आम्ही चाफळकर फाऊंडेशन
- Home
- आम्ही चाफळकर फाऊंडेशन
"चैतन्याची फुलवा झाडे , दया जगण्याला अर्थ नवा. अडले नडले उचला, ज्यांना आधाराचा हाथ हवा" !
Address
Telephone
Website
Alerts
Be the first to know and let us send you an email when आम्ही चाफळकर फाऊंडेशन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
Contact The Organization
Send a message to आम्ही चाफळकर फाऊंडेशन:
-
Want your organization to be the top-listed Non Profit Organization?
Our Story
समाजात काम करताना समाजऋण फेडण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यात गुणवंतांनी, ज्ञानवंतांनी, भाग्यवंतांनी आणि कष्टकर्यांनी आपले ज्ञान, अपार कष्ट, मेहनत, चिकाटी व प्रामाणीकपणा या जोरावर विविध क्षेत्रात जे यश प्राप्त केलेले असते ते समाजापुढे येणे महत्त्वाचे असते. अशा कर्तृत्वान , गुणी , हुशार दुरदुर्ष्टी असलेलया विविध क्षेत्रातील , समाजातील, तरुणांचे व त्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्याकडून भावी आयुष्यात अधिक चांगले समाजोपयोगी व दिशादर्शक कामे होऊन त्यांच्या कार्यांचा झेंडा सर्वत्र फडकावा व कौटुंबिक जबाबदारी बरोबर सामाजीक बांधीलकी जपण्यात त्यांचा हातभार लागावा या हेतू चाफळ व चाफळ पंचक्रोशी मधील परंतु नोकरी निमित्त गावाबाहेर असलेलया तरुणांसाठी "आम्ही चाफळकर फौंडेशन" या अभेद्य संघटनेची ची स्थापना करण्यात आली असून अधिकृत संस्थेची नोंदणी करण्यात आली आहे . आज हि संस्था समाजासाठी एक आदर्श असून आज पर्यंत संस्थेने चाफळ पंचक्रोशीमध्ये शैक्षणीक तसेच सामाजिक एकता आणि त्याबरोबर तरुण देशभक्ती आणि सामाजिक जाणीव याचा वेगळा संदेश दिला असून आज मितीला या संघटनेत ५० पेक्षा ज्यास्त तरुण देशातून , परदेशातून आपला हातभर देत असून संस्थेने एक स्वतःची वेगळी ओळख समाजाला करून दिली आहे.
आज समाज माध्यमांचा वापर करुन काय होवु शकतं याचं सुंदर उदाहरण आम्ही जगासमोर ठेवलं . चाफळ सारख्या ग्रामीण भागातील उदरनिर्वाहासाठी शहरात गेलेल्या तरुणांना वाॅट्सप सारख्या माध्यमातून एकत्र आणून एका समाज हितकारी सामाजीक संघटनेची स्थापना केली . आपल्या कमाईतील ठरावीक हिस्सा एकत्र जमा करुन चाफळ सारख्या दुर्गम खेड्यात आरोग्य शिबीरं , वृक्षारोपण , ग्रामस्वच्छता , नदी स्वच्छता , गरीब विद्यार्थी दत्तक योजना , गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहीत्य वाटप , शिक्षणासाठी मार्गदर्शन, विद्यार्थीआणि शेतकरी गुणगौरव , अपादग्रस्त कुटुंबांना मदत , किल्ले आणि क्रिडा स्पर्धांचं आयोजन अशा प्रकारे दर वर्षी सातत्याने उपक्रम सुरु केले .