18/08/2025
🙏 जय गुरुदेव 🙏
आर्ट ऑफ लिविंग, तुळजापूर आयोजित
श्रावणमास विशेष
रुद्र पुजा
🌼🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸
स्थळ : सुमेरु हॉल, आठवडा बाजार शेजारी, हडको, तुळजापूर ४१३६०१
वेळ: संध्याकाळी 6:00वा
दिनांक: 20 ऑगस्ट बुधवार
रुद्र पुजेबद्दल थोडी माहिती:
👉🏻 रुद्र पुजा म्हणजे काय ?
रुद्र पुजा प्राचीन काळापासून चालत आलेली एक पूजा आहे. या पूजेद्वारे आपल्याला आंतरिक शांती मिळते. अनेक वेदशास्त्र वचनांत रुद्रपूजेचा उल्लेख दुष्ट शक्तींच्या नायनाटासाठी केला आहे. इच्छापूर्तीसाठी रुद्रपूजा एक प्रभावी पुजा मानली आहे.
➡️ रुद्रपूजेत ६ शक्तींचे आवाहन केले जाते. प्रामुख्याने शिव, विष्णुनारायण , गणपती , सूर्य , महादेवी (लक्ष्मी , सरस्वती , शक्ती) आणि गुरुतत्व.
➡️ ४ प्रकारांच्या दोष निवारण कार्यात रुद्रपूजा प्रभावी मानली गेली आहे. यामध्ये
पितृदोष
ग्रहदोष
वास्तुदोष
कर्मदोष
➡️हवामानात होणारे बदल ह्यामुळे वात, पित्त, कफ, ह्यांचे असंतुलन रुद्रपूजेमुळे संतुलित होण्यास मदत मिळते.🌈🌈
👉🏻 रुद्र पुजा का करावी ?
हे जग सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेने भरलेले आहे. जेव्हा आपण शिवला उद्देशून प्रार्थना करतो, कि जेणेकरून ह्या जगातील नाकारात्मकतेमुळे होणारे परिणाम म्हणजे रोग, नैराश्य, असमाधानीपणा निघून जाऊन त्या जागी शांतता, प्रसन्नता, व आनंदी वातावरण सर्वत्र येउदेत. हीच शांतता आपल्या मनाला, शरीराला व आत्म्याला मिळते.
"🌸रुद्रपूजेचा आपल्या चेतनावर, संपूर्ण समाजावर, कुटुंबावर प्रभाव पडतो✨"
आपण रुद्र पूजेत संकल्प घ्यावा..
रुद्रपूजा संकल्प लिंक https://vdst.in/e/69799
प्रवेश सर्वांना खुला आहे.
🙏सर्वांनी रुद्रमंत्र स्नानाचा अनुभव घ्यावा हि नम्र विनंती🙏