach, MTDC and the Ratnagiri-based Nisarg Yatri Sanstha — an organization solely dedicated to the study and conservation of geoglyphs — formally signed the MoU on the occasion of World Tourism Day.
On the eve of World Tourism Day, MTDC’s Managing Director Shri Nilesh Gatne visited the Konkan Geoglyphs and Heritage Research Center in Ratnagiri. The MoU was officially signed at a special event held in Ganpatipule in the esteemed presence of Shri Gatne. The signatories included Shri Sudhir Risbud — Founder President of Nisarg Yatri Sanstha and a prominent researcher of the Konkan Geoglyphs — and Shri Deepak Mane, Regional Manager of MTDC.
Also present at the occasion were Shri Vaibhav Patil, Manager of MTDC Resort, Ganpatipule; local tourism entrepreneurs including Shri Kelkar and Shri Kalokhe; along with members of Nisarg Yatri Sanstha — Shri Sudhir Risbood, R̥utwij Apte, Ajinkya Prabhudesai, Tarkik Khatu, and Shri Makarand Kesarkar.
Heartfelt thanks are extended to Dr. Atul Patne (IAS), Principal Secretary, Directorate of Tourism; Shri Nilesh Gatne, Managing Director, MTDC; Shri Chandrashekhar Jaiswal, General Manager, MTDC; Shri Deepak Mane, Regional Manager; and Shri Vaibhav Patil for their pivotal roles and commendable efforts in driving this important initiative forward.