पेणकरपाडा

पेणकरपाडा All function Photos And Event's

📍 पेणकरपाडा प्रॉपर्टी कार्डच्या प्रश्नांवर पुढील पाऊल!नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत *मा. अप्पर तहसीलदार यांच्यासोबत सक...
11/08/2026

📍 पेणकरपाडा प्रॉपर्टी कार्डच्या प्रश्नांवर पुढील पाऊल!
नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत *मा. अप्पर तहसीलदार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.*
लवकरच पुढील प्रक्रिया व मार्गदर्शन नागरिकांसमोर जाहीर करण्यात येईल.
एकत्र येऊ... हक्क जपू... गावठाण वाचवू!

पेणकरपाडा गावठाण समितीच्या आजच्या बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार. 🙏बैठकीत शासन नि...
01/08/2026

पेणकरपाडा गावठाण समितीच्या आजच्या बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार. 🙏

बैठकीत शासन निर्णय (GR) संदर्भातील सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या अनेक शंकांचे निरसन करण्यात आले असून, उर्वरित प्रश्न अप्पर तहसीलदारांसमोर मांडून अधिकृत मार्गदर्शन घेण्यात येणार आहे.

लवकरच अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची यादी, अर्ज भरण्यासाठी व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती, तसेच पुढील कृती आराखडा सर्व नागरिकांसमोर जाहीर करण्यात येईल. स्वयंसेवक घराघरात जाऊन नागरिकांना अर्ज भरण्यास मदत करतील, जेणेकरून छाननीदरम्यान कोणतीही त्रुटी राहणार नाही.
एकत्र येऊ... हक्क जपू... गावठाण वाचवू!

— पेणकरपाडा गावठाण समिती

📢 पेणकरपाडा गावठाणाच्या हक्कासाठी निर्णायक बैठक!आज सायं. ७:०० वाजता📍 प्रेमा लक्ष्मण विद्यालय, पेणकरपाडाआपली उपस्थिती अत्...
01/08/2026

📢 पेणकरपाडा गावठाणाच्या हक्कासाठी निर्णायक बैठक!
आज सायं. ७:०० वाजता
📍 प्रेमा लक्ष्मण विद्यालय, पेणकरपाडा
आपली उपस्थिती अत्यंत महत्त्वाची आहे.

28/07/2026

📢 पेणकरपाडा व मिरा-भाईंदरकरांसाठी महत्त्वाची सूचना!

शासकीय (Collector) जमिनीवरील पात्र निवासी अतिक्रमणे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आणि अर्ज प्रक्रियेच्या मार्गदर्शनासाठी पेणकरपाडा गावठाण समितीशी संपर्क साधा.

आपला हक्क, आपले घर! 🏡

🇮🇳 जय हिंद | 🚩 जय महाराष्ट्र | ❤️ जय पेणकरपाडा

03/07/2026

अनिता पाटिल के साथ MLA मेहता को भी आरोपी बनाया जाए

13/06/2026

*न्यायासाठी एकत्र या!* ✊
सत्ताधाऱ्यांची मस्ती उतरवण्यासाठी आणि पीडितेला न्याय देण्यासाठी
📅 १४ जून | ⏰ सायं. ५ वा.
📍 गणेश मंदिर, पेणकर पाडा
– *महिला सुरक्षा समिती, पेणकर पाडा*

न्यायासाठी एकत्रित व्हा!पेणकर पाडा येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाविरोधात 'महिला सुरक्षा समिती'ने आयोजित केलेल्...
13/06/2026

न्यायासाठी एकत्रित व्हा!
पेणकर पाडा येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाविरोधात 'महिला सुरक्षा समिती'ने आयोजित केलेल्या 'जनआक्रोश मोर्चा'मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा. पिडितेला न्याय आणि दोषींना कठोर शिक्षेची मागणी करण्यासाठी आपला आवाज बुलंद करा. बदल घडवण्यासाठी आजच सामील व्हा!
📅 दिनांक: १४ जून २०२६ (रविवार)
🕔 वेळ: सायं ५.०० वा.
📍 प्रारंभ: गणेश मंदिर, पेणकर पाडा
🚶 मोर्च्याचा मार्ग: गणेश मंदिर - शंकर मंदिर - काशिनाथ पाटील चौक - महादेव विभूते चौक - निभांदेवी मंदिर - चिमाजी नगर - शिवशक्ती नगर - एसटीडी तारा नेत्रालय मंदिर - हनुमान मंदिर - शंकर मंदिर मोर्चा संपन्न.
WomenSafety

🚨 पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे! 🚨महिला सुरक्षा समिती, पेणकरपाडा यांच्या वतीने मा. महापौर व उपमहापौर यांना निवेदन सादर क...
11/06/2026

🚨 पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे! 🚨
महिला सुरक्षा समिती, पेणकरपाडा यांच्या वतीने मा. महापौर व उपमहापौर यांना निवेदन सादर करण्यात आले. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाची निष्पक्ष चौकशी, पीडितेला संपूर्ण संरक्षण व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
तसेच, प्रकरणातील आरोपी हे महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. अनिता पाटील यांचे भाऊ असल्याने आणि त्यांच्यावर आरोपीला पाठिंबा दिल्याचे आरोप होत असल्याने, नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशीही मागणी करण्यात आली.
✊ महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड नाही!

Address

पेणकरपाडा गाव, मिरा रोड पूर्व, ठाणे
Thane
401107

Alerts

Be the first to know and let us send you an email when पेणकरपाडा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to पेणकरपाडा:

Shortcuts

Share