Yuva Jagar Trust

Yuva Jagar Trust Youth Driven Organization is working for a better tomorrow

Youth Driven Organization working in the field of Education & upliftment of Physically Challenged Students for giving them access to the unexplored world of opportunities.

26/01/2026
एकच ध्यास - सिकलसेलमुक्त समाज! 🩸💪​काल जोडमोहा येथे पार पडलेले 'अरुणोदय' आरोग्य शिबिर .official युवा जागर ट्रस्ट, यवतमाळ ...
15/01/2026

एकच ध्यास - सिकलसेलमुक्त समाज! 🩸💪
​काल जोडमोहा येथे पार पडलेले 'अरुणोदय' आरोग्य शिबिर .official युवा जागर ट्रस्ट, यवतमाळ आणि यांच्या संयुक्त पणे यशस्वी करण्यात ज्यांनी मोलाचा वाटा उचलला, त्या सर्व स्वयंसेवकांचे आणि उपस्थित नागरिकांचे युवा जागर ट्रस्ट, यवतमाळ मनःपूर्वक आभार मानते.

.babhulkar.10


15/01/2026

'अरुणोदय' अभियानाचा यशस्वी शुभारंभ! सिकलसेलमुक्त भविष्याकडे एक आश्वासक पाऊल... 🩸✨
​राजमाता जिजाऊ जयंतीच्या शुभ मुहूर्तावर, युवा जागर ट्रस्ट, यवतमाळ आणि श्री. खटेश्वर महाराज समिती, जोडमोहा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'मोफत आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिर' काल मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
​शिबिराची ठळक वैशिष्ट्ये:
​HPLC तपासणी: अनेक संशयित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी मोफत HPLC रक्त तपासणी सुविधेचा लाभ घेतला.
​जनजागृती: तज्ज्ञांमार्फत सिकलसेल आणि थॅलेसेमियाबद्दल अचूक मार्गदर्शन करण्यात आले.
​सहभाग: जोडमोहा आणि परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
​हा केवळ एका दिवसाचा कार्यक्रम नसून, हे अभियान ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. ज्यांनी अजूनही तपासणी केलेली नाही, त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.
​सिकलसेलमुक्त समाज घडवण्यासाठी तुमचा सहभाग मोलाचा आहे!
Kishor Babhulkar Karan Gedam

जाहीर आवाहनअरुणोदय – सिकलसेलमुक्त भविष्यासाठी आदिवासी आरोग्य अभियानसर्व सिकलसेल आणि थॅलेसेमिया ग्रस्त रुग्ण तसेच त्यांच्...
14/01/2026

जाहीर आवाहन
अरुणोदय – सिकलसेलमुक्त भविष्यासाठी आदिवासी आरोग्य अभियान
सर्व सिकलसेल आणि थॅलेसेमिया ग्रस्त रुग्ण तसेच त्यांच्या कुटुंबीयांना कळविण्यात येते की,
राज्य शासनाच्या वतीने “अरुणोदय – सिकलसेलमुक्त भविष्यासाठी आदिवासी आरोग्य” ही विशेष मोहीम
दि. १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत पंधरवडा अभियान म्हणून राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत,
युवा जागर ट्रस्ट, यवतमाळ,
श्री. खटेश्वर महाराज समिती, जोडमोहा यांच्या संयुक्त विद्यमाने
जाहीर आवाहन
अरुणोदय – सिकलसेलमुक्त भविष्यासाठी आदिवासी आरोग्य अभियान
सर्व सिकलसेल आणि थॅलेसेमिया ग्रस्त रुग्ण तसेच त्यांच्या कुटुंबीयांना कळविण्यात येते की,
राज्य शासनाच्या वतीने “अरुणोदय – सिकलसेलमुक्त भविष्यासाठी आदिवासी आरोग्य” ही विशेष मोहीम
दि. १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत पंधरवडा अभियान म्हणून राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत,
युवा जागर ट्रस्ट, यवतमाळ,
श्री. खटेश्वर महाराज समिती, जोडमोहा यांच्या संयुक्त विद्यमाने
राजमाता जिजाऊ जयंती निमित्त
भव्य जनजागृती मेळावा व मोफत आरोग्य तपासणी शिबिर
आयोजित करण्यात आले आहे.
या मेळाव्यामध्ये —
• सिकलसेल व थॅलेसेमिया रुग्णांची
• त्यांच्या नातेवाईकांची

HPLC (एच.पी.एल.सी.) रक्त तपासणी मोफत करण्यात येणार आहे.
ही तपासणी आजाराचे अचूक निदान व पुढील उपचारासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तरी, जोडमोहा परिसरातील तसेच आसपासच्या सर्व नागरिकांना कळकळीचे आवाहन करण्यात येते की —
सिकलसेल किंवा थॅलेसेमिया संदर्भात तपासणी न झालेल्या व्यक्तींनी, संशयित रुग्णांनी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी
या शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली HPLC तपासणी करून घ्यावी.
हा पंधरवडा अभियान दि. ७ फेब्रुवारीपर्यंत चालू राहणार असून,
सर्वांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन,
स्वतःचे व भावी पिढीचे आरोग्य सुरक्षित करण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा.
आपला सहभाग —
सिकलसेलमुक्त निरोगी समाज घडविण्याचा भक्कम पाया ठरेल... 🙏🏻🤝🏻🙏🏻🩸 आपल्या एक सिकलसेल योध्दा 🩸🤝🏻🩸🤝🏻

दिव्यांग बांधवांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आमचा लढा असाच सुरू राहील! 💪✨​🙏 समाजाला आवाहन: मदतीचा ह...
03/01/2026

दिव्यांग बांधवांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आमचा लढा असाच सुरू राहील! 💪✨
​🙏 समाजाला आवाहन: मदतीचा हात द्या!
​आमच्या सामाजिक उपक्रमांना पाठबळ देण्यासाठी आपण खालील बँक खात्यावर देणगी देऊ शकता. आपल्या लहानशा मदतीने एखाद्याचे जीवन सुसह्य होऊ शकते.

बँकेचे नाव: भारतीय स्टेट बँक (SBI), यवतमाळ
खाते क्रमांक: 43364072290
UPI ID: yuvajagartrust@sbi
IFSC कोड: SBIN0000506

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विनम्र अभिवादन! 🙏✨​स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आणि अज्ञानाचा अंधा...
03/01/2026

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विनम्र अभिवादन! 🙏✨
​स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आणि अज्ञानाचा अंधार दूर करणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन!
​"शिक्षण हेच खरे बळ आहे."
​त्यांच्या महान कार्यामुळेच आज स्त्री शक्ती प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने उभी आहे.

​ #सावित्रीबाईफुले

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨​युवा जागर ट्रस्ट हे नवीन वर्ष २०२६, आपल्या समाजातील दोन अत्यंत महत्त्वाच्या घटकांना स...
01/01/2026

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨
​युवा जागर ट्रस्ट हे नवीन वर्ष २०२६, आपल्या समाजातील दोन अत्यंत महत्त्वाच्या घटकांना समर्पित करत आहे—आपल्या 'दिव्यांग' बांधवांची जिद्द आणि 'थॅलेसेमिया'शी लढा देणाऱ्या योद्ध्यांचा संघर्ष.
​त्यांचे धैर्य आपल्याला रोज प्रेरणा देते. यावर्षी फक्त स्वतःच्या प्रगतीचा नव्हे, तर त्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा संकल्प करूया. त्यांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरूया.
​चला, एक संवेदनशील समाज घडवूया! 🙏

📣 आनंदाची बातमी! युवा जागर ट्रस्टचा एक महत्त्वाचा टप्पा! 🚀आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की 'युवा जागर ट्रस्ट',...
24/12/2025

📣 आनंदाची बातमी! युवा जागर ट्रस्टचा एक महत्त्वाचा टप्पा! 🚀
आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की 'युवा जागर ट्रस्ट', यवतमाळ ने ८०जी (80G) आणि १२ए (12A) नोंदणीसाठी अधिकृतपणे अर्ज केला आहे!
हे पाऊल संस्थेच्या कामात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि भविष्यात आमच्या उदार देणगीदारांना कर लाभाची (Tax Benefits) सुविधा देण्यासाठी उचलण्यात आले आहे.
तुमच्या विश्वासाबद्दल आणि सततच्या पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. चला, एकत्र मिळून 'अक्षमतेपलीकडे क्षमता आणि वेदनांपलीकडे धैर्य' निर्माण करूया! 💪✨
👉 आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आणि देणगी देण्यासाठी कृपया इमेजमधील QR कोड स्कॅन करा.

#यवतमाळ #सामाजिककार्य Milestone

"बजावू आपले कर्तव्य, घडवू देशाचे भवितव्य."   #
20/12/2025

"बजावू आपले कर्तव्य, घडवू देशाचे भवितव्य."

#

We are honored to be selected for the prestigious Saathi Fellowship by Dignity Academia Foundation after a rigorous proc...
11/12/2025

We are honored to be selected for the prestigious Saathi Fellowship by Dignity Academia Foundation after a rigorous process. This recognition stands as a testament to our commitment to creating meaningful impact in the social sector.
Empowering Communities in Yavatmal
In the remote villages of Yavatmal, many individuals live with sickle cell anemia, thalassemia, and physical disabilities—facing daily challenges of inadequate healthcare, poverty, and social stigma.

For over five years, Yuva Jaagar Trust has been working tirelessly to empower these communities through medical aid, blood donation drives, disability support, and skill training—helping families reclaim dignity, confidence, and independence.

Through the Saathi Fellowship, we are now scaling our mission to build sustainable systems for health, inclusion, and social empowerment.
Together, let’s support this journey toward a healthier, more inclusive future for all.

YuvaJaagarTrust

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'युवा जागर ट्रस्ट' तर्फे क...
06/12/2025

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'युवा जागर ट्रस्ट' तर्फे कोटी कोटी प्रणाम. 🙏
​त्यांचे विचार आणि कार्य आम्हा तरुणांसाठी सदैव प्रेरणादायी राहील

Address

Yavatmal
445001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuva Jagar Trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share