26/03/2026
दिवस सोन्याचा... दिवस ठाण्याचा...
प्रत्येक शहराच्या, नगराच्या, गावाच्या इतिहासात एक दिवस असतो... एक असा दिवस जो इतिहासात ठळकपणे नोंदला जातो... एक असा दिवस जो इतिहासाला कलाटणी देतो... एक असा दिवस जो त्या नगराला, शहराला, गावाला त्याची जुनी ओळख पुन्हा मिळवून देतो... आपल्या ठाणे शहराच्या इतिहासातला असा दिवस म्हणजे २७ मार्च...
२८९ वर्षांपूर्वी काय घडलं होतं २७ मार्च रोजी???
२७ मार्च १८३७ हा का ठरला ठाणे शहराचा मुक्ती दिन?? कोणा पासून आणि कसं मुक्त झालं ठाणे शहर??
आणि त्या आधीचं ठाणे कसं होतं?? १० व्या शतकापासून श्रीस्थानक हे नाव या शहराने कसं मिरवलं ?? उत्तर कोकणाची राजधानी श्रीस्थानक किती समृद्ध होती आणि कोणी कोणी राज्य केलं या श्री स्थानकामधून ???
जाणून घेण्यासाठी ऐकायला या...
" बखर ठाण्याची... गाथा श्रीस्थानकाची .. "
दीनदयाळ प्रेरणा केंद्र, ठाणे आयोजित
ठाण्याच्या इतिहासाचे अभ्यासक, मुक्त पत्रकार
मकरंद जोशी यांचे व्याख्यान
शुक्रवार दि. २७ मार्च २०२६
वेळ - सायंकाळी ६.०० वाजता.
ठिकाण - श्रीराम व्यायाम शाळा, पहिला मजला,
डॉ . मूस पथ, गडकरी रंगायतन समोर, ठाणे ( प)