28/08/2023
म्हसवड - कर्करोग मानवाच्या चुकीच्या जीवन पध्दती व आहार पद्धती तसेच व्यसनामुळे उद्भवतात. तसेच मानवाच्या शरीरातील अनियंत्रित पेशीत झालेली वाढ यामुळे कर्करोग होऊ शकतो हा आजार झाला तर घाबरुन जावू नये वेळीच योग्य उपचार रुग्णांना मिळाल्यास पूर्ण पुणे बरा होऊ शकतो असे वक्तव्य नाशिक येथील कर्करोग तज्ज्ञ डाॅ मुकूल घरोटे यांनी केले.
ते म्हसवड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे सर्वज्ञ सेवा संस्थेच्या वतीने कर्करोगाबाबत मार्गदर्शन व तपासणी शिबिरात मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी सर्वज्ञ सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष इंजि. नितिन तिवाटणे, व सर्वज्ञ परिवारातील सदस्य डॉ जितेन्द्र तिवाटणे , श्री नितीन चिंचकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना डॉ घरोटे पुढे म्हणाले,
कर्करोग म्हणजे काय? हा काही संसर्गजन्य आजार नाही तो काही एकमेकांच्या संपर्कात आला म्हणून होत नाही मानवाच्या शरीरातील अनियंत्रित पेशीतील वाढ जीवन संगोपन आणि मरण हे मानवाच्या शरीराला एकदाच असले तरी मानवाच्या शरीरातील नवीन पेशी दररोज निर्माण होतात त्यांचे संगोपन रोज होते व त्या रोज मृत्यु होतात. जीवन मरणाची हि सायकल मानवासाठी एकदा असली तरी मानवाच्या शरीरातील पेशींना ती दररोजची आहे.
मानवाने तंबाखू, सिगारेट, खैणी, मावा, दारु या गोष्टींच्या व्यसनामुळे व भाजीपाल्या वरील प्रमाणापेक्षा जास्त किटकनाशक वापरलेल्या भाज्या आपण कच्च्या खाल्ल्या तर त्यांने देखील कर्करोगाला निमंत्रण मिळते
मानवाच्या शरीरात अनियंत्रित पेशी वाढल्यामुळे कर्करोग होऊ शकतो.
कर्करोगाची लक्षणे मानवाच्या शरीराच्या कोणत्याही भागावर आलेली नदुखणारी गाठ तिच्या कडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय तज्ज्ञांना दाखवून तपासणी करून घ्यावी व तज्ञांच्या सल्ल्यानुसार त्वरीत उपचार सुरु करावेत
मागील पंधरा वीस वर्षांपूर्वी गावात एखादाच कर्करोगाचा रुग्ण सापडायचा पण आता हे प्रमाण वाढत चालल्याचे दिसून येते.
वेळीच आजार डाॅक्टरांना दाखवला वेळीच उपचार रुग्णांने घेतले तर
कर्करोग पूर्ण पुणे बरा होऊ शकतो. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन ही यावेळी केले.सौ रश्मी देशमाने यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले
यावेळी शिबिरात रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात श्री आप्पासाहेब पुकळे , श्री नितीन दोशी ,श्री चैतन्य देशमाने श्री तुषार विरकर तसेच विविध स्तरातील मान्यवर आणि महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.