North East Maharashtra Mandal Cleveland – a non-profit organization was established in 1974 in order to foster and cherish distinctive cultural heritage of Marathi speaking people from India, residing in the Greater Cleveland Ohio area. The main objective of this organization was to maintain Marathi culture, Indian values and the traditions by organizing musical concerts, staging dramas, dance per
formances, and encouraging the youth participation in various social and cultural activities. In order to transmit Marathi cultural heritage to the next generation, festivals like MakarSankrant, Holi, Diwali and Ganesh Utsav are celebrated by focusing on our customs, rituals and traditions. Since our inception, Maharashtra Mandal has been trying to structure the relationship among its members by promoting unity and bringing people together. Founded in 1975
मराठी संस्कृती, कला, साहित्य, आणि भाषेचा प्रसार ग्रेटर क्लिवलँड व जवळच्या परिसरात करण्याच्या उद्देशाने ईशान्य ओहायो मराठी मंडळाची स्थापना १९७५ साली करण्यात आली. गेली चाळीस वर्ष हे मंडळ यशस्वी रित्या मराठी भाषेची कलोपासना आणि संवर्धन जोपासत आहे.
ग्रेटर क्लिवलँड व जवळच्या परिसरात राहणार्या मराठी बांधवांना मराठी मंडळाद्वारे नियमितपणे आयोजित केले जाणारे कार्यक्रम ही एक पर्वणीच वाटते. ह्या कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांना एकत्र येता येतं, स्नेहबंध सुरू करता व वाढवता येतात आणि महत्वाचं म्हणजे अभिरुचिपूर्ण कलाविष्काराचा आणि मराठमोळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो.
मकरसंक्रांत, होळी, महाराष्ट्र दिन, गणेशोत्सव आणि दीपावली - हे सण परिसरातील सार्वजनिक सभागृहांचा वापर करून साजरे केले जातात. स्थानिक तसेच बाहेरील कलाकारांनी सादर केलेले, मराठी मनाला भावणारे नाटक, शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत, नृत्य, चित्रकला व शिल्पकला प्रदर्शन असे अनेक कार्यक्रम मंडळातर्फे आयोजित केले जातात. कार्यक्रमांचं यशस्वी नियोजन म्हणजे अवघड काम. ते सुरळीत पार पडावं ह्यासाठी दरवर्षी नव्याने नियुक्त होणारी कार्यकारिणी वर्षभर झटत असते.
मराठी शाळा, उत्तरंग तसेच बृहन्महाराष्ट्र मंडळ प्रणित कार्यक्रमांनाही मंडळातर्फे सक्रिय हातभार लावला जातो.