Ovee.org

Ovee.org Ovee is a non profit organization, that works in development sector with special focus on early childhood education, parenting and community development.

कधी कधी एक छोटासा आधारही कोणाच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणतो.विशेषतः जेव्हा परिस्थिती कठीण असते आणि गरज खरी असते.सध्या...
25/04/2026

कधी कधी एक छोटासा आधारही कोणाच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणतो.विशेषतः जेव्हा परिस्थिती कठीण असते आणि गरज खरी असते.
सध्या वाढत्या उन्हात पत्र्याच्या शेडमध्ये बसून अभ्यास करणाऱ्या आमच्या मुलांची अवस्था पाहून आम्ही या परिस्थिती विषयी आपल्या सामाजिक गटावर मेसेज टाकला. मनात होतं हळूहळू काहीतरी होईल.मेसेज टाकताच समोरून इतक्या तातडीने आणि मनापासून प्रतिसाद येईल, याची कल्पनाही नव्हती.
नेहमीप्रमाणेच, कुठेही काही अडचण आली की आपल्या सर्वांच्या मदतीला धावून येणारे *आमचे लाडके राठी काका* पुन्हा एकदा ठामपणे आमच्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्या संवेदनशीलतेतून आणि मनापासूनच्या पुढाकारातून आमच्या तिन्ही सेंटरसाठी महत्त्वाची मदत मिळाली. *मोहनलाल शांताबाई चॅरिटेबल फाउंडेशन, यवतमाळ यांच्या माध्यमातून बालनगरी धनगरवाडी साठी एक मोठा कूलर, इचौरी बालनगरी साठी २ फॅन आणि पिंपळगाव सेंटर साठी एक कूलर* मदत स्वरूपात प्राप्त झाले. ही मदत म्हणजे फक्त साधनांची उपलब्धता नाही, तर या मुलांच्या शिक्षणाला मिळालेला दिलासा, त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि या प्रवासात मिळालेली एक नवी ऊर्जा आहे.
गावातील अनेक मुलांनी इतका मोठा कूलर पहिल्यांदाच पाहिला. प्रत्येक जण घरून एक एक लहान हंडा पाणी घेऊन आला, सगळ्यांनी मिळून कूलर भरला, आणि त्या थंड हवेत बसून अभ्यास सुरू झाला. त्या क्षणी “मदत” म्हणजे काय असते, हे खऱ्या अर्थाने जाणवलं.कोणत्याही गाजावाजाशिवाय, निस्वार्थ भावनेतून दिलेला हा आधार आमच्यासाठी खूप मोलाचा आहे.
राठी काका,तुमची ही साथ, तुमचं हे प्रेम आणि संवेदनशीलता आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहील. मनापासून धन्यवाद!आम्ही खूप कृतज्ञ आहोत 🙏

ओवी फाउंडेशन परिवार

20/01/2026
15/01/2026

बालनगरीतील मुलांनी दिल्या
गावातील लोकांना शुभेच्छा.

At the beginning of the New Year, as a selfless act of giving and compassion, children at OVEE Foundation’s Balnagari re...
02/01/2026

At the beginning of the New Year, as a selfless act of giving and compassion, children at OVEE Foundation’s Balnagari received warm sweaters through the support of Sewa Connect and Antyodaya Foundation, with the kind involvement of Dr. Neha from Lata Agrawal Foundation.
This thoughtful gesture brought warmth, happiness, and bright smiles the children were truly very happy.
Heartfelt thanks to everyone who made this meaningful act and helped begin the year with care and kindness. 💛
Hashtags:




AntyodayaFoundation
LataAgrawalFoundation
DrNeha
NewYearKindness
SharingWarmth
ChildrenHappiness

Honoured to be part of the Wipro Education Fellowship community!Celebrating 10 years of the Wipro Fellowship with remark...
27/11/2025

Honoured to be part of the Wipro Education Fellowship community!

Celebrating 10 years of the Wipro Fellowship with remarkable alumni from across the country — all united by a shared commitment to strengthening public education.

Proud to represent Ovee Foundation and to continue our mission of enabling meaningful learning for every child. 🌱✨

Together, we learn. Together, we grow. Together, we make a difference.







बालदिन 2025 — भोयर बालनगरीमध्ये आनंद, अभिमान आणि शिकण्याचा सोहळा! ✨आज बालदिनानिमित्त भोयर येथील बालनगरीमध्ये मुलांनी उत्...
14/11/2025

बालदिन 2025 — भोयर बालनगरीमध्ये आनंद, अभिमान आणि शिकण्याचा सोहळा! ✨

आज बालदिनानिमित्त भोयर येथील बालनगरीमध्ये मुलांनी उत्साहाने सहभाग घेत सुंदर कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला वंदन करून झाली. मुलांनी त्यांच्या धैर्य, संघर्ष आणि आदिवासी समाजासाठी केलेल्या लढ्याविषयी मनापासून भाषणे केली.

त्यानंतर मुलांनी चाचा नेहरू यांच्याविषयीही माहितीपूर्ण भाषणे सादर केली. बालप्रेम, शिक्षणासाठीचे त्यांचे काम आणि देशाबद्दलचे विचार मुलांनी अतिशय सुंदर मांडले.

खेळ उपक्रमांची मेजवानी:
यानंतर मुलांसाठी खास आयोजित केलेले खेळ उपक्रम घेतले गेले. त्यामध्ये प्रश्नमंजुषा या खेळात मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. सर्वांनी छान सहभाग घेतला, नवनवीन गोष्टी शिकल्या आणि भरपूर मजा केली.

खाऊने कार्यक्रमाची गोड सांगता:
कार्यक्रमाच्या शेवटी मुलांना केळी देऊन दिवसाचा आनंद अधिक गोड करण्यात आला.



20/07/2025

📚 मला लहान मुलांसाठी समाजसुधारकांवर आधारित जुनी / नवीन पुस्तके हवी आहेत 🙏

1ली ते 6वीच्या वयोगटातील मुलांना समाजसुधारकांची ओळख व्हावी यासाठी सोप्या भाषेतील, चित्रांसह छोटी पुस्तके हवी आहेत.

📖 जुनी असतील तरीही चालतील.

जर तुमच्याकडे अशी पुस्तके असतील तर कृपया खालील पत्यावर पाठवाल.

संपर्क: धम्मा प्रणाली - 094235 70988

📍 Registered Address: C/O Plot N.24, Surbhi Nagar, Near by Balaji Mangal karyalay,Pimpalgaon Road,Yavatmal-445001, Maharashtra, इंडिया

Who says today’s kids don’t read?Yes, it's true that children these days are often glued to their phones, tablets, or TV...
19/05/2025

Who says today’s kids don’t read?
Yes, it's true that children these days are often glued to their phones, tablets, or TV screens. But that doesn’t mean they don’t enjoy reading!

When we surround them with books that are rich, colorful, and aligned with their age, emotions, and interests – they dive into stories with joy and wonder. Children do read when books speak their language and spark their imagination.

To nurture a love for reading, we must build a vibrant, book-friendly environment. Once that magic is created, screens take a backseat, and books become their favorite companions.



Development Centre (Yavatmal)
A collaborative initiative of Pagaria Welfare Foundation and Ovee.org

18/05/2025

*बुक ट्रेझर – वाचनातून आनंददायी शोधयात्रा!**ज्ञानज्योती डेव्हलपमेंट सेंटर(यवतमाळ )* हे शहरी वस्तीतील मुलांसाठी कार्यरत असलेले एक विकास केंद्र आहे. येथे मुलांनी अधिकाधिक वाचन करावे, आणि त्यातून त्यांची विचारशक्ती, कल्पनाशक्ती व आकलनशक्ती वाढावी यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात. आम्ही केवळ पुस्तकं “घेऊन वाचून संपवणं” या पद्धतीला प्रोत्साहन देत नाही, तर पुस्तकातील आशय, पात्रं, संदर्भ आणि शिकवण या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, समजून घ्याव्यात यावर भर देतो. गेल्या काही दिवसांत मुलांनी जवळपास ४०-५० पुस्तके वाचून काढली. त्यानंतर या वाचनातुन त्यांनी काय आत्मसात केलं, हे समजून घेण्यासाठी आम्ही एक अनोखा आणि रंजक उपक्रम *‘बुक ट्रेझर’ म्हणजेच खजिना शोध* आयोजित केला. या उपक्रमात मुलांना पुस्तकांशी संबंधित कोडी देण्यात आली. जमिनीवर अनेक पुस्तके मांडण्यात आली होती आणि प्रत्येक मुलाला एक कोड्याची चिट्टी देण्यात आली. त्यांनी ते कोडे सोडवून योग्य पुस्तक शोधायचं होतं. सुरुवातीला थोडा गोंधळ होता, पण हळूहळू त्यांनी एकमेकांना विचारून, चर्चा करून आणि गटात काम करत उत्तरे शोधायला सुरुवात केली. कोडे सोडवताना त्यांच्या मेंदूला खूप काम लावावे लागले . निरीक्षण, स्मरण, विचार आणि कल्पना यांचा छान मिलाफ पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, शेवटचं कोडं *पुस्तकाबाहेरील “खजिना”* शोधण्यासाठी होतं, पण त्यांची पूर्वकल्पना पुस्तकाच्या चौकटीतच अडकलेली असल्याने बरेच अंदाज आणि विचारमंथन झाले. शेवटी त्यांनी खजिना शोधून काढला आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद खूपच बोलका होता. या उपक्रमानंतर त्यांना चविष्ट खाऊ चिवडा आणि चॉकलेट्स देण्यात आले. त्यानंतर सर्वांनी मिळून गटात खेळणी खेळत दिवसाची सुंदर सांगता केली. एकत्र खेळताना त्यांचं हास्य, मोकळेपणा आणि आनंद बघताना खरोखर समाधान वाटलं.*‘बुक ट्रेझर’* हा उपक्रम मुलांसाठी केवळ एक खेळ नव्हता, तर त्यांच्या वाचनातील समज, सहकार्य, चिकाटी आणि आनंद यांचा एक अविस्मरणीय अनुभव होता.*ज्ञानज्योती डेव्हलपमेंट सेंटर(यवतमाळ )**(पगारिया फाउंडेशन आणि ओवी फाउंडेशन यांचा सयुक्त *Book Treasure – A Joyful Quest Through Reading!**Dnyanjyoti Development Center (Yavatmal)* is a community-based development center working with children from urban settlements. The center consistently organizes engaging activities to encourage reading, aiming to enhance children's thinking skills, imagination, and comprehension.Here, we do not merely promote reading books for the sake of finishing them. Instead, we focus on helping children remember and understand the content, characters, contexts, and lessons from the stories they read.Over the past few weeks, the children read around 40–50 books. To explore what they had absorbed from their reading journey, we organized a unique and exciting activity called “Book Treasure” a treasure hunt based on books!In this activity, riddles related to the books were given to the children. A variety of books were displayed on the ground, and each child received a chit containing a clue. They had to solve the riddle to find the correct book. Although there was some confusion at first, the children gradually began collaborating, discussing, and solving the clues as a team. Their brains were actively engaged using observation, memory, logic, and creativity in tandem.A particularly special moment came with the final riddle, which led them to a *“treasure beyond the book.”* Most children initially searched only within the boundaries of the books, resulting in lively speculation and deep thinking. Eventually, they found the treasure, and the joy on their faces was truly heartwarming.To celebrate their success, the children were treated to a delicious snack of chivda and chocolates. The day concluded with group games, laughter, and a spirit of togetherness. Watching them play freely and joyfully was incredibly fulfilling.‘Book Treasure’ was not just a game for these children ,it was a memorable experience filled with learning, teamwork, persistence, and delight through the magic of reading.*Dnyanjyoti Development Center (Yavatmal)**(A collaborative initiative of Pagaria welfare Foundation and Ovee Foundation)* .ovee.org.in | Pranali Dhammanand | Pratham Books' StoryWeaver | Pratham Books | Inspirer's Tribe | Pagaria Welfare Foundation

Address

Plot Number 24, Surabhi Nagar, Near Balaji Mangal Karyalaya, Pimpalgaon Road
Yavatmal
445001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ovee.org posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Ovee.org:

Share