09/27/2026
नमस्कार,
कालच्या dfwmm च्या गणपती कार्यक्रमात बालवाडी, पहिली आणि दुसरीच्या मुलांनी “मोदकवाल्या बाप्पा” हे गाणे सादर केले. जान्हवी दीक्षित म्हणजे आपले शिक्षक नचिकेत देशपांडे ह्यांच्या पत्नीने मुलांकडून तयारी करून घेतली तर तिसरी, चौथी आणि पाचवीच्या मुलांनी “बाप्पाचे रहस्य “ हे छोटे नाटक सादर केले. ह्या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन दोन्ही आपल्या शिक्षिका दीप्ती गानू ह्यांनी केले. त्याचबरोबर प्लेनो शाळा आणि मायबोली शाळेने मिळून अथर्वशीर्ष पठण केले.
प्रसाद परांजपे ह्या आपल्या शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केले.
मोठ्या रंगमंचावर ह्या दोन्ही कार्यक्रमांचे सादरीकरण करताना खूप छान वाटले.
जान्हवी दीक्षित, आणि दीप्ती गानू ह्यांचे मनापासून आभार.
आपले पालक अमित पाठक ह्यांनी तंत्रज्ञानाची बाजू सांभाळली.
आपले शिक्षक नचिकेत देशपांडे ह्यांनी cyclorama तसेच karaoke track बनवून दिला.
अमित आणि नचिकेत, आपले पण खूप खूप आभार.
आपल्या पालकांनीही काल भरपूर मदत केली. आपलेही खूप खूप आभार
आता चाहूल दसरा/ दिवाळी स्पर्धेची आणि शाळेच्या वार्षिक सहलीची….लवकरच अधिक माहिती देऊ…
धन्यवाद
-प्लेनो मराठी शाळा
अभिमानाने जपतो भाषा
असुनी दूर देशा!