28/04/2026
ठाणे, दि. 27 एप्रिल : ध्यास कम्युनल डेव्हलपमेंट फाउंडेशन (DCDF) यांच्या मार्फत मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांच्या सहकार्याने सिद्धी हॉल, ठाणे येथे “बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2021 (JJ Act 2021)” या विषयावर ठाणे शहरातील पोलीस अधिकाऱ्यांसाठी एक दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सदर प्रशिक्षण Tata Institute of Social Sciences (TISS) RCJJ, प्रोजेक्ट चे श्री. अॅड. विजय बाविस्कर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडले. या प्रशिक्षणामध्ये बालकांच्या संरक्षणासंबंधित कायदेशीर तरतुदी, बालकांशी संबंधित प्रकरणे हाताळताना आवश्यक असलेल्या प्रक्रिया व पोलीस अधिकाऱ्यांची जबाबदारी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमास ठाणे शहर Child Protection Unit यांच्या PSI निलीमा जाधव यांची उपस्थिती लाभली. प्रशिक्षणादरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून विविध शंका निरसन केले.
सदर प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला असून, यामुळे पोलीस अधिकाऱ्यांच्या बाल संरक्षण विषयक कार्यक्षमतेत निश्चितच वाढ होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.