Adhar Rekha Pratishthan

Call Directions Website Contact the organization

Adhar Rekha Pratishthan Adhar Rekha Pratishthan is Support Group for Cancer Patients, Survivors and their family members.

*आधार रेखा प्रतिष्ठान ठाणे Adhar Rekha Pratishthan  ! तेरावा वर्धापन दिन सोहळा*  आधार रेखा प्रतिष्ठान या कर्कयोद्धयंसाठी...
20/06/2026

*आधार रेखा प्रतिष्ठान ठाणे Adhar Rekha Pratishthan ! तेरावा वर्धापन दिन सोहळा*

आधार रेखा प्रतिष्ठान या कर्कयोद्धयंसाठी कार्यरत असलेल्या संस्थेचा तेरावा वर्धापन वर्धापन दिन सहयोग मंदिर, ठाणे, येथे मोठ्या सोहळ्यात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या निवेदिका सुजाता नाईक यांनी पाहुण्यांचे, निमंत्रितांचे व सर्व प्रेक्षकांचे स्वागत केले !प्रतिष्ठानच्या प्रथेप्रमाणे श्री मुकुंद गाडगीळ यांना शंख नादासाठी पाचारण केले. शंखध्वनी नंतर डॉक्टर जान्हवी गांगल, स्नेहा नेने, आशा लिंगायत यांनी "हमको मन की शक्ती देना" ही प्रार्थना सुरेल आवाजात सादर केली.
आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर राजेश मढवी, सुरेंद्र दिघे सर यांना सत्कारासाठी व्यासपीठावर निमंत्रित करून अध्यक्ष नितीन गोखले यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला ! माधवी फडणीस यांनी केलेली मधुबनी कलेची सुंदर फ्रेम डॉक्टर मढवी यांना देऊ केली !
संस्थेच्या कार्यवाह रश्मी जोशी यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविकात संस्थेची कामे आतापर्यंत केलेले निरनिराळे उपक्रम याबद्दल माहिती दिली. संस्थेचा लोगो वट वृक्ष आणि त्याचप्रमाणे संस्थेचे विभाग तिच्या वाढलेल्या पारंब्या याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
तेरा वर्षात आपल्या संस्थेचा वटवृक्षाचा विस्तार झालेला आपण सर्वजण पाहतो आहे हा वेगळा विचार रश्मीताईंनी मांडला याचे समाधान सुजाता ताईंनी आपल्या निवेदनात व्यक्त केले. वर्धापन दिनाच्या आधी दरवर्षी निरनिराळ्या प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात. त्याप्रमाणे याही वर्षी काव्यवाचन आणि नाट्य अभिनय या स्पर्धा घेतल्या गेल्या. या स्पर्धेबद्दल मनोगत नचिकेत करंदीकर यांनी स्पर्धेचा निकाल घोषित करताना व्यक्त केले यावर्षी स्पर्धेसाठी स्पर्धकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला असे समाधान व्यक्त केले.
संस्थेचा एक महत्त्वाचा विभाग म्हणजे आधार वाहिनी आधार वाहिनीच्या सारथ्यांचे, त्यांच्या कामाचे,कष्टाचे कौतुक करावे यासाठी वर्धापन दिनाच्या निमित्ताने संस्था त्यांचा दरवर्षी सत्कार करते.याही वर्षी पाहुण्यांच्या हस्ते त्यांना रिलायन्सची क्रेडिट कार्ड्स देऊन सत्कार केला गेला. या सारथीन्ची माहिती सुमिता दिघे यांनी दिली.
आजचे पाहुणे डॉक्टर राजेश मढवी यांचा परिचय करून दिल्यानंतर त्यांना आपले मनोगत व्यक्त करण्याचे विनंती केली, त्यावेळी मढवी यांनी संस्थेच्या उपक्रमां बद्दलची माहिती ऐकून खूप समाधान व्यक्त केले . "इतके वर्ष कार्य करणाऱ्या जवळच्या संस्थेबद्दल मला उशिरा समजले म्हणजे कार्य किती सहजपणे आपलेपणाने चालू आहे यातच संस्थेचे कामाबद्दलचे प्रेम दिसून येते "असे उद्गार त्यांनी काढले.
फार वर्षांपूर्वी पासूनचे संस्थेचे स्वप्न म्हणजे संस्थेची वेबसाईट तयार करणे अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर रश्मी जोशी, नचिकेत करंदीकर, अस्मिता भिडे, उल्हास जोशी यांच्या प्रयत्नानंतर ते उद्दिष्ट आज साध्य झाले ! त्या वेबसाईटचे उद्घाटन डॉक्टर मढवी यांच्या हस्ते झाले. अस्मिता भिडे यांनी वेबसाईटची माहिती दिली.मेघना ओगले यांनी आभार प्रदर्शन केले.वेबसाईट लॉन्चिंग नंतर ब्राह्मण सेवा संघ ठाणे, यांच्यातर्फे'आकाशवाणीहा एक आगळावेगळा कार्यक्रम सादर करण्यात आला ! ज्याकाळात दूरचित्रवाणी, दूरदर्शन या कल्पनाही नव्हत्या त्याकाळी
आकाशवाणी हे एकच मनोरंजनाचे जबरदस्त माध्यम चालू होते ! त्यांचे कार्यक्रम घराघरात अगदी संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून ऐकण्यासारखे असत. आता 70/ 80 च्या वयातल्या ज्येष्ठ व्यक्तींनी या कार्यक्रमाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे, त्या कार्यक्रमाची झलक या चमूने आकाशवाणी कार्यक्रमाद्वारे दाखविली. दोन तासांचा हा कार्यक्रम मिनीटा मिनिटांनी उंचावत गेला. कार्यक्रमाने
श्रोत्यांना आकाशवाणीच्या जुन्या काळात नेऊन मंत्रमुग्ध केले . मंगल प्रभातने सुरू झालेला दिवस शेवटी आपली आवडने संपत असे ,त्याच प्रमाणे ह्या कार्यक्रमातही सुंदर गीते गाऊन या आपली आवडने सांगता केली.त्याचवेळी आधार प्रतिष्ठानच्या सर्व संपूर्ण कार्यक्रमाची ही सांगता झाली !
सुनिता शेजवलकर

बुधवार-२१-१-२०२६🙏नमस्कार,आज संक्रांत स्पेशल आधारमैत्र मध्ये शब्द व बौद्धिक खेळांची वाणं सर्वांनी मनसोक्त लुटली!! दोन अर्...
28/01/2026

बुधवार-२१-१-२०२६🙏नमस्कार,
आज संक्रांत स्पेशल आधारमैत्र मध्ये शब्द व बौद्धिक खेळांची वाणं सर्वांनी मनसोक्त लुटली!!
दोन अर्थ असलेले शब्द (कर,कर),दागिन्यांची नावे,मूक अभिनयातून म्हणी ओळखणे,वेगवेगळे संक्रमणांचे विषय,प्रकार यावर चर्चा करणे, अशाप्रकारे गमतीदार पद्धतीने मेंदूला छान खुराक मिळाला.
संक्रांत वाण व अहंकाराचा त्याग यावरील लेख ,
व पु काळे यांचा विरजण या विषयावरील लेख,
अशोक नायगावकर स्टाईल तिळगूळ विशेष लेख यांचे वाचन झाले.
तिळगूळ, गोड व तिखट पदार्थांचाही आस्वाद घेत सर्वांनी निरोप घेतला🙏

Address

3, First Floor, Anant CHS/Near Karve Hospital, Brahman Society, Thane West
Thane
400602

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adhar Rekha Pratishthan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Adhar Rekha Pratishthan:

Shortcuts

Share