मरहट्टी संशोधन आणि विकास मंडळ, पुणे

  • Home
  • India
  • Thane
  • मरहट्टी संशोधन आणि विकास मंडळ, पुणे

मरहट्टी संशोधन आणि विकास मंडळ, पुणे Archives of language and script, printing books / magazines and literary writing and philosophical work composed by lectures.

* मोरे घराण्याचे पहिले राष्ट्रीय संमेलन * * प्रमुख वक्ते- श्री. संतोष ग. पिंगळे (लेखक- सरंजामी मरहट्टे)* दि. ११ डिसेंबर ...
04/12/2022

* मोरे घराण्याचे पहिले राष्ट्रीय संमेलन *

* प्रमुख वक्ते- श्री. संतोष ग. पिंगळे (लेखक- सरंजामी मरहट्टे)
* दि. ११ डिसेंबर २०२२, वेळ- सकाळी १०:०० ते दुपारी २:०० वा.
* ठिकाण- यशवंतराव मोरे पाटील आश्रमशाळा, मुर्टी- मोढवे, ता. बारामती, जि. पुणे.

- संपर्क -
१) वैभव मोरे-- +917057000077
२) आकाश मोरे-- +919822427978
३) प्रतीक मोरे-- +919403126178
४) सचिन मोरे -- +917303494546
५) महेश मोरे-- +919822648107
६) मयूर मोरे -- 8485864376

* आयोजक - मोरे प्रतिष्ठान, मोढवे (बारामती).

*महाराजा यशवंतराव होळकर स्मृतीदिवस 27 ऑक्टोबर 1811*या महिन्यातील महालक्ष्मी दिनदर्शिका चाळत असताना 28 ऑक्टोबर रोजी महारा...
20/10/2022

*महाराजा यशवंतराव होळकर स्मृतीदिवस 27 ऑक्टोबर 1811*

या महिन्यातील महालक्ष्मी दिनदर्शिका चाळत असताना 28 ऑक्टोबर रोजी महाराजा यशवंतराव होळकर यांचा स्मृतीदिवस लिहल्याचे दिसले. त्यामुळे थोडा गोंधळ झाल्याने या तारखेच्या थोड्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला असता विकिपीडिया तसेच इतर ही अनेक ठिकाणी ही तारीख 28 ऑक्टोबर आढळून आली. जेंव्हा अधिक प्रयत्न केले तेंव्हा मराठीतील प्रसिद्ध कादंबरीकार संजय सोनवणी लिखित भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते महाराजा यशवंतराव होळकर या पुस्तकात तसेच त्यांनी लिहलेल्या ब्लॉग मध्ये ही चुकीची तारीख लिहली गेल्याचे आढळून आले.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=5451809091584148&id=100002653342216

महाराजा यशवंतराव होळकर यांचा स्मृतीदिवस 28 ऑक्टोबर नसून तो 27 ऑक्टोबर आहे. याचे काही दाखले खालील प्रमाणे देता येतील.

भानपुरा येथे महाराजांचा मृत्यु झाल्यानंतर त्या घटनेची माहिती देणारी दोन पत्रे होळकरशाहीच्या इतिहासाची साधने भाग 2 मधील पत्र क्रं 115 व 116 वरती प्रकाशित झाली असून सदर पत्रे अस्सल व त्या दिवशीच लिहली गेली आहेत. त्यामुळे सदर पत्राची विश्वासार्हता नक्कीच जास्त आहे. त्यातील एक पत्र बातमीदाराचे असून दुसरे पत्र दस्तुरखुद्द यशवंतराव होळकर यांचे पुत्र मल्हारराव होळकर यांचे आहे. पत्रातील आशय खालील प्रमाणे...

पत्र क्रं 116

श्री म्हाळसाकांत

" राजश्री भारमल होळकर गोसावी यांस अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य स्नेहांकित मल्हारराव होळकर विनंती उपरी. तीर्थरूप बाबासाहेबांची प्रकृती बेआराम होतीच. कार्तिक शुद्ध 11 शके 1733 शनिवारी वायूचा प्रकोप जास्ती होऊन अंग उडू लागले. यापूर्वी पांचवार वेळा याप्रमाणेच जाला. श्री मार्तंडजीचे कृपे आराम होत गेला ह्यासाठी जे उपचार होते ते झाले. शेवट शनिवार सायंकाळी ज्वरांश वाढला. मागील चार घटका रात्र राहता श्वासाचा उपद्रव पाहून तुला , गोदाने , इ दानधर्म चालून पोथी पुराणांचे पाठ व नामस्मरण त्यात देवी मानवी उपचार ही जाहले. परंतु गुणास न येता शुद्ध 11 प्रथम 11 घटका दिवस वाढता परलोक पावले."

पत्र क्रं 115

बातमीदाराचे पत्र विशेष मुक्काम भानपुरा : "कालपासोन श्रीमंत राजश्री यशवंतराव महाराजांस श्वास उठला होता आज एकादशी भानुवार पावणेदोन प्रहरी महाराजांस देवज्ञा झाली. मोठा अनर्थ जाहला. ईश्वर इच्छेपुढे उपाय नाही. "

या दोन अस्सल पत्राशिवाय तत्कालीन
बंगाल सरकारने महाराजा यशवंतराव होळकर यांच्या म्रुत्यू नंतर त्यांचे पुत्र मल्हारराव होळकर यांना खिल्लत नाकारली होती. त्या घटनेची माहिती बेंगाल पॉल? येथे 30 sep 1814 रोजी प्रकाशित झाली असून त्या मध्ये ही महाराजा यशवंतराव होळकर यांचा म्रुत्यू दिवस हा 27 ऑक्टोबर 1811 हीच तारीख नोंदवली गेली आहे.

प्रा न र फाटक लिखित मराठेशाहीअखेरचा अद्वितीय स्वातंत्रवीर श्रीमन्महाराज यशवंतराव होळकर या 1967 साली प्रकाशित झालेल्या चरित्र ग्रंथात देखील पान क्रं 255 वरती 27 ऑक्टोबर हीच तारीख नमूद केली आहे.

या सर्व साधनांचा अभ्यास करता एक गोष्ट ध्यानात येते ती म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर यांचा स्मृती दिवस कार्तिक शुध्द 11 शके 1733 म्हणजेच 27 ऑक्टोबर 1811 आहे. 28 ऑक्टोबर ती तारीख चुकीची आहे तरी येणाऱ्या 27 तारखेलाच सर्वांनी यशवंतराव होळकर यांना आदरांजली अर्पण करावी.

धन्यवाद
मधुकर सर्जेराव हाक्के
9040500097

संदर्भ

1) महाराजा यशवंतराव होळकर संजय सोनवणी पान क्रं 112 व त्यांचा पर्सनल ब्लॉग

2) होळकरशाहीच्या इतिहासाची साधने भाग 2 वा वा ठाकूर पान क्रं 88 व पत्र क्रं 115 व 116

3) the nantional archive

4) मराठेशाहीअखेरचा अद्वितीय स्वातंत्रवीर श्रीमन्महाराज यशवंतराव होळकर प्रा न र पाठक पान क्रं 255

 #मराठ्यांचे_दिल्लीस_पाय_लागण्यास_कारणीभूत_दमाजी__थोरात.* दमाजी थोरात यांनी बेलभंडारा घेऊन पेशवा बाळाजी विश्वनाथ व त्याच...
15/03/2021

#मराठ्यांचे_दिल्लीस_पाय_लागण्यास_कारणीभूत_दमाजी__थोरात.*

दमाजी थोरात यांनी बेलभंडारा घेऊन पेशवा बाळाजी विश्वनाथ व त्याचा संपुर्ण कुटुंब कबिला बंदी केला होता तर प्रधान नारो शंकर सचिव ह्याला देखील आपल्या बळावर बंदी केले. आणि जबर खंडणी वसूल केल्याशिवाय सोडलेच नाही. हित पर्यंतचा इतिहास सर्वज्ञात आहे. परंतु ज्या बाजीरावांच्या दिल्ली स्वारी चा प्रचंड गाजावाजा केला जातो ह्याची पाळेमुळे ह्याच घटनेत सामावली आहेत.

दमाजी थोरात यांचा पाडाव करण्यासाठी बाळाजी विश्वनाथाला परक्या सय्यद बंधू ची मदत घ्यायला लागली होती. यावेळी बाळाजी विश्वनाथा कडे तोफखाना नव्हता तेंव्हा सय्यद बंधूस आणून दमाजी थोरात यांची हिंगणगावची गढी पाडली होती. व दमाजीला कैद केले.

या उपकाराबद्दल सय्यद हुसेनअली सोबत ससैन्य दिल्लीस जाण्याचे कबूल करावे लागले. यावेळी हुसेनअली बादशहा कडून दक्षिणेतील सहा सुभ्यातील चौथाई व सरदेशमुखी चे हक्क मिळवून देण्याचे ठरले. आणि प्रथम मराठा मंडळाचे पाय दिल्लीस लागले.

संदर्भ : निजाम पेशवे संदर्भ त्र्यंबक शेजवलकर पान क्रमांक 22

धन्यवाद

टीम मरहट्टी

 #राज्यभिषेक_सोहळा  ानेवारी  #किल्ले_वाफगाव #सांगावा_धाडलाय“महाराज साहेब तुमची आज्ञा शिरसावंद्य, मुजर्याला हजर राहीन”
29/12/2020

#राज्यभिषेक_सोहळा
ानेवारी
#किल्ले_वाफगाव
#सांगावा_धाडलाय
“महाराज साहेब तुमची आज्ञा शिरसावंद्य, मुजर्याला हजर राहीन”

 #मरहट्टा #मकाजी_बाबा_देवकाते #हटकरराऊ
08/11/2020

#मरहट्टा
#मकाजी_बाबा_देवकाते
#हटकरराऊ

सारंजामदार मरहट्ट्यांचा ऐतिहासिक दस्तावेज...!!आचार्य अत्रे म्हणायचे की ,महाराष्ट्राला काय तो इतिहास इतरांना फक्त भूगोल.द...
23/08/2020

सारंजामदार मरहट्ट्यांचा ऐतिहासिक दस्तावेज...!!

आचार्य अत्रे म्हणायचे की ,महाराष्ट्राला काय तो इतिहास इतरांना फक्त भूगोल.दख्खन पठारावरच्या अनेक प्रांतांपैकी फक्त महाराष्ट्राने परकीय आक्रमकांविरोधात राष्ट्रीय नेतृत्व दिले.ह्या प्रांतांच्या तत्कालिन रहिवाशांच्या अंगी काही उच्च प्रतीचे मूलभूत गुण होते म्हणून वैभवशाली साम्राज्य ते उपभोगू शकले.महाराष्ट्राचा इतिहास अनेक अंगांने आजही अपूर्ण आहे.अनेक कर्तबगार पुरूष व घराणी ह्यांचा लेखजोखा समग्रपणे मांडला नव्हता.लोकप्रिय व जातनिहाय व्यक्तिमत्वाचे महत्व राखण्यासाठी अनेक दिग्गजांच्या लेखण्या झिजल्या हे सर्वश्रृत आहे.आमच्याकडे संकेत आहे की शूरवीरांचा इतिहास हा शूरवीरांनी लिहावा.हे शिवधनुष्य मरहट्टी संशोधन आणि विकास मंडळ,पुणे ह्या संस्थेचे उमदे व्यक्तिमत्व आणि लेखक श्री संतोष पिंगळे ह्यांनी यशस्वीपणे पेलले आहे.
सदर ग्रंथाची सुरवात प्रशासकीय ऐतिहासिक संकल्पनेच्या स्पष्टीकरणाने होते.मोकासा,सरदेशमुखी,साहोत्रा ह्या सारंजामशाहीच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या संज्ञांची उकल लेखकाने समर्थपणे केली आहे.लेखकाचा संदर्भाबद्दल प्रामाणिकपणा पुस्तकात ठीकठीकाणी जाणवतो.इतिहाच्या गाभ्याला कुठे ही धक्का लागू नये म्हणून लेखक दडपून विधाने करत नाही.पान क्र १३२ वर कागदपत्रांच्या बाबतीत उपलब्धता नसल्यामुळे आपली अडचण लेखक सहज मांडून जातो हा त्याच्या लेखनाचा उदारपणा आहे.
कुठेही लेखनात जातीय किंवा स्वतःच्या अस्मितेचा अभिनिवेश टाळणे हे लेखकाचे यश.
शंभूछत्रपतीं नंतर महाराष्ट्र मोगलाईत रूजलेली सारंजामशाही वाढली फोफावली. तीचा समग्र अभ्यास करणे हे इतिहासाच्या अभ्यासकांची निकड व गरज लेखकाने लक्षात घेतली आहे.दमाजी थोरांतच्या बाबतीत लेखक न्यायाधिशांच्या भूमिकेत उभा राहत नाही तो तटस्थ आहे वाचकाला तो तर्क करण्यास उद्युक्त करतो.सारंजामदारांच्या निष्ठा बदलण्याची कारणे आपापसातील वैरभाव.त्यांच्या मुद्रा हे ज्या पद्धतीने मांडलय ह्याला तोड नाही.सारंजामींची शिवकालीन अथवा शिवपूर्वकालीन पूर्वपीठिका हि बहुतांश महाराष्ट्राला ठाऊक नाही ती समग्रपणे आणि तपशीलवार सदर पुस्तकात मांडली आहे.काही माहित नसलेली आणि अतिशय अपरिचित माहिती लेखक सहज नोंदवून जातो.शिखांच्या स्वातंत्र्ययुद्धाशी आलेला मरहट्टीचा संबंध गुरूबख्श पांढरे प्रकरणात लेखकाने सविस्तर नोंदवला आहे.
प्रथम दर्जाची संदर्भ साधने वापरत व लोककथांना फाटा देत सलग इतिहास मांडणी हि कोठेही रटाळ होत नाही.लेखकाच्या लिखाणाच्या ऐतिहासिक भाषेचा डौल "सांप्रत"तथा"उपर्युक्त"ह्या शब्दांच्या वापरावरून ध्यानात येतो.एक निर्विवाद खरं आहे लेखकाला सदर विषय खंडात्मकरित्या अजून लिहिण्यास भरपूर वाव आहे आम्ही वाचक पुढील खंडांची वाट पाहतोय.
खरतर ह्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला मला व आमचे नवनाथराव पायगुडे ह्यांना उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले आमचे मित्रवर्य राहुलजी गोरे ह्यांच्या माध्यमातून ह्या विषयाच्या आम्ही संपर्कात आलो.सुमीतराव लोखंडे ह्यांच्या समवेत अनेक चर्चा झाल्या त्यांचा ध्येयनिष्ठपणा आणि मरहट्टींच्या इतिहासाबद्दलची तळमळ वाखाणण्याजोगी आहे.निवांत शेळके पाटलांसारखे आमचे मित्र लेखक म्हणून पुढे यावेत हि सदिच्छा. श्री संतोष पिंगळे सरांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

-सचिन शिवाजीराव खोपडे देशमुख .
बारा मावळ परिवार.

* कोळेकर घराण्याचा अपरिचित इतिहास- मरहट्ट भूमीत पशुपालक योद्धा हट्टी जमातीचा इतिहास फार प्राचीन आहे, परंतु मध्यकाळात हट्...
20/08/2020

* कोळेकर घराण्याचा अपरिचित इतिहास- मरहट्ट भूमीत पशुपालक योद्धा हट्टी जमातीचा इतिहास फार प्राचीन आहे, परंतु मध्यकाळात हट्टी वंशाच्या काही शाखा तयार झाल्यामुळे मूळ इतिहासाशी कडी जुळवायला फार प्रयत्न करावे लागतात. उदा. प्राचीन हट्टी जमातीला सध्या पश्चिम महाराष्ट्रात धनगर, झेंडे, मेंढे, हाटकर तर दक्षिण महाराष्ट्रात बंडे, कानडे, हालमथ आणि उत्तर महाराष्ट्रात ठेलारी, हाटकर तर मराठवाडा- विदर्भात बरगे, हाटकर इत्यादी समूहवाचक नावाने ओळखले जाते. सांगली भागात झेंडे आणि मेंढे या दोन समूहाच्या नावाने अनेक हट्टी घराणी वास्तव्यास आहेत. सांगली भागातील कोळेकर (गावडे) घराणे हे स्वतःला झेंडे म्हणवितात. हट्टी जमातीच्या या झेंडे शाखेतील लोक हे अश्वपालन करीत असल्याचे मध्यकालीन उल्लेख आढळतात. यालाच अनुसरून अशी माहिती मिळते कि कोळेकर हे घोडी शिकवून तयार करण्यात तरबेज होते. त्यांनी श्रीमंत पेशवे सरकार यांना ३ व सरदार बापू गोखले यांना १ अमृतराव रामचंद्र बेडकीहळकर यांना १ व इतरतर १० घोडी तयार करून दिली. कारणपरत्वे कोळेकर बंधू ५० पर्यंत स्वार व २०० पायदळात लोक चाकरीस ठेवत असत. पट्टणकुडीच्या लढाईत हिरगोजी यांना छत्रपतींनी ४० बिघे जमीन टाकवडे ता. शिरोळ येथे शिलेदारी नोकरीबद्दल इनाम दिली होती.

कोळेकर घराण्याचा मूळ पुरुष देवराव कोळेकर यांस इ. स. ६०० मध्ये उजनी, जि. सोलापूर येथील देशमुखी असल्याची माहिती मिळते. या कोळेकर घराण्यातील चौथा पुरुष संताजी याने मौजे बाभूळगाव, जि. सोलापूर येथील पाटील वतन मिळविले. यांचे वंशज येळावी येथे आहेत. त्यांनी राजे थोरात यांजकडून गावडकिचे वतन मिळविले म्हणून त्यांना गावडे म्हणतात. इ. स. १२०० च्या सुमारास उजनी देशमुख घराण्यातील १४ वा पुरुष दुसरे देवराव एकदा स्वारीवर असताना त्यांच्या सैन्याचा तळ आरेवाडीचे बनात पडला होता. त्यावेळी श्री बिरदेवाने 'मी आरेवाडीस आलो आहे. माझं देऊळ बांध'. असा दृष्टांत दिला. पुढे लढाईत देवराव ठार झाले. देवरावचे दोन मुलगे धुळोजी व बिराजी यांनी सध्याचे आरेवाडीचे देऊळ बांधले. बहामनीच्या कालखंडात महंमदशहा च्या लष्करातील शेख मिरासरलष्कर या सेनापतीकडे कोळेकर घराण्यातील १९ वा पुरुष बळवंतराव वल्लद यशवंतराव कोळेकर देसाई बहादूर हे होते. त्यांना इ. स. १३७४ मध्ये बादशहाने क. कवठे (एकंद) प्रांत मूर्तिजापूर (मिरज) येथील पाटील वतन व जमीन एकचाहूर व आबदागिरीबद्दल दहा बिघे असे वतन इनाम करून दिले. इ. स.१७६९ मध्ये पेशव्यांच्या सैन्याने हैदरअलीवर स्वारी केली त्यावेळेस सैन्यात धुळोजी व लिंबाजी पाटील कोळेकर कवठे (एकंद) हे दोघे बंधू हजार होते. धुळोजीराव यास चार पुत्र होते यशवंतराव, सुभानराव, हिरगोजी व लिंगोजी.

इ. स. १७०७ ते १७५० पर्यंत कोळेकरांना मिळालेली वतने-
* यशवंतराव कोळेकर इनाम सरंजाम व मोकासा सांगोला, वीरळी व कोडीस.
* राणोजी कोळेकर यास वाटेफळ.
* यशवंतराव हिरोजी कोळेकर यास आसूड व उदनवाडी येथे मोकासा.
* गणोजी कोळेकर यास अकलूज, नाळगाव, मापसे, आवसे, अनसुर्डे, अपचंदे, करंजगाव खुर्द, चिंचोली, दावलमलक्याची किन्हई, थोपटयाची रवंद सांगली, खेडे गंगापूर, गुबारे, घुगी, जवळगाव देवीची मुंगी बु. || धारूरवर्बाचे, निवळी, बामणी, भातागळी, सिगेणेबाल, हळदुगे, हिप्परगी, परगणे आवसे मधील दावांचे परगणे, धारूर मधील गावाचे वापेगाव धुते कणगेर, येळूर.
* विठोजी गणोजी कोळेकर यास सरंजामी उत्पन्न अशी वतने मिळाली होती.

* माहिती संदर्भ- लाट दर्शन- श्री. गणपराव कोळेकर
* फोटो साभार- दाजी कोळेकर (आरेवाडी) मुंबई (बिरुदेवाच्या अख्यायिकेमध्ये सांगितले जाते की, बिरोबा कणकामवाला जिंकून आणण्यासाठी राजासारखा साज करून शामकरण्या वारूवर (घोडा) बसून नारदनगरीला जातो. हा शामकरण्या वारू असा होता की, चारी पाया नेवरा, शेपटाला पुशावरा, कुसाटीला पांढरा, कपाळाला चांदणा, पाठीवर साळुंखा अशीच हुबेहुब रचना असणारा घोडा १९७९ च्या दरम्यान बिरोबा देवालयामध्ये होता. त्याचवेळी सव्वा वर्षे झाडपीडीला (सेवेला) असणारे वाळवा येथील गावडे गुरुजी यांच्या प्रयत्नातून बिरोबा मंदिर, घोडा, योत (वेत)-वाटवा-कांबळा यांसह पुजारी यांचे छायाचित्र. या छायाचित्रामध्ये डावीकडून गावडे गुरुजी, शामराव सयाप्पा कोळेकर (पुजारी), बाळाराम बिरु कोळेकर (कुबडे), महादेव बाबू कोळेकर, बिरु तातोबा कोळेकर (वाडकर), बाळू बिरू कोळेकर (वाडकर) आणि आप्पा धोंडी कोळेकर (ए.डी.) हे दिसत आहेत.)

* महाराष्ट्रात नोवसाजी आणि कर्नाटकात संगोळी- धनगरांचा मरहट्ट भूमीतील लढ्याचा इतिहास पुरातन टोळीयुद्धापासून चालत आला आहे....
15/08/2020

* महाराष्ट्रात नोवसाजी आणि कर्नाटकात संगोळी- धनगरांचा मरहट्ट भूमीतील लढ्याचा इतिहास पुरातन टोळीयुद्धापासून चालत आला आहे. त्याचा शेवट हा ब्रिटीश राजवटीच्या काळातील म्हणावा लागेल. अश्या मरहट्ट भूमीचे सध्या पडलेले दोन महत्त्वाचे भाग म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक आणि त्यातील धनगरांच्या हाटकर आणि कुरुबा या तत्सम जमाती. प्रस्तुत माहिती हि या जमातीतील दोन योद्ध्यांविषयी आहे.

* महाराष्ट्रात नोवसाजी- 'Major R. G. Burton' या इंग्रज अधिकाऱ्याने लिहिले आहे कि, " नांदेड, परभणी आणि पैनगंगा नदीच्या पलीकडच्या भागात एक भयानक असा हटकर समाज राहतो, त्यांनी २० वर्षांपेक्षा जास्त काळापासून त्यांचा पराक्रमी सेनापती नोवसाजी नाईक याच्या नेतृत्वावर तिथे सैन्य तयार केलंय. नांदेड आणि बेरर जिल्ह्यातील पक्के किल्ले, गढी त्यांच्या ताब्यात आहेत." १८१८ मध्ये मराठा साम्राज्य खालसा झाल्यानंतर हैद्राबाद सरकारने बंड करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास सुरवात केली. त्यांनी नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्यातील 'नोवाह ?' (लोहा असावे का ?) येथील हटकरांच्या एका गढीवर आकस्मिक हल्ला केला. नोवसाजी नाईक यांनी मोठ्या जोमाने लढा दिला. त्यांना अरबांची पण मदत मिळाली होती. हा नोवाह गावचा वेढाच खूप दिवसपर्यंत चालला. हे रक्तरंजित युध्द जानेवारीच्या शेवटी संपले.

* हे नोवाहचे युध्द ८ जानेवारी १८१९ ते ३१ जानेवारी १८१९ पर्यंत चालले. या युद्धात हटकरांकडील ५०० अरब, ८० पेक्षा जास्त अति जखमी आणि ४०० योद्धे शहीद झाले. निजामाच्या ५,००० सैन्याविरुद्ध हाटकरानी निकराचा लढा दिला होता. तसेच हैद्रबाद सरकारकडचे १८० सैनिक जखमी आणि २४ मारले गेले. जखमींमध्ये ६ युरोपीय अधिकारी होते. या युद्धात हटकरांना पराभव स्वीकारावा लागला. काही काळानंतर सर्व हटकर नाईकांना पकडून फाशीवर देण्यात आले. नोवसाजी यांना दगा करून पकडण्यात आले. ते युध्द इतके महत्त्वपूर्ण होते कि नंतर रेजिमेंट मध्ये युद्धाच्या विजयानंतर पदक वाटली गेली. या युद्धात हाटकरानी अनेक गनिमी काव्याचे मार्ग अवलंबले होते. ३१ जानेवारी १८१९ ला हाटकरांचे हे युद्ध संपल्याचे माहिती मिळते.

* कर्नाटकात संगोळी- याच गनिमी काव्याने कर्नाटकमध्ये संगोळी रायान्ना यांचा १८२४ पासून ब्रिटीशांविरुद्ध लढा सुरु झाला. सांगोळी हे कित्तूर संस्थानचे सेनापती होते. कित्तूर या राज्याची राणी होती राणी चेन्नम्मा. तिचा विवाह मल्लासर्जा यांच्याशी झाला होतं. त्यांना एक मुलगा होता. परंतु १८२४ मध्ये त्याचे निधन झाले. त्यामुळे राणी चेन्नम्मा ने शिवलिंगप्पा याला दत्तक घेतले आणि गादीवर बसवले. परंतु ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी ने या दत्तकपुत्राला मान्यता दिली नाही आणि त्याची सिंहासनावरून हकालपट्टी केली. परंतु स्वाभिमानी राणी चेन्नम्मा ने ब्रिटीशांविरुद्ध युद्ध पुकारले. हेच ते कित्तुरचे युद्ध. या युद्धात राणी चेन्नम्मा स्वतः घोड्यावर बसून ब्रिटीशांशी लढली. यावेळी राणी चेन्नम्माचा प्रमुख सेनापती होता संगोळी रायन्ना. संगोळी रायन्नानेही पराक्रमाची शर्थ केली. परंतु दुर्दैवाने राणी चेन्नम्माला बेल्लोन्गालच्या किल्ल्यावर पकडण्यात आले. तिचा मृत्यू २१ फेब्रुवारी १८२९ रोजी झाला.

* त्यानंतर मात्र संगोळी रायन्नाने गनिमी काव्याने ब्रिटिशांना चांगलीच झुंज दिली. त्याने गोरगरीब, सामान्य प्रजेतून सैन्य उभे केले. त्यांच्या मदतीने सरकारी मालमत्तेवर हल्ले कारणे, ब्रिटिशांचा खजिना लुटणे, जे सावकार आणि जमीनदार गरिबांना लुबाडत होते त्यांचे जमिनीची कागदपत्रे जाळून टाकणे अशा प्रकारे संगोळी रायन्नाने सामान्य जनतेला उठाव करण्यास प्रोत्साहित केले. परंतु फितुरी आणि दगा हे भारतीय समाजावरील कलंक आहेत. अखेर दगा करूनच ब्रिटीशांनी संगोळी रायन्ना यांना पकडले. २६ जानेवारी १८३१ रोजी बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात नंदगड येथे रायान्ना यांना फाशी देण्यात आले. नंदगड येथे रायान्ना नायकाची समाधी आहे.

* हाटकरांच्या युद्धासंबंधीची काही इंग्रज अधिकाऱ्यांची पत्रे मिळाली आहेत ज्यामध्ये त्यांनी हटकरांच्या युद्धाचे वर्णन केले आहे आणि इंग्रजांना नोवसाजी मस्के नाईक आणि योध्यांचा किती दरारा वाटत होता हे पण दिसून येते. त्याचबरोबर सांगोळी रायान्ना हे देखील इतिहासाच्या पानात हरवून गेले आहेत. हा सोनेरी अक्षरांनी लिहावा असा इतिहास, नोवसाजी नाईक, सांगोळी रायान्ना आणि त्यांचे सर्व सहकारी योद्धे आतापर्यंत सर्वार्थाने उपेक्षितच राहिले आहेत असे म्हणावे लागेल, कारण राष्ट्रीय तर नाहीच पण राज्यातील इतिहास अभ्यासक्रमांच्या पुस्तकात देखील यांचा साधा उल्लेख नाही.

* माहिती सौजन्य- 1) The following is a detailed account of the siege of Nowah as given in Major R. G. Burton's book: A History of the Hyderabad Contingent (pp. 76-78), and the official papers extracted from A Memoir of the Operations of the British Army in India during the Mahratta War of 1817, 1818 and 1819 by Lieut. Colonel Valentine Blacker, published in 1821 (pp. 480-483).
2) (Based upon the account from The Freedom Struggle' in'Hyderabad, Vol. I, (1800-1857)
3) Sarfarosh: A Naadi Exposition of the Lives of Indian Revolutionaries
By K. Guru Rajesh.
4) The South Indian Rebellions: Before and After 1800 edited by Subramanian Gopalakrishnan
5) History of Freedom Movement in Karnataka - Volume 1 by M. V. Krishna Rao, G. S. Halappa - 1962
6) https://en.wikipedia.org/wiki/Sangolli_Rayanna
* फोटो सौजन्य- इंटरनेट

सरंजामी मरहट्टे या संदर्भ ग्रंथाच्या समीक्षेवर लेखकाची प्रतिक्रिया-आमचे प्रिय मित्र माननीय रामभाऊ लांडे पत्रकार व सदस्य ...
07/08/2020

सरंजामी मरहट्टे या संदर्भ ग्रंथाच्या समीक्षेवर लेखकाची प्रतिक्रिया-

आमचे प्रिय मित्र माननीय रामभाऊ लांडे पत्रकार व सदस्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र पु अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर........... यांस,

दैनिक जालना टाइम्स 1 ऑगस्ट 2020 या वृत्तपत्रातील सरंजामे मरहट्टे या आमच्या ग्रंथाची आपण केलेली समीक्षा नुकतीच वाचनात आली त्यातून एक प्रकारे ग्रंथाबद्दलचा आपला अभिप्रायही समजून आला. समीक्षा वाचून आपल्या मनातील काही प्रामाणिक शंकांचा ही बोध झाला, एक लेखक म्हणून आपल्या वाचकांच्या मनातील शंकांचं निरसन करणं हे मी माझं कर्तव्य समजतो आपल्याप्रमाणे इतरही काही वाचकांच्या मनात या शंका डोकावलेल्या असू शकतात. ज्या अद्याप काहींनी व्यक्त केलेल्या असू अथवा नसू शकतील ही गोष्ट गृहीत धरून मी दैनिक जालना टाइम्सच्या च माध्यमातून आपल्या शंकांचं निरसन करत आहे. आपल्या काही महत्त्वाच्या शंका व त्यांची समाधानकारक उत्तरे देण्याचा मी प्रयत्न करत आहे.

१) होळकरांचा उल्लेख सरदार म्हणून का ?

सरदार म्हणजे एखादी किरकोळ आसामी हे आपलं मत का झालं माहित नाही बहुदा आजकाल सोशल मीडियावरती सरदारकीचं जे पीक उगवलेलं आहे त्यावरून आपलं तसं मत होणे स्वभाविक दिसून येतं. सरदार या फारशी मूळ असलेल्या शब्दाचा अर्थ बडा अधिकारी अथवा मनसबदार किंवा श्रीमंत व अभिजात व्यक्ती, नेता,पुढारी असा होतो सुभेदार हा होळकरांना असलेला हुद्दा ग्रंथात कोठेही नाकारलेला नाही तथापि याच हुद्याचा ग्रंथात अनेक ठिकाणी निर्देश ही केल्याचा दिसून येईल. प्रत्यक्ष छत्रपतींच्या रोजकीर्दीत ना केवळ होळकरांना तर प्रत्यक्ष प्रधानपंतालाही सरदार संबोधल्याची उदाहरणे दाखवता येतात. होळकरांखेरीज बंडगर, जाधवराव ,भोसले, महारनवर आदी सरदारांनाही सुभेदार असं संबोधन वापरल्याची उदाहरणे आहेत.( होळकरांचा सुभेदार म्हणून उल्लेख अधिक प्रचुर आहे) तथापि या सर्वांना ग्रंथात सरदार हेच संबोधन वापरलेलं आहे.

२) प्रचलित मताप्रमाणे मल्हाराव यांचे वडील खंडूजी यांचे मूळ आडनाव विरकर व वतन चौगुलकी असल्याचे मत ग्राह्य असता ग्रंथात त्याचे खंडन का ?

मल्हाररावांचे वडील खंडूजी यांचे मूळ आडनाव व वतनासंबंधी कोणताही आक्षेप मी ग्रंथात घेतलेला नाही ,मुद्दा एवढाच आहे विरकर हे आडनाव असता ते मागे पडून होळकर हे आडनाव केव्हापासून रूढ झाले याची स्पष्टता होईल असा कोणताही पुरावा अद्याप उपलब्ध नाही. होळकर घराण्याच्या उपलब्ध असलेल्या काही वंशावळीत हे आडनाव मल्हाररावांच्या काही पूर्वजांसाठीही लागू असल्याचे दिसून येते. तसेच मल्हाररावांना शाहू छत्रपतींनी दिलेल्या देशगावडा वतनाच्या व इनामाच्या काही सनदांमध्ये त्यांचे पिता व आजोबा यांच्या नावाबरोबर केवळ होळकर या एकाच आडनावाचा उल्लेख आहे त्यामुळे वीरकर ऐवजी होळकर असे प्रामुख्याने उल्लेख करण्यात आलेले आहेत.

३) शहाजी राजे यांच्या पदरी मल्हाररावांचा कोणी पूर्वज नसताना तसा उल्लेख या ग्रंथात का ?

शहाजी राजे यांच्या पदरी मल्हाररावांचा कोणी पूर्वज असावा अशी नव्याने उपलब्ध झालेल्या साधनांद्वारे मी केवळ शक्यता वर्तवली आहे. ठाम निर्वाळा दिलेला नाही.ही गोष्ट लक्षात घ्यावी.

४) होळकर राजघराण्याचा सर्व तपशील अधिकृतपणे जाहीर असता व त्याला देशी-विदेशी संशोधक गॅझेट यांची मान्यता असताना मतभिन्नता का म्हणून प्रकट केली असेल ?

इतिहास समकालीन अस्सल पुराव्यांवरून सिद्ध होत असतो, अनेक वेळा इतिहासाची नवीन साधने खरे ऐतिहासिक वास्तव प्रकाशात आणतात आणि जुने रूढ कल्पित मतप्रवाह बाद ठरतात त्यामुळे अनेक नवीन साधनांमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेली ऐतिहासिक मांडणी वास्तवाच्या अधिक जवळ जाणारी असते. एक प्रकारे इतिहासाचे अद्यावतीकरण निरंतर चालू राहणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे कोणी पूर्वी काही मत नोंदवले असल्यास व नवीन संदर्भानुसार ते प्रचलित मत बाद ठरत असल्यास ते एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचे अथवा संस्थेचे मत आहे म्हणून केवळ त्या मतांना चिकटून राहण्यात काही अर्थ नाही. ज्ञानाभिलाषी माणसाने असा मोह ठेवणे इष्ट नाही असे आमचं मत आहे.

- संतोष ग पिंगळे (लेखक- सरंजामी मरहट्टे)

Address

Thane

Telephone

+18169141554

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मरहट्टी संशोधन आणि विकास मंडळ, पुणे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share