07/06/2026
*बा प्रतिष्ठानतर्फे आयुष्मान भारत कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद*
ठाणे पूर्व येथील आनंदनगर, आयसीआयसीआय एटीएम समोर असलेल्या बा प्रतिष्ठान कार्यालयात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आयुष्मान कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरास परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये १०० हून अधिक लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. पात्र नागरिकांना आयुष्मान भारत योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच आयुष्मान कार्ड तयार करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली.
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी ₹५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य संरक्षण मिळते. या योजनेमुळे विविध गंभीर आजारांवरील उपचार, शस्त्रक्रिया, रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च आणि इतर वैद्यकीय सेवांचा लाभ शासनामार्फत मिळू शकतो. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळत आहे.
या उपक्रमामुळे अनेक नागरिकांना शासनाच्या आरोग्यविषयक योजनांचा लाभ मिळविण्यास मदत झाली. शिबिर यशस्वी करण्यासाठी बा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
यापुढेही समाजहिताच्या विविध उपक्रमांचे आयोजन करून नागरिकांपर्यंत शासनाच्या कल्याणकारी योजना पोहोचविण्याचा संकल्प बा प्रतिष्ठानने व्यक्त केला आहे.
– बा प्रतिष्ठान
आनंदनगर, कोपरी, ठाणे (पूर्व)