28/08/2026
यंदाच्या ‘साभार राखी’ उपक्रमातून सिग्नल शाळा, चेंबूर येथील मुलांनी टाकाऊ वस्तूंपासून पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या. या राख्या त्यांनी शाळेतील मदतनीस सहकाऱ्यांना आणि आपल्या सवंगड्यांना बांधून, त्यांच्या रोजच्या योगदानाबद्दल आदर आणि आपुलकी व्यक्त केली.
त्यानंतर पारंपरिक कोळी वेशभूषेत नारळी पौर्णिमा साजरी करत मुलांनी या सणामागची परंपरा आणि महत्त्वही जाणून घेतले.
कारण संस्कार फक्त सांगून रुजत नाहीत...ते कृतीतून आणि अनुभवातून मनात उतरतात.
साभार राखी - नात्यांपलीकडे कृतज्ञता जपणारा धागा.