25/03/2024
मी सचिन कुलकर्णी , विष्णु नगर ,नौपाडा येथे २०२१ साली रहायला आलो. मूळचे आम्ही दादरचे परंतु आता ठाण्यात स्थायिक झालो. त्यानंतर मी माझ्या कामानिमित्त ऑस्ट्रेलिया येथे आलो आणि आता इथेच स्थिरावलोय. माझे आई आणि बाबा ठाण्यात रहातात. त्यांचे वय आता ७१ आणि ७८ असे आहे. कोव्हिड काळात ठाण्यात तसे आमचे कुणीच ओळखीचे नसताना वुई आर फॉर यू चे एक पत्रक बघितले आणि मी किरण नाकती यांना बाबांना कोव्हिड झाल्यामुळे कॉल केला. त्यांनी बाबांना रुग्णालयात दाखल करण्यापासून ते तिथून सुट्टी मिळेपर्यंत सर्व प्रकारे मदत केली. मग काय आमच्या कुटुंबीयांचे आणि त्यांचे एक नाते तयार झाले. आणि आज तर त्यांनी केलेली मदत मी विसरुच शकणार नाही. माझ्या बाबांना मागच्या आठवड्यात ब्रेन स्ट्रोक आला. आज त्यांची हिंदुजा रुग्णालयात शस्त्रक्रिया करायची होती. आठ दिवसांपूर्वी मी इथून व्हॉटसॲप कॉल केला. आणि सर्व परिस्थिती सांगितली. ते म्हणाले मी शस्त्रक्रिया होईपर्यंत त्यांच्यासोबत थांबेन. नेमकी शस्त्रक्रिया करण्याची तारीख रंगपंचमी म्हणजे आजच्या दिवशीची मिळाली. किरण नाकती यांनी आधीच होकार दिल्याने आज ते स्वतः सकाळी आठ वाजता हॉस्पिटलमध्ये पोहोचले.दुपारी दोन वाजता शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्याचे मला त्यांनी सांगितले. त्यांच्या आजच्या या त्यांनी केलेल्या मदतीसाठी माझ्याकडे अजिबात शब्दच नाहीत.
एकतर आज रंगपंचमी आणि मी बघितलं की ते दरवर्षी त्यांच्याइथे रंगपंचमीचा कार्यक्रम विभागातील नागरिकांसाठी करतात. त्याचसोबत मुख्यमंत्र्यांचे ते जवळचे सहकारी असल्याने ते तिथे सुद्धा नेहमी जातात. हे सर्व बाजूला सारून आज मी परदेशात असताना एक मुलगा म्हणून माझ्या बाबांसाठी त्यांनी आजचा दिवस देणं हे मला कायमस्वरूपी त्यांच्या ऋणात रहण्यासारखेच आहे. Thanks किरण दादा. आजही तुमच्या सारखी समाजाची सेवा करणारी व्यक्तिमत्व आहेत म्हणूनच आमच्या सारख्या अनेकांना त्याचा आधार मिळतो. मी हि प्रतिक्रिया मुद्दाम लिहून किरण दादांना पाठवतोय.जेणेकरून माझ्यासारख्या अनेकांना हे समजायला हवं.दादा ,आपण प्लिज शेअर करा.
- सचिन कुलकर्णी