Buffalo Marathi Mitra Parivar

Buffalo Marathi Mitra Parivar सर्वांचे सहर्ष स्वागत !!! Buffalo Marathi Mitra Pariwar is a community of Marathi people in & around Buffalo.

बफेलो मराठी मित्र परिवार म्हणजेच एक घरगुती अनुभव. गेली अनेक दशके इथे अनेक मराठी भाषिक मंडळी वास्तव्य करतायेत , आणि सगळे सण वार अगदी मराठमोळ्या थाटात साजरे करतायेत. एवढंच नव्हे तर डोहाळेजेवण, बारसे , बोरन्हाण वगैरे देखील फार उत्साहाने साजरे केले जाते. त्यामुळेच जेव्हा सगळ्यांनी एकत्र येवून मराठी संस्कृति टिकवून ठेवण्यासाठी संस्था स्थपायचं ठरवले तर मित्र परिवार हे एकमताने ठरलेलं नाव.

आजवर

येथे अनेक मान्यवरांची वर्दी लागलिये बरकां. बफेलो हे गाव अथांग समुद्रा सारख्या लेक एरी च्या काठी आहे , तसेच त्यातून निघणारी नायगरा नदीने तर जगप्रसिद्ध धबधबा बफेलो वासियांना भेट दिलाय. मग काय सगळ्यां कड़े उन्हाळ्यात पाव्हण्यांची रेलचेल असतेच. आणि "लहरों पे नाचे किरनों की परियां " अस म्हणत पाव्हण्यांना " नायगरा फॉल्स " दाखवण्याच कर्तव्य, हे प्रत्येक बफेलो निवासी फार अभिमानाने पर पाडतो. पाहुणे कधी पंडित हृदयनाथ मंगेशकर , तर कधी आरती अंकलीकर टिकेकर, कधी आयुष्यावर बोलणारे सलिल व संदीप , तर कधी फिल्लमबाजी वर खो खो हसवणारे शिरीष कणेकर.

तर मंडळी आमच्या ह्या मित्र परिवारात तुमचं सहर्ष स्वागत.

*BMMP- Kojagiri Celebrations 2023*  BMMP is bringing the program of Kojagiri on October 28th.  This will be an evening a...
10/25/2023

*BMMP- Kojagiri Celebrations 2023*

BMMP is bringing the program of Kojagiri on October 28th. This will be an evening affair with lot of fun for programs for all ages and delicious food. We want this program to be another great event to bring everyone together. So please reserve your seat by filling up the form below

*_your RSVP is confirmed upon payment receipt only*_.

*_Payment link will appear on next page once you submit*_.

Adult BMMP member - $10
Adult non- member- $15
Kids (7-12) - $5

*Venue*: St. John Lutheran Church 6540 Main St, Willliamsville, NY 14221

*Date*: 28th October 2023
*Time*: 4pm-9pm

Hope we will see you all on 28th.

https://forms.gle/5oF5J1MSEPTNuS7X8.

Team BMMP EC

नमस्कार मंडळीमराठी नूतन  वर्ष अर्थात गुढी पाडवा साजरा करण्यासाठी आपले मंडळ घेऊन येत आहे " गुढी पाडवा आणि मनोरंजन " कार्य...
03/08/2023

नमस्कार मंडळी
मराठी नूतन वर्ष अर्थात गुढी पाडवा साजरा करण्यासाठी आपले मंडळ घेऊन येत आहे " गुढी पाडवा आणि मनोरंजन " कार्यक्रम !!

Let’s celebrate the occasion of GUDHI PADWA together to start this new year and create memories together .
Please mark your calendar for Saturday, March 25th from 6 PM to 10 PM . The program details and address will be as follows :

Venue- St. John Lutheran Church,
6540 Main St, Williamsville, NY 14221

6:00 to 6:30 - gappa goshti , and gudhi darshan
6:30 to 7:00 - Chaha , social hour
7:00 to 8:00 - cultural activities
8:00 to 8:45 - dinner
8:45 to 9 :45 - cultural program and games
9:45 to 10:00 - cleaning and closing

Entry Fee structure will be as follows :
Members Non Members
Single $ 15 $ 20
Couple $ 25 $ 30
Family $ 35 $45
RSVP - https://forms.gle/e3guiu9mHLPRPXd2A Please Pay by 03/18/2023 - 9pm to confirm your registration.

PayPal - [email protected]
CashApp - $BuffaloMarathi

Check - Payable to 'Buffalo Marathi Mitra Parivar'. (Checks may be submitted to any of the EC or board members.)
We received good response for cultural activities so far still if anyone interested in participating in cultural performances ( kids and adults) then please reach out to cultural secretary ( WA :716 909 3645 ) or email [email protected] .

Thanks ,
Team BMMP 2023

नमस्कार मंडळी मराठी नूतन वर्ष अर्थात गुढी पाडवा साजरा करण्यासाठी आपले मंडळ घेऊन येत आहे " गुढी पाडवा आणि मनोरंजन " ....

Makar Sankranti Celebration (Haldi Kunku-Gappa Gosthi)PC - Sugat Wadmare
01/30/2023

Makar Sankranti Celebration (Haldi Kunku-Gappa Gosthi)

PC - Sugat Wadmare

Namaskar Mandali,Thank you for attending BMMP's first program of the year - Haldi Kunku & Gappa Goshti. Hope you all had...
01/30/2023

Namaskar Mandali,

Thank you for attending BMMP's first program of the year - Haldi Kunku & Gappa Goshti.
Hope you all had a great time and enjoyed the program.
Many thanks to Sugat Wadmare for volunteering with Photography.

If you missed taking our Annual membership during the event, we request you consider taking membership and helping Mandal to organize such events.
Below are the membership details -
You may send your membership dues via PayPal, CashApp, or Checks (Payable to 'Buffalo Marathi Mitra Parivar')

PayPal - [email protected]

CashApp - $BuffaloMarathi

उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,…!!सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे……….!!श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे………!!...
01/15/2023

उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,…!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे……….!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे………!!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे…….!!
दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे.
“मकरसंक्रातीच्याखूप खूप शुभेच्छा”

नमस्कार मंडळीं !!वर्ष २०२३ मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आणि शुभेच्छा .मंडळी सरत्या वर्षाला प्रेमाने निरोप देऊन ...
01/15/2023

नमस्कार मंडळीं !!
वर्ष २०२३ मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आणि शुभेच्छा .मंडळी सरत्या वर्षाला प्रेमाने निरोप देऊन आपण सर्वांनी नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले आहे . बफेलो मराठी मंडळ सुद्धा नवीन वर्षाचे भरगच्च कार्यक्रम घेऊन आपल्या भेटीला येत आहे . वर्षाचा पहिला मराठी सण म्हणजे मकर संक्रांती.आबालवृद्धांना आनंद देणारा हा सण ! या निमित्ताने सर्व आजी माजी बफेलोग्रामस्तांना एकमेकांशी संवाद साधता यावा यासाठी आपले मंडळ संक्रांती चा " हळदी कुंकू आणि गप्पा गोष्टी " हा छोटासा कार्यक्रम आयोजित करत आहे .
कार्यक्रमाची रूपरेषा अगदी साधी आणि मनोरंजक असणार आहे . महिला मंडळासाठी हळदी कुंकू , छोट्यांसाठी छोट्या स्पर्धा , बक्षिसे आणि करमणूक . कुटुंब कार्यक्रमात रंगले की पुरुष मंडळींना (तेवढाच ) थोडा वेळ मित्रांशी गप्पा गोष्टी करता याव्यात हा ही एक उद्देश 🙂 कार्यक्रमाची सांगता जेवण , नवीन ,जुन्या मंडळींची ओळख , सर्व वयोगटांसाठी काही मनोरंजक खेळ, मनोरंजन , कला प्रदर्शन , छोट्याना प्रोत्साहन असा असणार आहे . थोडक्यात एकदम आपल्या घरचा कार्यक्रम ! याच वेळी आपण आपल्या या वर्षातील विविध कार्यक्रमाची रूपरेषा सर्वांच्या एकमताने ठरवूयात !! तरी सर्वांनी आवर्जून सहकुटुंब कार्यक्रमाला उपस्थित राहावे हेच नवीन मंडळाची अपेक्षा !
कार्यक्रमाची रूपरेषा
दिनांक : २७ जानेवारी २०२३
वेळ: सायंकाळी ६ वाजेपासून
स्थळ: St. John Lutheran Church, 6540 Main St, Williamsville, NY 14221
ना नफा ना तोटा या तत्वावर शुल्क : $२० प्रति कुटुंब, $१० प्रति व्यक्ती , $५ प्रति विदयार्थी
RSVP : https://forms.gle/MxuhNxaLcWJ5tsGX8
थंडीला अनुसरुन संक्रांतीला काळे कपडे घालण्याची प्रथा हीच आपल्या कार्यक्रमाची ड्रेस थिम ठेउयात .चला तर मग २७ चे आपले सगळे इतर कार्यक्रम रद्द करून आपला मराठी मंडळाचा पहिला उत्सव दणक्यात साजरा करूयात .
“साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करु खैरात …. “

आपलेच ,
नवनिर्वाचित बफेलो मराठी मंडळ
- ऋषी ओंबासे

नमस्कार मंडळीं !! वर्ष २०२३ मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आणि शुभेच्छा .मंडळी सरत्या वर्षाला प्रेमाने नि.....

01/13/2023

नमस्कार मंडळी,

आपणा सर्वाना २०२३ सुखाचें आणि भरभराटीचे जावो!!

कोवीड-१९ चा खडतर काळ मागे टाकून नवीन वर्षाचे स्वागत करू या आणि आपले सगळ्यांचे बफेलो मराठी मंडळ परत सुरु करू या. आपल्याला माहिती असेलच कि आपल्या मंडळाची वार्षिक सभा डिसेंबर मध्ये घेण्यात आली. सभेंत कार्यकारिणी वरील नवीन पदाधिकाऱ्यांची निवडणूक करण्यात आली. कार्यकारिणी वरील सभासद आणि त्यांचा कार्यभार खालील प्रमाणे आहे:

अध्यक्ष - डॉ विनायक गोखले
खजिनदार - नाथूसिंह राठोड
चिटणीस - ऋषी बेके
सांस्कृतिक चिटणीस - ऋषी ओंबासे

कार्यकारीणी सभासद:
सौ कांचन चिटणीस
सौ हेमाताई दीक्षित
सौ मोनिका कारखानीस
श्री श्रीकांत जोशी
डॉ शशी लेले
श्री प्रसाद पंडित
श्री कुणाल शिंदे

या व्यतिरीक्त कार्यकारिणीशी निगडित समित्यां असतील. या समितींवर आपल्याला अजून सभासदही लागतील. आपल्या सर्वांना मी आवाहन करू इच्छितो कि ज्या कोणाला या समितीच्या कामात स्वारस्य असेल त्यांनी कृपया आम्हाला संपर्क साधावा. या समित्या व त्यांचा कार्यभार खालील प्रमाणे:
अन्नपूर्णा समिती: जेवण नियोजन
सांस्कृतिक समिती: सांस्कृतिक व मनोरंजनाचे कार्यक्रम
गुरुकुल समिती: कोवीड च्या काळातही सौ कांचन चिटणीस यांनी मराठी शाळा सुरु ठेवली. श्री प्रसाद पंडित आणि इतरांनी त्यांना यात मदत केली याबद्दल मंडळ या सर्वांचे ऋणी आहे. या उपक्रमात ज्यांना स्वारस्य असेल त्यांनी कृपया आमच्याशी संपर्क साधावा.

काही तांत्रिक कारणामुळे ई-मेल पाठवण्यास वेळ लागला - परंतु कार्यकर्त्यांना ई-मेल व इतर माहिती पुनर्प्राप्त करण्यात यश मिळाले आहे. ई-मेल पाठवण्यास उशीर झाल्याबद्द्ल मंडळातर्फे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.

आपला लोभ आहेच; तो वृद्धिंगत व्हावा हीच अपेक्षा करणारा,

- चिटणीस
ऋषी बेके
ई-मेल: [email protected]
Thank You!

Best Regards,

BMMP EC
https://buffalomarathi.org/
https://www.facebook.com/BuffaloMarathiMitraParivar/

सर्वांचे सहर्ष स्वागत !!!

Buffalo Marathi Mitra Pariwar is a community of Marathi people in & around Buffalo.

Address

Buffalo, NY

Alerts

Be the first to know and let us send you an email when Buffalo Marathi Mitra Parivar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Buffalo Marathi Mitra Parivar:

Share