झेप प्रतिष्ठान

झेप प्रतिष्ठान समाजातील दुर्बल घटकांसाठी झटणारी सामाजिक संस्था...झेप प्रतिष्ठान..

झेप प्रतिष्ठानतर्फे गेल्या आढवड्यात सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील रुईघर आणि शिंदेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळ...
30/07/2026

झेप प्रतिष्ठानतर्फे गेल्या आढवड्यात सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील रुईघर आणि शिंदेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळाना computer आणि शैक्षणिक साहित्यच वाटप करण्यात आले होते. आवाज शिक्षकांचा या वृतपत्राने त्याची दखल घेतली.. 🙏

जिल्हा परिषद शाळा वाघाचीवाडी,तालुका मुरबाड जिल्हा ठाणे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरीची वाडी तालुका मुरबाड जिल्हा...
25/07/2026

जिल्हा परिषद शाळा वाघाचीवाडी,तालुका मुरबाड जिल्हा ठाणे तसेच
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरीची वाडी तालुका मुरबाड जिल्हा ठाणे येथील ६० मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

आषाढी दरम्यान झेप प्रतिष्ठानची अशीही शैक्षणिक वारी..!आज झेप प्रतिष्ठानतर्फे मुरबाड येथील शिरोशी केंद्र शाळा परिसरातील १४...
18/07/2026

आषाढी दरम्यान झेप प्रतिष्ठानची अशीही शैक्षणिक वारी..!

आज झेप प्रतिष्ठानतर्फे मुरबाड येथील शिरोशी केंद्र शाळा परिसरातील १४ शाळांमधील तसेच झुगरेवाडी येथील भीमाद्री विद्यालयातील अशा एकूण ५०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल आणि चित्रकला वह्यांचा समावेश होता.

या प्रसंगी झेप प्रतिष्ठानतर्फे किरण गोळे, संदीप गोळे, अनिल औताडे, सिद्धांत बोचरे, अर्चना शिंदे, भूमी लाहोट, हितेश लाहोट आणि विजय घोरपडे उपस्थित होते. तसेच या उपक्रमाला मोलाचे सहकार्य करणारे श्री. हरीश अधारी सरही उपस्थित होते. शाळेतर्फे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद तसेच पालक मोठ्या संख्येने भर पावसातही उपस्थित होते.

मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी झेप प्रतिष्ठानतर्फे नेहमीच प्रामाणिक प्रयत्न केले जातात. या प्रत्येक उपक्रमात झेप प्रतिष्ठानला साथ देणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींचे आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत.

18/07/2026

झेप प्रतिष्ठानतर्फे मुरबाड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 500 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच, झेप प्रतिष्ठानने दत्तक घेतलेल्या भीमाद्री विद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य वाटप केले जात आहे.

झेप प्रतिष्ठान

18/07/2026

झेप प्रतिष्ठानतर्फे मुरबाड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच, झेप प्रतिष्ठानने दत्तक घेतलेल्या भीमाद्री विद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य वाटप केले जात आहे.

|| झेप प्रतिष्ठान ||कधी काळी माझ्यावरपण हीच वेळ आलेली होती.. मित्रांची पुस्तके, नोट्स घेऊन त्यांच्या घरी 10 फेऱ्या मारून...
16/07/2026

|| झेप प्रतिष्ठान ||

कधी काळी माझ्यावरपण हीच वेळ आलेली होती.. मित्रांची पुस्तके, नोट्स घेऊन त्यांच्या घरी 10 फेऱ्या मारून, त्यांच्या दरवाज्याजवळ उभं राहून, रात्री मित्र झोपल्यावर त्यांच्याकडून पुस्तकं घेऊन अभ्यासासाठी आणि आयुष्यात अयशस्वीपणाचा शिक्का लागू नये म्हणून परिस्थितीशी दोन हात करत शिक्षणाच्या गंगेत न्हाऊन निघालो.. आणि अशी परिस्थिती इतरांवर येऊ नये म्हणून झेप प्रतिष्ठान च्या माध्यमातून शिक्षणासाठी इतरांना मदत करण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांच्या आणि दानशूर व्यक्तिंच्या माध्यमातून सतत झटत असतो..

आमचे मित्र श्री Sanjay Jadhav यांच्या मार्फत मुंब्र्यातील एका कुटुंबातील वडील अंध असलेल्या आणि आणि घरकाम करणाऱ्या दोन मुलींच्या पुस्तकांसाठी विचारणा झाली. परिस्थितीची माहिती घेत लगेच झेप प्रतिष्ठानच्या ग्रुप वर पोस्ट केली. शून्य मिनिटात आमच्या एका दानशूर व्यक्तीने लगेच या मुलींसाठी मदत पाठवली आणि ज्या मुली पुस्तकांशिवाय जवळपास २ आठवडे कसाबसा अभ्यास करणाऱ्या मुलींना एका क्षणात पुस्तके उपलब्ध करून मिळाली.

ही तीच माणसे आहेत ज्यांनी माझ्यासारख्या स्वतः अशा प्रकारच्या खस्ता खाल्ल्या आहेत आणि अशी समाजाप्रती भान जपणारी माणसं या जगात आहे आणि ती झेप प्रतिष्ठान सोबत जोडली गेली आहे याचा मला अभिमान आहे.. 🙏🙏

रामकृष्ण हरी! ज्ञानोबा माऊली तुकाराम!🙏दोन दिवसापूर्वी रविवारी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तु...
14/07/2026

रामकृष्ण हरी! ज्ञानोबा माऊली तुकाराम!🙏

दोन दिवसापूर्वी रविवारी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. सासवड – लोणी काळभोर मार्गे उरळी कांचनकडे प्रस्थान करणाऱ्या या दिव्य वारीत १३ किलोमीटर चालत वारकरी संप्रदायातील भक्ती, समता, शिस्त, सेवा आणि संस्कार यांचा अद्भुत अनुभव घेता आला.

शेकडो वर्षांची अखंड परंपरा जपणारी ही वारी केवळ धार्मिक यात्रा नसून मानवतेचा, सेवाभावाचा आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारी जीवनशाळाच आहे.

याच पवित्र प्रसंगी झेप प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेकडो वारकरी बांधवांना बिस्किटांचे वाटप करून अल्पशी सेवा करण्याची संधी मिळाली, याचे मनस्वी समाधान वाटते. संतांच्या चरणी ही सेवा अर्पण करताना मन कृतार्थ झाले.

माऊलींच्या कृपेने अशीच सेवा करण्याची प्रेरणा आणि शक्ती झेप प्रतिष्ठान मधील सर्वाना लाभो, हीच प्रार्थना! 🙏🚩

झेप प्रतिष्ठान तर्फे या उपक्रमासाठी अनिल औताडे, समीर कदम, मनोज भिलारे आणि संदीप गोळे वाडी मधे सहभागी झाले..
ज्ञानोबा माऊली तुकाराम!

रामकृष्ण हरी!

12/07/2026

🙏 रामकृष्ण हरी! जय जय रामकृष्ण हरी! 🙏

आज अनेक वर्षांनंतर संतांच्या पवित्र पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभले. आज पालखी लोणी काळभोरहून उरळी कांचनच्या दिशेने प्रस्थान करत आहे आणि या अविस्मरणीय वारीचा एक छोटासा भाग होण्याचा आम्हाला योग आला, ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि समाधानाची बाब आहे.

शेकडो वर्षांची अखंड परंपरा, लाखो वारकऱ्यांची अढळ श्रद्धा, अनुशासन, समता, सेवा आणि भक्ती यांचा अद्भुत संगम म्हणजे आपली वारी. येथे श्रीमंत-गरीब, मोठा-लहान असा कोणताही भेद नाही; प्रत्येकजण “माऊली” म्हणून एकमेकांना सन्मान देतो. ही केवळ धार्मिक यात्रा नसून समाजाला एकात्मता, संस्कार, शिस्त आणि मानवतेचा संदेश देणारी एक महान जीवनशाळा आहे.

या पवित्र वातावरणातील काही क्षण आपण सर्वांसोबत फेसबुक लाईव्हद्वारे शेअर करत आहे. चला, या भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेऊया आणि संतांच्या विचारांचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवूया.

ज्ञानोबा माऊली तुकाराम!�रामकृष्ण हरी! विठ्ठल विठ्ठल! 🙏🚩

09/07/2026

Address

Thane
400601

Alerts

Be the first to know and let us send you an email when झेप प्रतिष्ठान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to झेप प्रतिष्ठान:

Shortcuts

Share