RTP Maharashtra Mandal - RTPMM

RTP Maharashtra Mandal - RTPMM RTPMM operates on non-profit basis and the goal of RTPMM is serving the cultural and social needs of the local Maharashtrian community.

RTPMM mission is to promote, preserve, and cherish the culture, beliefs and traditions of the state of Maharashtra. Research Triangle Park Maharashtra Mandal (RTPMM) was established in the North Carolina’s Greater
Triangle Area in 1986. Every year RTPMM organizes religious, social programs and events.

RTPMM वार्षिक सहल २०२६: एक अविस्मरणीय सोहळा! 🌸☀️मातृदिनाचे औचित्य साधून काल पार पडलेली RTPMM ची वार्षिक सहल खरोखरच अप्रत...
05/10/2026

RTPMM वार्षिक सहल २०२६: एक अविस्मरणीय सोहळा! 🌸☀️

मातृदिनाचे औचित्य साधून काल पार पडलेली RTPMM ची वार्षिक सहल खरोखरच अप्रतिम होती. सर्व सभासद आणि त्यांच्या कुटुंबियांच्या उत्साही सहभागामुळे या कार्यक्रमाला चार चाँद लागले!

खेळ, गप्पा, गाणी आणि अर्थातच स्वादिष्ट जेवण... या सगळ्यापेक्षा महत्त्वाची होती ती आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावरची हास्यं.

आईचा सन्मान करताना तिच्यासोबत घालवलेला हा वेळ प्रत्येकाच्या स्मरणात राहील. 💖

सर्व स्वयंसेवक, संयोजक आणि विशेषतः ज्यांनी आपल्या सहभागाने हा दिवस खास बनवला, त्या सर्वांचे RTPMM परिवारातर्फे मनःपूर्वक आभार! 🙏✨अशाच प्रेमाची आणि सोबतीची साथ पुढील सर्व कार्यक्रमांमध्ये राहो, हीच सदिच्छा 💞💐🎉

RTPMM परिवार 🚩🤝

*Reminder!* *Hurry Up!**RTPMM Annual Picnic 2026!*****Last day of registration has arrived…book today before 12pm noon!*...
05/08/2026

*Reminder!* *Hurry Up!*
*RTPMM Annual Picnic 2026!*

****Last day of registration has arrived…book today before 12pm noon!****

Bring your sun-glasses / sunscreen lotion / picnic chairs / water bottles / Caps / Hats 🎉🎉🤗🤗🥳🥳

💐💞🎉🥳Be ready to get Surprise gifts for Mother’s Day Celebration 💐🎉🥳💞

*How about Mommies and kids twinning for fun!* 🤩 💞

🤗*Tasty verity food is included in ticket price!*🤗

*Booking URL:*
https://www.tugoz.com/events/rtpmm/picnic2026

🚩 कृतज्ञता आणि अभिमान! 🚩RTPMM गुढीपाडवा २०२६ - वसंतोत्सव सोहळ्यात प्रचंड ऊन आणि घामाची तमा न बाळगता ‘शिवगर्जना ढोल ताशा ...
04/14/2026

🚩 कृतज्ञता आणि अभिमान! 🚩
RTPMM गुढीपाडवा २०२६ - वसंतोत्सव सोहळ्यात प्रचंड ऊन आणि घामाची तमा न बाळगता ‘शिवगर्जना ढोल ताशा लेझीम पथकाने’ जे अप्रतिम सादरीकरण केले, त्याला तोड नाही! रणरणत्या उन्हातही तुमचा उत्साह आणि ऊर्जा वाखणण्याजोगी होती.
आपल्या संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी तुम्ही घेतलेले कष्ट आणि महाराष्ट्र मंडळाला दिलेला सदैव पाठिंबा यासाठी आम्ही तुमचे ऋणी आहोत.

विशेष आभार: अरुण जाधव (Arun Jadhav) आणि राजश्री पठारे (Rajashree Pathare). सर्व लॉजिस्टिक्स, तालीम आणि पथकाचे नियोजन अत्यंत चोख पार पाडल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद! 🙏✨
कालच्या रणरणत्या उन्हातही शिवगर्जना ढोल ताशा पथकानेआपल्या तालावर सर्वांना मंत्रमुग्ध केले! 🥁 तुमच्यातील ऊर्जा आणि संस्कृती जपण्याची जिद्द खरोखरच प्रेरणादायी आहे.
RTPMM च्या प्रत्येक कार्यक्रमात खंबीरपणे पाठीशी उभे राहिल्याबद्दल संपूर्ण पथकाचे मन:पूर्वक आभार! 🚩🙌
अशीच साथ सदैव लाभो! 🙏🏻💐

Gratitude

🚩 *RTPMM गुढीपाडवा वसंतोत्सव सोहळा २०२६* 🚩नमस्कार मंडळी 🙏🏻आजचा *’RTPMM गुढीपाडवा - वसंतोत्सव’* सोहळा खऱ्या अर्थाने अविस्...
04/11/2026

🚩 *RTPMM गुढीपाडवा वसंतोत्सव सोहळा २०२६* 🚩

नमस्कार मंडळी 🙏🏻
आजचा *’RTPMM गुढीपाडवा - वसंतोत्सव’* सोहळा खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरला!
आपण सर्वांनी एका मोठ्या कुटुंबाप्रमाणे एकत्र येऊन आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा आनंद लुटला, त्याबद्दल सर्व सदस्यांचे मनापासून आभार.
या सोहळ्याचे काही खास आकर्षणे आणि आभार:
🥁 *पारंपारिक शोभायात्रा*: शिवगर्जना पथकाच्या दणदणीत सादरीकरणाने वातावरणात एक वेगळीच ऊर्जा भरली. तुमचे मनःपूर्वक आभार! Shiv Garjana
🌟 *लेझीम आणि ढोल ताशा:* अरुण आणि राजश्री यांच्या नेतृत्वाखालील ढोल-ताशा आणि लेझीमच्या खेळाने सर्वांची मने जिंकली. Rajashree Pathare Bande
🎨 *रंगोळी:* सोहळ्याचे सौंदर्य वाढवणाऱ्या मोनली आणि अनुया यांच्या सुरेख रांगोळीचे विशेष कौतुक.
🍲 *मेजवानी:* आपल्या लाडक्या स्पॉन्सर्स - ‘Lime and Lemon’ यांनी दिलेल्या अस्सल महाराष्ट्रीयन स्वादिष्ट भोजनासाठी धन्यवाद!
🎭 *कलाविष्कार:* अनुजा's आर्ट सर्कलच्या सर्व कलाकारांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सादरीकरणामुळे कार्यक्रमाला चार चाँद लागले. Anuja Patil
🎤 *हास्यकल्लोळ:* विशाल होळकर यांच्या मराठी स्टँडअप कॉमेडीने सर्वांना खळखळून हसवले.
💃 *फॅशन शो:* मिनल यांनी बसवलेल्या उत्कृष्ट कोरिओग्राफीमुळे फॅशन शो अत्यंत दिमाखदार झाला. Minal Pai Raikar
👩‍🍳 *पाककला स्पर्धा:* परीक्षकांचे मनापासून आभार आणि विजेत्या स्पर्धक - अनुया आणि छाया यांचे हार्दिक अभिनंदन!
🙏कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व स्वयंसेवक आणि समितीतील सदस्यांच्या कुटुंबीयांचे मनापासून धन्यवाद.
स्टॉल्स उभारणे, सजावट, चेक-इन व्यवस्था, सुंदर फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करणे, स्टेज सजावट तसेच अन्न सेवा करण्यात तुम्ही दिलेले सहकार्य अतिशय मोलाचे आहे.
Abhishek Channewar Vaidehi Tophakhane-Kher Mitalee Shet-Gujar

अशाच प्रकारे आपण आपल्या महाराष्ट्राची परंपरा जोपासत पुन्हा भेटूया पुढच्या धमाकेदार कार्यक्रमात!
धन्यवाद!
*तुमची RTPMM टीम* 🚩

नमस्कार मंडळी 🙏🏻RTP महाराष्ट्र मंडळातर्फे आयोजित गुढीपाडवा - वसंतोत्सव २०२६ कार्यक्रमाला यायचं हा सर्वांनी 🙏🏻😊👍🏻Tugoz li...
03/29/2026

नमस्कार मंडळी 🙏🏻

RTP महाराष्ट्र मंडळातर्फे आयोजित गुढीपाडवा - वसंतोत्सव २०२६ कार्यक्रमाला यायचं हा सर्वांनी 🙏🏻😊👍🏻

Tugoz link to book your tickets:
https://www.tugoz.com/events/rtpmm/Gudipadwa-2026

Participation forms:
1. Fashion Show:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf9hEvZd_YWKPI1–5lEQaFGyDl3HIV4JCvIK4KW8d4mnvRfg/viewform?usp=sharing&ouid=105289452421336312992

2. Cooking Competition:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScRb_qZTgIGPr3weyIEu80CHrOgg0eusxrFQMxFTdH3Gdptbg/viewform?usp=sharing&ouid=105289452421336312992

RTP महाराष्ट्र मंडळ 🎉🙏🏻

RTP महाराष्ट्र मंडळातर्फे सर्वांना शिवजयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏🏻💐
02/19/2026

RTP महाराष्ट्र मंडळातर्फे सर्वांना शिवजयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏🏻💐

नमस्कार मंडळी,आजच्या RTPMM 2026 मकरसंक्रांतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल तुम्हा सर्व ...
02/09/2026

नमस्कार मंडळी,
आजच्या RTPMM 2026 मकरसंक्रांतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल तुम्हा सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार! 🙏🏻
आम्हाला आशा आहे की तुम्हा सर्वांना आजचा हा कार्यक्रम मनापासून आवडला असेल.💞
आम्ही तुम्हाला खात्री देतो की, यावर्षी आम्ही तुमच्यासाठी असेच नवनवीन आणि उत्तम कार्यक्रम घेऊन येऊ. तुमच्या आनंदासाठी आणि मराठी संस्कृतीच्या संवर्धनासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.🤟🏻
कार्यक्रमादरम्यान तुम्ही दाखवलेले सहकार्य आणि संयमाबद्दल आम्ही तुमचे अत्यंत ऋणी आहोत. तुमच्या अशाच पाठिंब्यामुळे आम्हाला अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते.
पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद! 💐🎉
तिळगूळ घ्या, गोड-गोड बोला! 🙏🏻

लवकरच भेटू पुढील कार्यक्रमाला… शिवजयंती २०२६🙏🏻

Best Regards,
RTPMM 2026

मंडळी येताय ना आपल्या RTP महाराष्ट्र मंडळा सोबत मकरसंक्रांत साजरी करायला ?बोरन्हाणच्या काही जागा शिल्लक आहेत. त्वरित बुक...
02/06/2026

मंडळी येताय ना आपल्या RTP महाराष्ट्र मंडळा सोबत मकरसंक्रांत साजरी करायला ?

बोरन्हाणच्या काही जागा शिल्लक आहेत. त्वरित बुकिंग करा!!!

रीळ कॉन्टेस्टसाठी अजूनही एंट्रीज घेत आहोत!!! (RTPMM ला FB आणि Insta वर टॅग करा )

कार्यक्रमाचे तिकीट बुक केले नसेल तर लगेच खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा!!! (All Booking and contests entries closes 7th Feb 12:00 pm)

*Booking link:*
https://www.tugoz.com/events/rtpmm/Sankranti-2026

RTPMM 2026

मंडळी येताय ना आपल्या RTP महाराष्ट्र मंडळा सोबत मकरसंक्रांत साजरी करायला ?बोरन्हाणच्या काही जागा शिल्लक आहेत. त्वरित बुक...
02/06/2026

मंडळी येताय ना आपल्या RTP महाराष्ट्र मंडळा सोबत मकरसंक्रांत साजरी करायला ?

बोरन्हाणच्या काही जागा शिल्लक आहेत. त्वरित बुकिंग करा!!!

रीळ कॉन्टेस्टसाठी अजूनही एंट्रीज घेत आहोत!!! (RTPMM ला FB आणि Insta वर टॅग करा )

कार्यक्रमाचे तिकीट बुक केले नसेल तर लगेच खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा!!!
Booking Link:
https://www.tugoz.com/events/rtpmm/Sankranti-2026

Sunday 8th Feb 2026 2:30 PM onwards
Alston Ridge Middle School
7833 Fussell Ave
Cary NC 27519

Best Regards,
RTPMM 2026

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला! ☀️नमस्कार मंडळी 🙏🏻निसर्गाच्या लहरीपणामुळे आपला संक्रांतीचा बेत थोडा लांबणीवर पडला... पण काळजी...
02/04/2026

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला! ☀️
नमस्कार मंडळी 🙏🏻

निसर्गाच्या लहरीपणामुळे आपला संक्रांतीचा बेत थोडा लांबणीवर पडला... पण काळजी नको!😃
हवामान आता ताळ्यावर आलंय आणि आपला उत्साह तर द्विगुणित झालाय!”🤗🎉

येत्या रविवारी, ८ फेब्रुवारी रोजी आपण एकत्र जमून मकर संक्रांतीचा आनंद लुटणार आहोत. सहकुटुंब नक्की या!

*कार्यक्रमाची रूपरेषा:*
दुपारी २:३० - ३:००: नोंदणी आणि हळदी-कुंकू (मैत्रिणींचा कट्टा!)
दुपारी ३:०० - ३:३०: बाल गोपाळांचे ‘बोरन्हाण’ 👶
दुपारी ३:३० - ५:३०: सांस्कृतिक कार्यक्रम (गायन आणि नृत्य) 🎤
संध्याकाळी ५:३० - ७:००: तृप्त करणारं भोजन 🍽️
*Please Note: Food purchase booking ends on 7th Feb 2026 12:00pm*

*Booking link:*
https://www.tugoz.com/events/rtpmm/Sankranti-2026

दिनांक: रविवार, ८ फेब्रुवारी २०२६
स्थळ: Alston Ridge Middle School

चला तर मग, पुन्हा एकदा सगळे जमुया आणि तिळगुळाचा गोडवा वाढवूया!

****For those who have booked already… No worries…Earlier booking remains valid****

तुमच्या येण्याच्या प्रतीक्षेत,
RTP महाराष्ट्र मंडळ 🙏🏻

Address

Cary, NC
27519

Alerts

Be the first to know and let us send you an email when RTP Maharashtra Mandal - RTPMM posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to RTP Maharashtra Mandal - RTPMM:

Share