26/09/2022
*नाशिक* :- *देवळाली १६९ मिडीयम रेजिमेंटचा गनर डे निमित्त आजी- माजी सैनिकांचा भव्य दिव्य सैनिक मेळावा व सत्कार समारंभ*
काल रविवार दि. २५ सप्टें. २०२२ या दिवशी १९६ वा आरटी गनर डे निमित्त वडनेर गेट ते देवळाली कॅम्प पर्यंत मशाल रॅली काढण्यात आली होती .आरटी सेंटरची डायमंड जुबली सेलिब्रेशन निमित्त देवळाली सिंधी लॉन्स येथे भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या ठिकाणी बरेचसे सैनिक अधिकारी गण तसेच वीरनारी, वीरमाता-पिता ,आजी-माजी सैनिक, दिव्यांग सैनिक या ठिकाणी उपस्थित होते.प्रमुख अतिथी म्हणून श्री.नवनाथ भाऊ पगार संस्थापक अध्यक्ष सैनिक कल्याण सेवाभावी संस्था नाशिक, महाराष्ट्र हे होते त्याचबरोबर १६९ मिडीयम रेजीमेंटचे सेवानिवृत्त अधिकारी ब्रिगेडियर के व्ही संधील , कर्नल अभिजीत दत्ता, कर्नल रावत, स्कूल ऑफ आर्टलरीचे शिक्षक कर्नल वैभव दीप दबास, त्याचप्रमाणे कर्नल १६९ मिडीयम रेजिमेंटचे कमान अधिकारी संदीप श्रीवास्तव हे या ठिकाणी मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माजी सैनिकांचा, वीरनारी, वीरमाता-पिता ,दिव्यांग सैनिक यांचा सत्कार करण्यात आला. ब्रिगेडियर संधिल साहेब, नवनाथ पगार साहेब, कर्नल संदिप श्रीवास्तव साहेब तसेच विजय कातोरे साहेब यांची यावेळी भाषणे झाली. सैनिक कल्याण सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्ष श्री.नवनाथ भाऊ पगार साहेब यांनी आपल्या भाषणातून सांगितले की नाशिक जिल्ह्यातील कुठल्याही सैनिक व सैनिक परीवारास कसल्याही प्रकारची अडचण आल्यास त्यांनी सैनिक कल्याण सेवाभावी संस्थेस लेखी स्वरूपात अर्ज करावा व त्याची एक प्रत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नाशिक यांना द्यावी. त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यास संस्था सदैव्य सहकार्य करील असे ही यावेळी सांगण्यात आले. सैनिक कल्याण कार्यालयाचे मार्तंड दाभाडे साहेब हे देखील ह्या ठिकाणी उपस्थित होते आलेल्या सैनिकांच्या पेन्शन संबंधीचे प्रश्न जसे की स्पर्श पोर्टल,पारिवारिक वाद, शेती रस्ता वाद , अतिक्रमण अश्या बऱ्याच विषयावर चर्चा करून त्यांच्या समस्या नोंदुन घेण्यात आल्या.या अगोदरही सैनिक कल्याण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष नवनाथ भाऊ पगार व त्यांच्या टिमने गावोगावी जाऊन सैनिकांचे बांधावरचे प्रश्न सोडवले आहे यापुढेही असेच काम चालू राहील सैनिकांच्या सर्व अडीअडचणी सैनिक कल्याण सेवाभावी संस्था सदैव्य सोडवत राहील,तरी आपली *संस्था महाराष्ट्र राज्य धर्मादाय आयुक्ताकडून रजिस्टर* असून सर्व कायद्याचे नियम पाळून उभी झालेली आहे लवकरच संस्थेची वेबसाईट आॅनलाईन येत आहे त्यात *सर्वांनी आॅनलाइन रजिस्टे्रशन (सभासद) करावे* भविष्यात आपली संस्था संपूर्ण महाराष्ट्रात व भारतात धडाकेबाज कामकाज करनार आहे.*सर्व रजिस्टर स्थायी सभासदांचा डेथ विमा ५१,००० रु. पर्यतचा असेल* . अंत्यविधीसाठी संस्था पदाधिकारी स्वतः उपस्थित राहुन तो धनादेश त्यांच्या वारसांच्या हाथी सुपुर्द करेल अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी संस्थेमार्फत दिली आहे. त्यांच्याबरोबर संस्थेचे सचिव गोपीनाथ देशमुख, कार्याध्यक्ष संजय खैरनार, मिडिया प्रमुख हिंमत देसले, सदस्य नंदु गायकवाड,आॅ. कॅप्टन भरत नारखेडे, सुर्यकांत दाजी गठडी, विरनारी, वीरमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अध्यक्ष श्रीमती रेखा ताई खैरनार, श्री विजय कातोरे हे देखील यावेळी उपस्थित होते. आलेल्या सर्व वीरनारी,वीरमाता-पिता,आजी-माजी सैनिक व सैनिक परीवारांचे १६९ मिडीयमचे सुभेदार शिवाजी लोकरे तसेच कमान अधिकारी संदिप श्रीवास्तव साहेब यांनी कार्यक्रमास उपस्थित राहिल्या बद्दल व कार्याध्यक्ष श्री.संजय खैरनार यांच्या वाॅटस्अप ग्रुप द्वारे दिलेल्या निमंत्रणला मान देवून उपस्थित राहिल्यांचे
सर्वांचे आभार मानले.