21/08/2026
⭐ जिल्हा परिषद शाळा चिरड येथे क्रीडा व शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम उत्साहात संपन्न
दिनांक : १९ ऑगस्ट २०२६ ( Donation drive 4)
मंगला‑बापू चॅरिटेबल ट्रस्ट (चिरड, अंबरनाथ) आणि Logisteed India Pvt. Ltd. यांच्या संयुक्त विद्यमाने, CSR उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा चिरड (केंद्र करवले, ता. अंबरनाथ, जि. ठाणे) येथे क्रीडा व सहशालेय उपक्रम साहित्याचे यशस्वी वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीत, नृत्य आणि अनोख्या राष्ट्रवंदनेच्या सादरीकरणाने मान्यवरांचे स्वागत करून झाली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि अभ्यासासोबतच खेळाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी कॅरम बोर्ड, बुद्धिबळ संच, बॅडमिंटन सेट्स, व्हॉलीबॉल आणि फुटबॉल यांसारख्या विविध खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले.
⭐ मान्यवरांचे मार्गदर्शन
मंगला‑बापू चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका सौ. अर्चना काठवले‑धुळप आणि Logisteed India Pvt. Ltd. चे प्रतिनिधी श्री. निखिल होळे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना शिक्षणासोबतच क्रीडा व अवांतर उपक्रमांचे जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भविष्यातही एकत्र काम करण्याचा निर्धार लॉजिस्टीड कंपनीतर्फे व्यक्त करण्यात आला.
उपस्थित मान्यवर श्री. तानाजी सहाने (अध्यक्ष, श्री ज्ञानेश्वर माऊली ग्रंथालय) यांनी स्वतः शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत खेळाचे महत्त्व पटवून दिले. तसेच स्पर्धा परीक्षा व शासकीय परीक्षांविषयी मोलाचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची व यशाची नवी उमेद निर्माण केली.
⭐ कार्यक्रमाचे मार्गदर्शन
• सौ. छाया पुंजाराम शिंदे (मुख्याध्यापिका)
• श्री. मनोहर जगन्नाथ कडाळी (शिक्षक)
• पौर्णिमा राणे (स्वयंसेवक)
• सायली गणेश बडेकर (शाळा व्यवस्था अध्यक्ष)
• श्रावणी बडेकर (उपाध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
⭐ मंगला‑बापू चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे उपस्थित
• सौ. अर्चना काठवले‑धुळप (संस्थापिका)
• श्री. नयन सीताराम काठवले (प्रतिनिधी)
• सौ. अलका दिलीप काठवले (प्रतिनिधी)
⭐ उपस्थित मान्यवर
• श्री. माधव सूर्यवंशी (शाखा व्यवस्थापक, युनियन बँक ऑफ इंडिया)
• श्री. तानाजी सहाने (अध्यक्ष, श्री ज्ञानेश्वर माऊली ग्रंथालय व शिक्षक)
• सौ. ज्योती सहाने (ग्रंथपाल, श्री ज्ञानेश्वर माऊली ग्रंथालय)
⭐ Logisteed India Pvt. Ltd. टीम
• श्री. जे. श्याम सुंदर (संचालक)
• श्री. कुमारन आर. (संचालक)
• श्री. संजय करकेरा (सहाय्यक उपाध्यक्ष – AVP)
• श्री. अवधेश शर्मा (राष्ट्रीय व्यवस्थापक – ऑपरेशन्स)
• श्री. मुथुकुमार एन. (महाव्यवस्थापक – ऑपरेशन्स)
• श्री. प्रदीप वारीयर (वरिष्ठ महाव्यवस्थापक – मानव संसाधन)
• श्री. निखिल होळे (MPLC तळोजा प्रभारी)
• श्री. टेक थापा (प्रकल्प प्रभारी)
• श्री. संजय पुजारे (प्रकल्प प्रभारी)
• श्री. स्वप्नील चव्हाण (प्रकल्प प्रभारी)
• श्री. अनिकेत गोरे (प्रकल्प प्रभारी)
• श्री. विनायक भोईर (MPLC तळोजा – मानव संसाधन)
• श्री. मंदार पाटील (MPLC तळोजा – प्रशासन)
• श्री. कुणाल खामकर (MPLC तळोजा – HSSE)
⭐ सौजन्य
मंगला‑बापू चॅरिटेबल ट्रस्ट (रजि. ई‑१२०२६/ठाणे), चिरड, अंबरनाथ
सर्व देणगीदारांचे आम्ही सदैव ऋणी आहोत.
आपले सहकार्य असेच सदैव पाठीशी राहो हीच सदिच्छा! 🙏