20/04/2026
फुले आंबेडकर प्रबोधन पर्व, उमरखेड २०२६ च्या आयोजन समितीने जिव्हाळा संस्थेच्या सातत्यपूर्ण, निःस्वार्थ आणि समाजाभिमुख कार्याची दखल घेऊन संस्थेचा जो सन्मान केला, तो आमच्यासाठी केवळ गौरव नव्हे तर जबाबदारीची जाणीव करून देणारा प्रेरणादायी क्षण आहे.
या सन्मानाबद्दल आयोजन समितीच्या सर्व आदरणीय पदाधिकारी व मान्यवरांचे जिव्हाळा संस्थेच्या वतीने मनःपूर्वक, कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. हा सन्मान आम्हाला महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर अधिक ठामपणे चालत, वंचित-दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी अधिक प्रभावी, व्यापक आणि समर्पित कार्य करण्याची नवी दिशा व ऊर्जा देणारा आहे.
भविष्यातही सामाजिक न्याय, समता आणि मानवतावादी मूल्यांच्या प्रसारासाठी अशाच सहकार्याने एकत्र वाटचाल घडावी, हीच अपेक्षा. 🙏
#जिव्हाळा