11/02/2024
#चार_मनोरुग्ण_पोहोचले_श्रद्धा_रीहॅबिलिटेशन_फाउंडेशनला
●लवकरच पोहोचणार घरी
मागील काही वर्षांपासून अहेरी व आलापल्ली शहरात चार मनोरुग्ण बेवारस फिरत होते.अस्वच्छ राहून इकडे तिकडे मागून खाणे,कुठेही झोपणे हे त्यांचे जीवन होते.त्यांना आपला परिवार परत मिळावा या साठी हेल्पिंग हँड्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अहेरी तर्फे चार ही मनोरुग्णांना पुढील उपचारासाठी व त्यांच्या घरी सोडून देण्यासाठी श्रद्धा रीहॅबिलिटेशन फाउंडेशन कर्जत(कल्याण) येथे सुखरूप दाखल करण्यात आले.
अहेरी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मा.श्री मनोज काळबांडे साहेब,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मा.कारुसेठ रोहरा यांनी नेत असलेल्या चारचाकी वाहनाची पूजा करून सर्वांना अहेरी वरून रवाना केले.यावेळी हेल्पिंग हँड्स चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.पोलीस निरीक्षक मनोज कालबांडे साहेब तथा विविध दात्यांनी यासाठी आर्थिक मदत केली.
कर्जत येथे पोहोचल्यावर लगेच श्रद्धा रीहॅबिलिटेशन फाउंडेशन मधील तज्ज्ञांनी चार मनोरुग्णांपैकी २ जणांचे नाव आणि गावाची माहीती काढली.एकाचे नाव शाजू असून तो मुस्लिम असून तो आसाम मध्ये रिक्षाचालकांचे काम करत होता,महिला ही सरूम्मा असून ती कर्नाटक ची आहे. एकाचे नाव मनीष असून तो उत्तर प्रदेश व आणखी एक राधेश्याम हा छत्तीसगड चा आहे. चार पैकी दोन शाजू आणि महिला सरूम्मा यांना येत्या काही दिवसात घरी ही सोडून देण्यात येणार आहे.
कर्जत नेतांना एकाही मनोरुगांन्नी काही पण त्रास दिला नाही.प्रवासात त्यांची पूर्ण व्यवस्था करण्यात आली.याआधी Helping Hands Multipurpose Charitable Organization Aheri च्या पुढाकाराने ८ मनोरुग्ण आपल्या घरी पोहोचले असून आता हे चार रुग्ण ही घरी पोहोचतील.
श्रद्धा रीहॅबिलिटेशन फाउंडेशन कर्जत तर्फे आतापर्यंत १० हजार च्या वर मनोरुगांना सुखरूप घरी सोडण्यात आले आहे.त्यांच्या या कार्यासाठी श्रद्धा रीहॅबिलिटेशन फाउंडेशन चे फाऊंडर मा.श्री. डॉ.भारत वाटवाणी यांना रेमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.तेथील कार्यकर्ते मनोरुग्णांची खूप चांगली काळजी घेतात आणि दररोज उपचार करतात.
मनोरुगणांचे जीवन सुधारून त्यांना आपला परिवार मिळावा यासाठी हा छोटासा प्रयत्न....