16/07/2026
आषाढी वारीत मोफत आरोग्यसेवेकरिता २१ निसर्गोपचार (Accupunture) थेरेपिस्ट, डॉक्टर्स आणि ४० हून अधिक वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांचा सहभाग.
सातारा – आषाढी वारी निमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी ठाण्यातील आसरा फाउंडेशन तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या (आरोग्यम, sacred light फॉउंडेशन नवी मुंबई, सह्याद्री आरोग्य वर्धनम नाशिक, महावीर acupuncture, आसरा मुक्तागण फाउंडेशन, पवित्राय ग्लोबल ट्रैनिंग हब ठाणे, प्राकृतिक चिकित्सालय कल्याण, आशिर्वाद ट्रेडिशनल हेल्थ केअर, कृष्णा आरोग्य वर्धनम पुणे व आदी) सामाजिक संस्थांच्या सहकार्याने, लोणंद (सातारा) येथील समता माध्यमिक आश्रम शाळा येथे सलग चौथ्या वर्षी संस्थेचे सचिव सूर्यवंशी सर यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच मोफत औषध वाटपाचे आयोजन करण्यात आले.
या सेवाभावी उपक्रमात २१ निसर्गोपचार (Accupunture) थेरेपिस्ट, डॉक्टर्स आणि ४० हून अधिक वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यानी आपला सहभाग नोंदवत वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली. अनेक वारकऱ्यांना आवश्यक औषधे आरोग्यम संस्थेमार्फत मोफत वितरीत करण्यात आली.
या सेवाकार्यातील अनुभव सांगताना आसरा फाउंडेशनचे विश्वस्त प्रदीप पाटील म्हणाले, *'वारी पंढरीची, सेवा आरोग्याची'* हे केवळ आमच्या उपक्रमाचे ब्रीदवाक्य नाही, तर तो आमच्या अंतरात्म्याचा आवाज आहे. वारी मध्ये चालत जाणाऱ्या माऊलींच्या पायाला पडलेले फोड, त्यांच्या शरीराला झालेल्या इजा जेव्हा आमचे डॉक्टर आणि थेरेपिस्ट आपल्या स्पर्शाने आणि उपचाराने दूर करतात, तेव्हा या वारकऱ्यांच्या डोळ्यात दिसणारे समाधान म्हणजेच आम्हा सर्वांसाठी प्रत्यक्ष विठ्ठलाचे दर्शन आहे.
तसेच उपचारानंतर समता प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयाचे सचिव पवन सूर्यवंशी सरांच्या उपस्थितीत सदर शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.