आरंभ सामाजिक प्रतिष्ठान

  • Home
  • India
  • Virar
  • आरंभ सामाजिक प्रतिष्ठान

आरंभ सामाजिक प्रतिष्ठान Ngo working for social cause

 जगाचा पोशिंदा असणाऱ्या आपल्या मराठवाड्यातील शेतकरी बांधवावर गेल्या महिन्या अखेरीस ओल्या दुष्काळाचे संकट ओढवले. जळगावं म...
29/10/2025


जगाचा पोशिंदा असणाऱ्या आपल्या मराठवाड्यातील शेतकरी बांधवावर गेल्या महिन्या अखेरीस ओल्या दुष्काळाचे संकट ओढवले. जळगावं मधील माळ पिंप्री ,
देवपिंप्री,नेरी दिगर,नेरी बुद्रुक,करमाड
या गावांमधील काही माहितीतल्या कुटुंबाचे अतोनात नुकसान झाले आहे त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या आधाराची गरज आहे अशी माहिती तिथे स्वतः कार्यरत असणाऱ्या डॉ.अशोक पांडव यांच्या माध्यमातून रॉबिन लोपीस यांना समजली. त्याप्रमाणे मग त्यांना कसली गरज आहे याची माहिती घेऊन आरंभ मार्फत मदतीसाठी आवाहन करण्यात आले.

तुमच्या सारख्या सगळ्या संवेदनशील मित्र मैत्रिणींनी सढळ हस्ते केलेल्या सहकार्यामुळे आपण 46 रेशन किट तयार करू शकलो आणि ते रॉबिन लोपीस यांनी स्वतः जाऊन गरजू व्यक्तींपर्यंत दिवाळी अगोदर पोहचवले सुद्धा.
रॉबिन स्वतः गेल्यामुळे तिथे परिस्थिती नक्की काय आहे आणि त्यांना काय हवं आहे त्यांच्याशी बोलून त्याप्रमाणे किट मधे बदल करता आले. आपण दिलेले कपडे आणि रेशन किट योग्य ठिकाणी पोहोचवता आले.
या सगळ्या कामी मोलाचा हातभार लावणारे विनोद राठोड, पल्लवी देशपांडे, प्रवीण भालेराव, नेल्सन डिमेलो, अर्चना पहूरकर, जितेंद्र रंगन, मनीष दळवी, शाम परुळेकर, शैला परेरा, हर्षदा वाघमारे, गणेश दाते, पद्मश्री परुळेकर, आशिष कवळी,वैशाली पडवळ, लक्ष्मण चेल्लिंगी, शशिकांत खांडेकर, अविनाश कुलकर्णी, सुधा कदम, मंगला परब, बोनिता फुटर्डो, फ्रांसिस लोपीस, जेरोल्ड लोबो यांचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद.या कामी फिल्ड वर महत्वपूर्ण भूमिका बजावणारे रॉबिन लोपीस,आचार्य इंटरप्रायसेस चे दिलीप आचार्य, मेलकम परेरा, डॉ.अशोक पांडव,जगन्नाथ झांबरे,सतीश कोलते,अनिकेत पांडव, डॉ.सोपान पाटील,रमेश पाटील,प्रतापनाना पाटील,संजय पाटील, अनिल सूर्यवंशी,एस. बी.सोनावणे यांचे हि मनःपूर्वक धन्यवाद.
तुमच्या सगळ्यांची सुहृदयता आणि सहकार्यामुळेच आपण आपल्या बांधवासाठी आपला खारीचा वाटा पोहोचवू शकलो.
काही वेळेस असे वाटते निसर्ग वेगवेगळ्या रूपात आपण केलेल्या चुकांची शिक्षा देत असतो पण त्यातूनहि माणसातले माणुसपण जिवंत आहे की नाही हे हि तपासत
असतो. शेवटी संकटकाळी एकमेकांच्या पाठी भक्कमपणे उभे राहणे हेच माणूसपणाच पहिलं लक्षण आहे आणि आपल मन अजून संवेदनशील/ जागृत आहे की नाही हे समजण्याची खरी खूण आहे.
🖋️ अमृता पुरंदरे
आरंभ सामाजिक प्रतिष्ठान

दिवाळी म्हणजे रोषणाईचा, आनंदाचा, उत्साहाचा सण. जिथे प्रेम, आपुलकी, मायेने एकत्र आलेली माणसं असतात, जिथे आपले- परके पणाचा...
24/10/2025

दिवाळी म्हणजे रोषणाईचा, आनंदाचा, उत्साहाचा सण. जिथे प्रेम, आपुलकी, मायेने एकत्र आलेली माणसं असतात, जिथे आपले- परके पणाचा भाव विसरून सगळे एकमेकांना आनंद वाटण्यासाठी आणि दुःखी चेहऱ्यावर काही काळ हास्य यावे यासाठी मिळून प्रयत्न करतात तेव्हा तिथे खऱ्या अर्थाने मनामनातली दिवाळी साजरी होते.
आरंभ सामाजिक प्रतिष्ठानतर्फे सालाबाद प्रमाणे याही वर्षी न्यू लाईफ फौंडेशन या वृद्धाश्रमात वृद्धांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम तसेच फराळ वाटप करून दिवाळी साजरी केली. आयुष्यात कटू अनुभव अनुभवलेल्या
वटवृक्षांना थोड्या वेळासाठी का होईना मायेचा ओलावा देता आला त्यासाठी माध्यम होता आलं यासारखी दुसरी स्वामींकृपा नाही.
या सगळ्यात महत्वाची भूमिका बजावणारे शलाका शिंदे, रॉबिन लोपीस, शशिकांत खांडेकर, प्राजक्ता शंभरकर, शिल्पा खांडेकर आणि प्रत्येक दात्यांचे मनःपूर्वक धन्यवाद.
या कार्यक्रमाद्वारे सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल राजेश मोरो आणि सरिता मोरो यांचेही आभार.
यावेळी संत ज्ञानेश्वर सिनेमा मधलं एकच गाण आठवतेय
ज्योत सें ज्योत जगाते चलो
प्रेम की गंगा बहाते चलो,
राह मे आये जो दीन दुखी
सब को गले सें लगाते चलो
प्रेम की गंगा बहाते चलो
तुम्ही कधीतरी अशी दिवाळी साजरी करून बघा खूप आनंद आणि समाधान मिळेल.
🖋️अमृता पुरंदरे
आरंभ सामाजिक प्रतिष्ठान

जागतिक महिला दिनानिमित्त जामऋषी नगर, वाघेश्वरी मंदिराजवळ वायशेतपाडा नंबर 2, मालाड पूर्व मुंबई येथे महिलांसाठी सॅनेटरी नॅ...
19/03/2025

जागतिक महिला दिनानिमित्त जामऋषी नगर, वाघेश्वरी मंदिराजवळ वायशेतपाडा नंबर 2, मालाड पूर्व मुंबई येथे महिलांसाठी सॅनेटरी नॅपकिन, नाश्ता व पाणी बॉटल वाटपचा कार्यक्रम करण्यात आला. हा कार्यक्रम एनएनआर ग्लोबल लॉजिस्टिक इंडिया प्रायव्हेट ली. यांनी प्रायोजित व आरंभ सामाजिक प्रतिष्ठान आणि प्रसन्न फाउंडेशन यांनी आयोजित केला होता.सदर कार्यक्रमात महिलांची स्वच्छता आणि सामाजिक कर्तव्य याबद्दल माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात एनएनआर इंडिया चे गजानन पाटील, नूतन महाडिक,मयुरी किनलेकर, स्नेहा साळवी, आशिष पाटकर आरंभ सामाजिक प्रतिष्ठान व प्रसन्न फाउंडेशन चे अमृता पुरंदरे व श्रद्धा अष्टीवकर उपस्थित होते.
कार्यक्रमास महत्वपूर्ण वस्तू प्रायोजित केल्याबद्दल एन एन आर इंडिया आणि त्यांच्या उपस्थित सगळ्या कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. कार्यक्रम आयोजनात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या प्रसन्न फाऊंडेशन च्या श्रद्धा
अष्टीवकर यांचे हि आभार. कार्यक्रम आयोजनात उत्तम भूमिका निभावणाऱ्या पूनम ताई आणि त्यांच्या सहकारी महिला तसेच श्री दत्ताराम बिरारी व श्री बाळासाहेब पाडेकर यांचेहि आभार.या कार्यक्रमात जमलेल्या बहुतांश महिलांना या घरकाम करणाऱ्या आहेत. जगण्यासाठी रोज किती संघर्ष करावा लागतो आणि त्यामधेही आनंदी कसं रहावं हे त्यांना भेटून समजलं.तुम्हीही कधीतरी नक्की असा कार्यक्रम करून बघा खूप समाधान मिळेल.
स्वस्थ रहा. मस्त रहा आणि स्वतःची काळजी घेत रहा.
🖋️अमृता पुरंदरे
आरंभ सामाजिक प्रतिष्ठान

दिवाळी मनामनातली-आठवणींची चकली , भावनांचे लाडू ,आनंदाश्रु /दु:खश्रुंचे अनारसे , चांगल्या वाईट घटनांची सरमिसळ करून बनवलेल...
02/11/2024

दिवाळी मनामनातली-
आठवणींची चकली , भावनांचे लाडू ,आनंदाश्रु /दु:खश्रुंचे
अनारसे , चांगल्या वाईट घटनांची सरमिसळ करून बनवलेला चिवडा आणि बरंच काही...
आरंभ ने सालाबाद प्रमाणे याहि वर्षी न्यू लाईफ फाऊंडेशन वृद्धाश्रमात दिवाळी साजरी केली पण हे करताना बाजूच्या आदिवासी पाड्यातल्या मुलामुलींना वृद्धाश्रमात आणून त्यांच्यासाठी खेळ आणि वृद्धांसाठी गाणी असा आजी आजोबा आणि लहान मुलामुलींना एकत्र आणून वृद्धांना त्यांच्या बालपणात नेण्याचा एक प्रयत्न केला.
मुलामुलींसाठी चमचागोटि, पीठपैसा, ग्लास बॅलन्ससिंग, तळ्यात मळ्यात असे खेळ घेण्यात आले.शशिकांत ने जुन्या गाण्यांनी माहोल तयार केला 'मै हू डॉन' वर काही जण नाचले तर 'जीवन के सफर मे गुजर जाते है वो मकाम फिर नही आते'आणि 'जीना यहाँ मरना यहाँ' सारख्या गाण्यावर भावनिक झाले.एक आजी तर चक्क तेरा वर्षांनंतर आता नाचत होती.
हि दिवाळी खूप सारा आनंद आणि समाधान देणारी ठरली. हे सगळं घडवून आणणारे स्वामी आणि सद्गुरु यांचे मनःपूर्वक धन्यवाद तसेच या कार्यक्रमासाठी मोलाचा हातभार लावणारे शलाका शिंदे, शालिनी शंभरकर,वैशाली पडवळ, श्री सदगुरुकृपा ट्रॅव्हलकर चे शशिकांत खांडेकर आणि रॉबिन लोपीस यांचेही मनःपूर्वक धन्यवाद.
तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य होतेय.
तुम्हीही कधीतरी हा अनुभव नक्की घेऊन बघा दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हांला हि गायला भाग पाडेल " आली माझ्या घरी हि दिवाळी... "
🖊️ अमृता पुरंदरे
आरंभ सामाजिक प्रतिष्ठान

Late postगेल्या 1-2 महिन्यात सद्गुरू कृपेनें काही सेवेमधे माध्यम होण्याची संधी मिळाली.1.  मुंबईची एक मुलगी बंगलोर येथे व...
31/07/2024

Late post
गेल्या 1-2 महिन्यात सद्गुरू कृपेनें काही सेवेमधे माध्यम होण्याची संधी मिळाली.
1. मुंबईची एक मुलगी बंगलोर येथे व्यक्तिमत्व विकास आणि बेसिक संगणक ज्ञान हा दिव्यागांसाठी असणारा कोर्स करण्यासाठी गेली आहे . तिथे तिच्या हॉस्टेल चे दोन महिन्याचे भाडे भरण्यासाठी मदत हवी आहे तर आपण काही करू शकतो का अशी आकाश निंबाळकर सरांच्या मार्फत विचारणा झाली. मुलगी हुशार आहे आणि या कोर्समुळे ती कुठे ना कुठे स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल या हेतूने प्रयत्न केला आणि तो सफल झाला ही.
2) विरार येथे राहणारे एक रिक्षा चालक आहेत आणि ते सिनेमा, टीव्ही सिरीयल मधेही छोटं मोठं काम करायचे. अचानक पक्षाघताचा झटका आला आज एक बाजू काम करेनाशी झाली त्यातच किडनीचा त्रास ही उद्भवला . मुलगी 2री मधे आणि पत्नी गृहिणी असल्याने कर्त्या पुरुषाची अशी अवस्था झाल्याने घरची परिस्थिती बिकट झाली. त्यांना adult diaper ची गरज असल्याचे रॉबिन लोपीस यांच्यामार्फत समजले आणि तात्काळ त्यांच्या पर्यंत ते 2 महिने पोहोचवण्यात आले.
3) वरील व्यक्ती साठी औषधंची गरज होती. ती महिनाभराची औषधं त्यांच्या पर्यंत पोहोचवण्यात आली.
यासाठी मदत करणारे लीना देशपांडे, प्रज्ञा साने, जानारोसा फर्नांडिस,सायली साळवी, सुधीर जोशी, पद्मश्री परुळेकर यांचे मनपूर्वक धन्यवाद. आकाश निंबाळकर , रॉबिन लोपीस आणि अजित जाधव यांचेही आभार. तुमच्या सगळ्यांमुळेच हे शक्य झालं.
वरील व्यक्तींना अजूनही मदतीची आवश्यकता आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे ते आर्थिक स्वरूपात किंवा adult diaper किंवा औषधाच्या स्वरूपात मदत करू शकता.
बऱ्याच लोकांना मदत करायची इच्छा असते पण त्यासाठी ते योग्य ठिकाण आणि वेळेची वाट पाहत असतात अशा वेळेस तुम्ही जर तुमच्या आजूबाजूलाच पाहिलं तर तिथेही अनेकांना तुमच्या मदतीची खरी गरज असते आणि तिथे स्वतः जाऊन तुम्ही मदत देऊ शकता.
त्यामुळे याचा नक्की विचार करा ही विनंती.
स्वस्थ रहा, मस्त रहा,हसत रहा आणि महत्वाचं दुसऱ्यांना मदत करत रहा 🙏.
काही वैयक्तिक कारणामुळे पोस्ट टाकण्यास विलंब झाला त्याबद्दल क्षमस्व.

अमृता पुरंदरे
आरंभ सामाजिक प्रतिष्ठान

Address

Virar

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आरंभ सामाजिक प्रतिष्ठान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to आरंभ सामाजिक प्रतिष्ठान:

Share