Omkar Charitable Trust

Omkar Charitable Trust A charitable organization whose primary objectives is social well-being

23/04/2026

*सुप्रभात...🙏🏻*
✍🏻 एक नारळ फोडून, पाया पडून देवाला खूश करता येईल अशी अपेक्षा ठेवू नका…
कारण देवाला ना दिखावा दिसतो, ना बाह्य बनावटपणा आवडतो. तो पाहतो ते फक्त आपल्या कर्माची शुद्धता, विचारांची प्रामाणिकता आणि मनातील नितळ भाव...!
देवाचं लक्ष लहान-मोठा, गरीब-श्रीमंत सर्वावर असते तो भेद करत नाही, त्याच्या दृष्टीने प्रत्येक जीव समान आहे...
आजच्या काळात दिखाव्याला जास्त महत्त्व दिलं जातं, पण खरी ताकद आहे ती आपल्या चांगल्या कृतीत आणि स्वच्छ मनात...
कारण मंदिरात वाकणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच आयुष्यात सरळ उभं राहणंही गरजेचं आहे. म्हणूनच देवाकडे काही मागण्याआधी आपल्या कर्माला प्रामाणिकपणे सजवा…!!
कारण देव नेहमीच आपल्या कृतींचा हिशोब ठेवतो, शब्दांचा नाही...
आपला दिवस चांगल्या विचारांनी आणि सुंदर कर्मांनी भरलेला जावो…!!!
V.J.S...
अंबज्ञ...🙏🏻

17/04/2026
14/04/2026
13/04/2026

*आपल्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...! 🎉💐🍫*
आजचा हा विशेष दिवस केवळ आपल्या जन्मदिनाचा उत्सव नसून, आपल्या विचारांची, कार्याची आणि जनतेप्रती असलेल्या निष्ठेची साक्ष देणारा आहे. आपण ज्या पद्धतीने सहकाऱ्यांना सोबत घेऊन समाजसेवा प्रेमळ स्वभावाने, प्रामाणिकपणे आणि आपल्या पदाची जबाबदारी पार पाडत आहात, ती खरंच प्रेरणादायी आहे.
एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, जसा आंबा उन्हाळा असो किंवा पावसाळा, आपला गोडवा कधीच सोडत नाही तसंच आपल्या स्वभावातील साधेपणा, माणसांवरील प्रेम, समाजसेवा आणि आपुलकी ही सदैव कायम राहो. आपल्या जवळच्या माणसांशी असलेलं नातं, जनतेशी असलेली बांधिलकी आणि आपल्या कार्यातील प्रामाणिकपणा हीच आपल्या यशाची खरी ताकद आहे...
आपल्या आई-वडिलांनी दिलेले उत्तम संस्कार, आपल्या कर्तृत्वाने आणि निष्ठेने अधिक उजळून निघोत. आपण असेच प्रामाणिकपणे, धैर्याने आणि दूरदृष्टीने कार्य करत राहावे, येत्या काळात आपण अधिक मोठ्या यशाच्या शिखरावर पोहोचाल, याची खात्री आहे...!
आपल्या आयुष्यात कधीच कुठलीही कमतरता भासू नये, उत्तम आरोग्य, भरभराट आणि जनसेवेची अखंड प्रेरणा लाभो, हीच मनापासून सद्गुरू चरणी प्रार्थना...🙏🏻
पुन्हा एकदा आमच्या परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप छान अनिरुद्ध शुभेच्छा...!!
V.J.S...
अंबज्ञ...🙏🏻
💐🚩🎊🍫🎉🎂🎁❤️

*स्वरप्रवास थांबला, पण आठवणी अमर…!!*आशाताई, तुमचा मधुर, जिव्हाळ्याचा आणि हृदयाला स्पर्श करणारा आवाज आजही आमच्या मनाच्या ...
12/04/2026

*स्वरप्रवास थांबला, पण आठवणी अमर…!!*
आशाताई, तुमचा मधुर, जिव्हाळ्याचा आणि हृदयाला स्पर्श करणारा आवाज आजही आमच्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात गुंजत आहे. तुमच्या स्वरांनी अनेकांच्या आयुष्याला अर्थ दिला, दुःखात दिलासा दिला आणि आनंदाच्या क्षणांना अधिक सुंदर बनवले...
तुमचा प्रत्येक सूर, प्रत्येक गाणं हे आमच्यासाठी केवळ संगीत नव्हतं, तर एक जिवंत भावना होती… जी आजही आमच्या श्वासात दरवळत आहे. तुम्ही आमच्यात नसला तरी तुमचा स्वररूपी आशीर्वाद सदैव आमच्यासोबत राहील.
ईश्वर चरणी प्रार्थना करतो की, तुमच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो…
आमच्या हृदयातून निघालेली ही भावपूर्ण श्रद्धांजली...🙏🏻
*भावपूर्ण श्रद्धांजली...🙏🏻💐*

04/04/2026

नमस्कार...🙏🏻
परमेश्वराने आपल्याला दिलेलं हे सुंदर जीवन, निरोगी शरीर, विचार करण्याची बुद्धी आणि प्रेमाने जगण्याचं मन ही केवळ देणगी नाही, तर आपल्यावर सोपवलेली एक मोठी जबाबदारी आहे. या अनमोल देणगीबद्दल परमेश्वराचे आभार मानायला शब्द अपुरे पडतात, पण आपली कृती मात्र आपल्या कृतज्ञतेचं खरं प्रतिबिंब ठरते...
आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगात आपण अनेकदा इतरांच्या चुका शोधण्यात व्यस्त होतो, पण स्वतःकडे डोकावून पाहायला विसरतो. खरं तर हीच वेळ आहे थोडं थांबण्याची… स्वतःला विचारण्याची आपण समाजासाठी नेमकं काय करतो आहोत?
कारण बदलाची सुरुवात नेहमी स्वतःपासूनच होते… पण तसे होते का...?
जर आपण टीका, निंदा, तिरस्कार आणि दोषारोप यांना बाजूला ठेवून सहकार्य, समजूतदारपणा आणि सकारात्मकतेची बीजं पेरली, तर समाज नक्कीच अधिक सुंदर, सक्षम आणि सशक्त बनेल. संघटना, मंडळ किंवा घर यांची खरी ओळख नावाने नाही, तर त्या ठिकाणी रुजलेल्या विचारांनी आणि कृतींनी निर्माण होते...
निसर्गाचा साधा नियम आहे आपण जे पेरतो, तेच उगवतं…!!
चला, आज एक ठाम संकल्प करूया स्वतःमध्ये चांगला बदल घडवण्याचा,
इतरांना आधार देण्याचा,
आणि समाजाच्या उन्नतीसाठी प्रामाणिकपणे छोटा का असेना पण हातभार लावण्याचा, कारण शेवटी, आपली ओळख आपल्या शब्दांनी नाही, तर आपल्या कृतींनी घडते… आणि जीवनात, समाजकारणात व राजकारणातही चांगल्या कृतींचीच खरी गरज असते...
चांगलं विचाराल, चांगलं कराल, तर आयुष्य तुम्हाला चांगलंच परत देईल. हे १०८% सत्य आहे...
एक महत्त्वाचा विचार…
संघटना असो, मंडळ असो किंवा घर आपण सर्वजण माणसं आहोत. जर आपले विचार चांगले असतील, पण आपण ते व्यक्तच केले नाहीत, तर त्या ठिकाणी योग्य दिशा कशी मिळणार?
प्रत्येकाने पुढे येणं गरजेचं आहे… आपले विचार मांडणं, एकमेकांना साथ देणं आणि एकत्र काम करणं याशिवाय कोणतीही संघटना मोठी होत नाही.
एकट्याने कोणीही मोठं होत नाही… एकत्र येऊनच उंची गाठता येते. आणि मनाला भिडणारी एक खरी गोष्ट जो माणूस सगळ्यांना सांभाळतो, सगळ्यांची काळजी घेतो, सगळ्यांसाठी उभा राहतो…
तोच कधी एकटा पडतो…
आणि त्या क्षणी त्यालाही वाटतं मलाही कोणी समजून घ्यावं, मला सावरावं…
आणि त्या कठीण काळात जो त्याच्या सोबत खंबीरपणे उभा राहतो,
त्याच्या वेदना न बोलताही ओळखतो…
तोच माणूस त्याच्या आयुष्यातील सर्वात खास, सर्वात हक्काचा आणि खरा ठरतो… ❤️
म्हणूनच चला माणुसकी जपूया… एकमेकांना समजून घेऊया… आणि आपल्या कृतीतूनच जग अधिक सुंदर, समृद्ध आणि सशक्त बनवूया…🙏🏻
अंबज्ञ...
आपलाच,
V.J.S...
जागरूक नागरिक समूह,
विटावा-कळवा

🙏🏻🙏🏻🙏🏻
30/03/2026

🙏🏻🙏🏻🙏🏻

*गुढीसोबत उंच भरारी घ्या...**संपूर्ण वर्षभर तेजस्वी राहा...**गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...!!* 🚩🙏🏻🌹🪷🌹🙏🏻🚩
18/03/2026

*गुढीसोबत उंच भरारी घ्या...*
*संपूर्ण वर्षभर तेजस्वी राहा...*
*गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...!!*

🚩🙏🏻🌹🪷🌹🙏🏻🚩

🙏🏻🙏🏻🙏🏻
23/02/2026

🙏🏻🙏🏻🙏🏻

🙏🏻🌸🌸🪷🌸🌸🙏🏻
15/02/2026

🙏🏻🌸🌸🪷🌸🌸🙏🏻

Address

Office No 1 Moru Patil Niwas Near Kunkai Temple Thane Belapur Road Vitawa Kalwa
Thane
400605

Telephone

+919920836311

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Omkar Charitable Trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share