Umred Youth Foundation

Umred Youth Foundation A Youth Enrichment Initiative "Umred Youth Foundation" is an NGO working in the vicinity of Umred for the Betterment specially of the youth in Society.

This Foundation keeps organising various Community and Personality development programs such as Blood donation camps, different medical diagnostics camp, and providing various usable and academic materials to needy students, Social and other cultural activities.

03/08/2026
*योगमित्र मंडळाचा*  *उमरेड येथे आंतरराष्ट्रीय योगदिन सोहळा* –     योगमित्र मंडळ उमरेड, उमरेड युथ फाउंडेशन आणि गुरुकुल ऍक...
21/06/2026

*योगमित्र मंडळाचा*
*उमरेड येथे आंतरराष्ट्रीय योगदिन सोहळा* –
योगमित्र मंडळ उमरेड, उमरेड युथ फाउंडेशन आणि गुरुकुल ऍकाडमी उमरेड यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सामुहिक योगासन वर्गाची सुरुवात आमदार संजयजी मेश्राम, नगराध्यक्षा प्राजक्ता कारू ,माजी आमदार राजू पारवे,माजी आमदार सुधीर पारवे,माजी नगराध्यक्षा श्रीमती विजयलक्ष्मी भदोरीया, उमरेड युथ फाउंडेशन चे संस्थापक अनिल गोविंदांनी, संयोजक सचिन कुहिकर,अध्यक्ष मनिष बालपांडे, सचिव समर भगत,भाजपा शहर अध्यक्ष सतीश चौधरी यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आली.यावेळी मिशन लक्ष्यवेद साठी निवड झालेल्या गुरुकुल अकॅडमीच्या चार विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी योगासनामुळे शरीराची लवचिकता वाढते आणि स्नायू मजबूत होतात.ध्यान आणि प्राणायमामुळे मनाला स्थिरता लाभते आणि नकारात्मकता दूर होते असे विचार प्रतिपादन केले. सुमित्रा हेडाऊ यांनी ईश्वर प्रणिधान घेतल्यानंतर योगमित्र मंडळाचे योगशिक्षक व मुख्य मार्गदर्शक श्री राजकुमार पांडे यांनी उपस्थित योगसाधका कडून आसन व प्राणायाम करवून घेतले. गजानन ठाकरे यांनी आसनांचे प्रत्यक्षीक सादर केले.सूत्रसंचालन मंगला व्यवहारे यांनी केले. कार्यक्रमाचे शेवटी अमिता अग्रवाल यांनी योगगीत सादर केले व त्यानंतर प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. योग मित्र मंडळ उमरेड च्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने जीवन विकास वनिता विद्यालय , जीवन विकास विद्यालय ,नूतन आदर्श महाविद्यालय,दिवाणी व फौजदारी न्यायालय उमरेड येथे विशेष योग वर्ग घेण्यात आले. सर्व योग साधकांनी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात योगाभ्यास केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे कार्यकर्ते वसुधा खंते, कृष्णा हेडाऊ, शरद व्यवहारे, विनोद खोडे,ज्योती सारडा, संजय मुळे, गजानन भोयर, सतीश गुप्ता, मुकुंदा नागपूरे ,निखिल नखाते, शारदा जयस्वाल ,अमिता वाकडे.शालिनी सोनटक्के , प्रदिप चिंदमवार,विजय जैसवानी,रितेश राऊत,रोशन पोकळे,विलास रायपूरकर,संजय चाचरकर,विशाल बावणे, आशिष वंजारी,गौरव मिश्रा,मुकेश गौतम,सतीश चकोले,सौरभ भिवगडे,इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Address

Umred
441203

Alerts

Be the first to know and let us send you an email when Umred Youth Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share