Womens Welfare Foundation

Womens Welfare Foundation Women’s Welfare Foundation a non-profit organization in the country working since 2014

05/09/2026

किन्नर महोत्सव 2026

प्रसार माध्यमांचे धन्यवाद 🙏
05/09/2026

प्रसार माध्यमांचे धन्यवाद 🙏

किन्नर महोत्सव 2026.....कल्याण डोंबिवली महानगरपालिका व किन्नर अस्मिता यांचे संयुक्त विद्यमाने महापालिकेमार्फत अतिशय दिमा...
05/09/2026

किन्नर महोत्सव 2026.....
कल्याण डोंबिवली महानगरपालिका व किन्नर अस्मिता यांचे संयुक्त विद्यमाने महापालिकेमार्फत अतिशय दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन !
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर ॲड.हर्षाली चौधरी (थवील), आयुक्त अभिनव गोयल, सभागृह नेते वरुण पाटील, शिवसेना - उबाठा गटनेते उमेश बोरगावकर, महापालिका सचिव किशोर शेळके, महिला वर बालकल्याण सभापती मा सारिका जाधव किन्नर अस्मिताच्या फाऊंडर गुरु निता केणे, किन्नर आखाडा आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी, मा. मृगेशन शिवसुब्रमण्यम द हमसफर ट्रस्ट,सोशल ॲन्जेन्डर राईट ॲडव्होकेट डॉ.सान्‍वी जेठवानी, आर्यन पाशा किन्नर समुदायाचे इतर मान्यवर उपस्थित होत महापालिकेच्या समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड, समाज विकास अधिकारी मा. प्रशांत गवाणकर तसेच इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.तृतीय पंथीय कलाकांरामार्फत भव्य कलाविष्काराचे आयोजन करण्यात आले. तृतीय पंथीयाना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले

#कल्याणडोंबिवलीमहानगरपालिका

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागातर्फे अभिनव उपक्रममहानगरपालिकेच्या वतीने तृतीय पंथी नागरिकांसाठी मोफत...
29/03/2026

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागातर्फे अभिनव उपक्रम
महानगरपालिकेच्या वतीने तृतीय पंथी नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर महिला कल्याण केंद्र यामध्ये राबविण्यात आला.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत मोफत टी.बी, एच आय व्ही, एच बी टी एक्स रे तपासणी करण्यात आली
आशा वर्कर यांनी आयुष्मान कार्ड, आभा कार्ड याबाबत मोफत सेवा दिली.
तसेच वूमन्स वेलफेअर फाऊंडेशन संस्थेमार्फ़त मोफत समुपदेशन करण्यात आले,
फोर्टिज हॉस्पिटल यामार्फत ब्लड शुगर, रक्त तपासणी अशा वेगवेगळ्या पद्धतीची आरोग्य तपासणी करण्यात आली, त्यामध्ये महापालिकामार्फत मोफत अन्न धान्य वाटप करण्यात आले,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योत्स्ना हांडे यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर महापालिकेच्या उप आयुक्त, कांचन गायकवाड, समाज विकास अधिकारी प्रशांत गवाणकर, नगरसेवक शिक्षण समिती सदस्य मा. प्रतीक पेणकर, नगरसेवक शिक्षण समिती सदस्य मा. जतीन प्रजापती, आरोग्य विभागाच्या शहर क्षयरोग अधिकारी डॉ.पौर्णिमा ढाके,वूमन्स वेलफेअर फाऊंडेशन संचालिका मिनाक्षी उज्जैनकर व किन्नर अस्मिता सदस्य मा.सिमरन केणे उपस्थित होते

या कार्यक्रमाला १६० हुन अधिक तृतीय पंथी यांची तपासणी करण्यात आली.
यावेळी किन्नर समुदायाचे इतर मान्यवर, कार्यक्रमाला महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका
Womens Welfare Foundation
International Transgender Health camp

19/03/2026




कल्याण डोंबिवली महानगरपालिका , महिला व बालकल्याण विभागांतर्गत, वुमन्स वेल्फेअर फाऊंडेशन मार्फत, प्रोजेक्ट डायरेक्टर अणि समुपदेशक सौ. आरती बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली, समुपदेशकांची टीम, डोंबिवली पूर्व येथील #हॅप्पी_होम या वृद्धाश्रमात जवळपास 50 निवासी आजी आजोबांना भेटायला अणि त्यांचे समुपदेशन करण्यासाठी दिनांक 17 मार्च 2026 रोजी गेली होती.

तेथील आजी आजोबां सोबत संवाद साधल्यानंतर तेथील व्यवस्थापक श्री. राजेश यादव यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करत वुमन्स वेल्फेअर फाऊंडेशनचे आभार मानले.

वृद्धाश्रमात समुपदेशन करण्यासाठी खालील समुपदेशकांनी मनापासून आजी आजोबांशी संवाद साधला.

स्वाती डोलारे
विनिता माने
कृतीका मोरे
रुतीका दामले
अमृता गायकवाड

19/03/2026




कल्याण डोंबिवली महानगरपालिका महिला अणि बालकल्याण विभागांतर्गत वुमन वेल्फेअर फाऊंडेशन ने बिर्ला कॉलेज मधील 11 वी अणि 12 वी च्या शिक्षकांसाठी समुपदेशक अणि प्रोजेक्ट डायरेक्टर सौ.आरती बनसोडे यांचे सत्र आयोजित केले होते.

सत्र संपल्यावर शिक्षकांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना घेतलेला विडिओ....

असे सत्र प्रत्येक शाळेत अणि कॉलेज मधील शिक्षकां साठी होणे ही काळाची गरज बनत चालली आहे.

Womens Welfare Foundation    वुमन्स वेलफेअर फाऊंडेशन मार्फत कल्याण येथील बिर्ला कॉलेज मध्ये प्रोजेक्ट डायरेक्टर सौ. आरती...
17/03/2026

Womens Welfare Foundation

वुमन्स वेलफेअर फाऊंडेशन मार्फत कल्याण येथील बिर्ला कॉलेज मध्ये प्रोजेक्ट डायरेक्टर सौ. आरती बनसोडे यांनी तेथील जुनियर कॉलेजच्या शिक्षकांना समुपदेशन केले.

सध्याचे वातावरण बघता बदलणारी पिढी, शिक्षकांची कामे अणि वैयक्तिक आयुष्य यांचा समतोल साधून आनंद कसा मिळवायचा यावर त्यांनी चर्चा करत समुपदेशन केले.

Womens Welfare Foundation     'sदि. 08 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका व वुमन्स वेलफे...
11/03/2026

Womens Welfare Foundation 's
दि. 08 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका व वुमन्स वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी हॉस्पिटल व राजीव गांधी मेडिकल कॉलेज येथे साफसफाई विभाग मधील सर्व सफाई कर्मचारी सोबतमहिलांमधील मानसिक तणाव, घरगुती हिंसाचार, समाजात महिलांवर होणारे अत्याचार, स्वतःचे संरक्षण कसे करणे, ज्येष्ठ नागरिक मधील वाढलेलं वृद्धाश्रमाचे प्रमाण, त्यांच्या समस्या...या विषयांवर या विषयांवर संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापक ज्योत्स्ना हांडे यांनी खुप सुंदर प्रकारे समुपदेशन सत्र घेतले . या सत्र करिता हॉस्पिटल मधील डॉ. स्वप्नाली कदम (डीन) मॅडम, आशुतोष मालंगावकर सर तसेच साफसफाई कर्मचारी विभाग प्रमुख अनिल मोपाडे सर , रिटा मोरस मॅडम यांचे सहकार्य लाभले.यावेळी वूमन्स वेलफेअर फाउंडेशन संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापक ज्योत्स्ना हांडे, वैष्णवी कांबळे, व हर्षिला नरवडे उपस्थित होत्या.

Address

Thane

Alerts

Be the first to know and let us send you an email when Womens Welfare Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Womens Welfare Foundation:

Shortcuts

Share