Shivaji Shelar Memorial Foundation

Shivaji Shelar Memorial Foundation Established in honor of Shivaji Shelar, our foundation strives to embody his values of compassion, service, and community development.

SHIVAJI SHELAR MEMORIAL FOUNDATION
Current Project: Lead Up International Preschool, Talegaon Dabhade
Location: Talegaon Dabhade - Pune
Broader Vision (summarized): Social welfare, education, healthcare, community development, etc. Welcome to the Shivaji Shelar Memorial Foundation, a dedicated non-profit organization committed to uplifting communities through education, empowerment, and social we

lfare. Our Mission:
We aim to create sustainable change by providing educational opportunities, supporting underprivileged families, and promoting social empowerment initiatives that foster equality and growth. What We Do:
Education for All: We provide scholarships, learning resources, and mentorship programs to ensure children from underserved communities have access to quality education. Community Welfare: From organizing health camps to supporting local livelihoods, we work to improve the well-being of families in need. Women’s Empowerment: We offer vocational training and support programs to empower women, helping them achieve financial independence and confidence. Cultural Preservation: We promote cultural heritage and community pride through events and initiatives. Our Vision:
To build a stronger, more inclusive society where every individual has the opportunity to thrive, regardless of their background. Join us in our journey to make a lasting impact! Connect with us to learn more, volunteer, or contribute to our initiatives. Together, we can create a brighter future for all. Follow us for updates on our projects, events, and ways to get involved!

🌹🕊️ **शिवबा... आज तुमची पुण्यतिथी** 🕊️🌹महाराज,  तुम्ही गेला ३४७ वर्षे झाले... पण आजही तुमची आठवण डोळ्यात अश्रू आणते.  ज्...
03/04/2026

🌹🕊️ **शिवबा... आज तुमची पुण्यतिथी** 🕊️🌹

महाराज,
तुम्ही गेला ३४७ वर्षे झाले... पण आजही तुमची आठवण डोळ्यात अश्रू आणते.

ज्या हाताने तलवार चालवली, त्या हाताने मराठी माणसाला स्वाभिमान शिकवला.
ज्या स्वप्नाने हिंदवी स्वराज्य उभारले, ते स्वप्न आजही लाखो छातींमध्ये जिवंत आहे.

महाराज, तुम्ही फक्त राजे नव्हते...
तुम्ही आई शिवाईंचे लाडके, मातृभूमीचे रक्षक, धर्माचे रक्षक आणि हर हर मराठ्यांचे प्रेरणास्थान होतात.

आज तुमच्या समाधीवर फुले वाहताना मनात एकच प्रार्थना आहे —
"हे शिवबा... आम्हाला तुमच्यासारखे धैर्य, तुमच्यासारखी दूरदृष्टी आणि तुमच्यासारखी मातृभूमीप्रती निष्ठा दे."

**शिवाजी महाराज की जय!**
**हर हर महादेव!**
**जय भवानी, जय शिवाजी!** 🙏

आज तुम्हाला मनापासून वंदन...
तुम्ही कधीच गेला नाही, तुम्ही आमच्या रक्तात वाहता आहात. ❤️

#शिवाजीमहाराज #पुण्यतिथी #शिवराय #हरहरमहादेव #जयभवानीजयशिवाजी

🙏 भावपूर्ण आदरांजली 🙏आज शिवाजी शेलार मेमोरियल फौंडेशनचे प्रेरणास्त्रोत, स्वर्गीय शिवाजी शेलार यांच्या पुण्यतिथीनिमित्त त...
20/03/2026

🙏 भावपूर्ण आदरांजली 🙏

आज शिवाजी शेलार मेमोरियल फौंडेशनचे प्रेरणास्त्रोत, स्वर्गीय शिवाजी शेलार यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम…

त्यांचे कर्तृत्व, विचार आणि समाजसेवेची प्रेरणा आमच्यासाठी आजही दीपस्तंभासारखी मार्गदर्शक आहे. त्यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा, कष्ट आणि समाजासाठी काहीतरी करण्याचा ध्यास आम्हाला सतत प्रेरित करत राहील.

त्यांच्या स्मृती सदैव आमच्या हृदयात जिवंत राहतील… 💐

“आपल्या कार्यातूनच माणूस अमर होतो.”

🙏 शतशः नमन… 🙏

✨ KIDS FASHION SHOW, EXHIBITION & FUNFAIR – यशस्वी आणि अविस्मरणीय सोहळा! ✨काल दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी शिवाजी शेलार म...
26/12/2025

✨ KIDS FASHION SHOW, EXHIBITION & FUNFAIR – यशस्वी आणि अविस्मरणीय सोहळा! ✨

काल दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी शिवाजी शेलार मेमोरियल फौंडेशन (SSM Foundation) व MMEE बिझिनेस ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने KIDS FASHION SHOW, EXHIBITION & FUNFAIR या भव्य कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

हा Exhibition आणि Funfair कार्यक्रम Shivaji Shelar Memorial Foundation तर्फे लिपिका अविनाश शेलार, मीरा बेनिसिउर (MMEE Business Group) व मृगया दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.

या कार्यक्रमास खालील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली—
🔹 मा. श्री. सिद्धार्थ दाभाडे सर – नगरसेवक, तळेगाव दाभाडे
🔹 मा. श्री. रमेश साहेब राव चौधरी सर – मराठी चित्रपट दिग्दर्शक
🔹 श्री. जगदीश दत्ता जाधव सर (JJ भाऊ) – प्रसिद्ध रील स्टार
🔹 श्री. निखिल महेंद्र जाधव सर – CineDrom प्रा. लि., मुंबई (प्रोड्युसर व प्रोफेशनल हेड)
🔹 श्री. लवेश सुभे सर – Chief Executive Officer, सिनेδροम प्रोडक्शन
🔹 श्री. भूपेंद्र सर – मास्टर शेफ व फूड एक्स्पर्ट

चिमुकल्या कलाकारांच्या आत्मविश्वासपूर्ण रॅम्प वॉक, रंगतदार फॅशन शो, तसेच Exhibition व Funfair मधील उत्साही सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत आनंददायी व प्रेरणादायी ठरला.

सर्व मान्यवर, मार्गदर्शक, आयोजक, सहभागी विद्यार्थी, पालक व सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार! 🙏✨

शिवाजी शेलार मेमोरियल फाउंडेशन आणि एमएमईई बिझनेस ग्रुप आयोजित🎄 लहान मुलांचा फॅशन शो आणि प्रदर्शन🎄 वयोगट: ३ ते १५ वर्षे✨ ...
15/12/2025

शिवाजी शेलार मेमोरियल फाउंडेशन आणि एमएमईई बिझनेस ग्रुप आयोजित
🎄 लहान मुलांचा फॅशन शो आणि प्रदर्शन
🎄 वयोगट: ३ ते १५ वर्षे
✨ धमाल • खाद्यपदार्थ • फॅशन • खेळ ✨
🌟 ✨ विशेष आकर्षण ✨
🎬 चित्रपट कलाकार • दिग्दर्शक • निर्माते
कार्यक्रमात आणि प्रदर्शनात खास उपस्थित राहणार! ⭐
त्यांना भेटण्याची सुवर्णसंधी! ✨
👶🧒 लहान मुलांचा रॅम्प वॉक शो
क्यूट आणि स्टायलिश मुले रॅम्पवर
(नोंदणी शुल्क: ६५०/-)
🍔🍟 खाद्यपदार्थांचे स्टॉल्स:
(नोंदणी शुल्क: १०००/-)
खान्दानी स्नॅक्स • मिठाई • खास ख्रिसमस ट्रीटस् 😍
🛍️ प्रदर्शनाचे स्टॉल्स:
(नोंदणी शुल्क: ८००/-)
फॅशन • हाताने बनवलेल्या वस्तू • लहान मुलांची उत्पादने • भेटवस्तू
खरेदी + धमाल = परिपूर्ण कौटुंबिक दिवस! ✨
दिनांक: २५ डिसेंबर
⏰ वेळ: सकाळी १०.३० पासून
📍 स्थळ: तळेगाव दाभाडे नगरपरिषद,
विद्याविहार कॉलनी, लेन नं. ३,
युनिक हॉस्पिटल समोर, एका कॉम्प्लेक्स मागे
✨ लहान मुलांसाठी आणि कुटुंबासाठी एक परिपूर्ण मजेदार दिवस!
👉 ही संधी सोडू नका!
📢 जर कोणाला स्टॉलमध्ये रस असेल, तर कृपया संपर्क साधा:
मीरा: ८६००२१८२३४
लिपिका: ७८८७९१४६६८
मृगया: ९४०५७५१९६६

शिवाजी शेलार मेमोरियल फाऊंडेशन आणि MMEE बिझनेस ग्रुप आयोजित येत्या 25 डिसेंबर 2025 रोजी च्या   आणि   मध्ये आपल्या 3 ते 1...
15/12/2025

शिवाजी शेलार मेमोरियल फाऊंडेशन आणि MMEE बिझनेस ग्रुप आयोजित येत्या 25 डिसेंबर 2025 रोजी च्या आणि मध्ये आपल्या 3 ते 15 वर्ष वयोगटातील मुला मुलींची नोंद करा... आणि सहभागी व्हा...

नाव नोंदणी, स्पॉन्सरशिप साठी संपर्क करा....

नोंदणी करण्याची अंतिम मुदत:- 23 डिसेंबर 2025

#वयोगट :- 3 ते 15 वर्ष

स्थळ :- तळेगाव दाभाडे नगरपरिषद हॉल, विद्याविहार कॉलनी, लेन नंबर 3, युनिक हॉस्पिटल समोर, तळेगाव दाभाडे..

वेळ आणि तारीख :- 25 डिसेंबर 2025, सकाळी 10:30 पासून...

8600218234/ 7887914668/ 9405751966

🌟 SS मेमोरियल फाउंडेशन & MMEE बिझनेस ग्रुप प्रस्तुत 🌟🎉 Kids Fashion Show & Exhibition 2025 🎉📅 दिनांक : 25 डिसेंबर 2025👗✨...
12/12/2025

🌟 SS मेमोरियल फाउंडेशन & MMEE बिझनेस ग्रुप प्रस्तुत 🌟
🎉 Kids Fashion Show & Exhibition 2025 🎉
📅 दिनांक : 25 डिसेंबर 2025

👗✨ आपल्या मुलांना मंचावर चमकण्याची सुवर्णसंधी!
या भव्य कार्यक्रमात लहान मुलांसाठी आकर्षक Ramp Walk, Fun Games, Stalls तसेच Movie Star Casting, Director आणि Producer यांच्या उपस्थितीत विशेष संधी!

👶 वयोगट : 3 ते 15 वर्षे

📍 स्थळ :
तळेगाव दाभाडे नगर परिषद हॉल
विद्या विहार कॉलनी, लेन क्र. 3, तळेगाव दाभाडे – पुणे

📞 नोंदणीसाठी संपर्क :
8600218234
7887914668
9405751966

🔴 REGISTER NOW – मर्यादित जागा!

आपल्या मुलांच्या आत्मविश्वास, प्रतिभा आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. आजच नोंदणी करा! 🌈✨



Lead Up International Preschool, Talegaon Dabhade Shivaji Shelar Memorial Foundation

*मालेगाव येथील पीडित यज्ञा हिस न्याय मिळण्यासाठी सत्यकमल कॉलनी येथे कँडल मार्च काढण्यात आला, यावेळी लहान मुले मुली व महि...
19/11/2025

*मालेगाव येथील पीडित यज्ञा हिस न्याय मिळण्यासाठी सत्यकमल कॉलनी येथे कँडल मार्च काढण्यात आला, यावेळी लहान मुले मुली व महिला शांतते मध्ये कॅन्डल मार्च आयोजन केले होते, यावेळी विशाल साहेबराव लोखंडे, प्रिया वहिनी विकी लोखंडे, गोरख भाऊ काकडे , शिवाजी शेलार मेमोरियल फाउंडेशन च्या संचालक दीपिका शेलार, शाळेचे लहान मुले व मुली व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

https://youtu.be/gTmM7P52i10?si=0XzhGuKvSHB2z02N

*ज्या नराधमाने अत्याचार केला आहे त्यास लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी व पीडित बालिकेस न्याय मिळावा ही मागणी यावेळी करण्यात आली. तसेच सर्व उपस्थित लहान मुलांना गुड व बॅड टच याविषयी माहिती देण्यात आली. अशा अत्याचारास बळी पडू नये म्हणून काय करावे याविषयी माहिती देण्यात आली.*
*कॅन्डल मार्च च्या माध्यमातून पीडित यज्ञा हीस श्रद्धांजली वाहण्यात आली.*

*व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://youtu.be/gTmM7P52i10?si=RXeJpvNFbhNOh_R_

*महत्वाच्या ताज्या घडामोडी व बातम्यांच्या आपल्यासाठी महाऑनलाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा*

मालेगाव येथील पीडित यज्ञा हिस न्याय मिळण्यासाठी सत्यकमल कॉलनी येथे कँडल मार्च काढण्यात आला, यावेळी लहान मुले मुल...

शिवाजी शेलार मेमोरियल फाऊंडेशनच्यावतीने लीड अप इंटरनॅशनल प्री-स्कूलमध्ये बालदिन उत्साहात साजराShivaji Shelar Memorial Fo...
15/11/2025

शिवाजी शेलार मेमोरियल फाऊंडेशनच्यावतीने लीड अप इंटरनॅशनल प्री-स्कूलमध्ये बालदिन उत्साहात साजरा

Shivaji Shelar Memorial Foundation शिवाजी शेलार मेमोरियल फाऊंडेशनच्या वतीने Lead Up International Preschool, Talegaon Dabhade लीड अप इंटरनॅशनल प्री-स्कूलमध्ये आज बालदिन अत्यंत उत्साह, आनंद आणि रंगतदार उपक्रमांनी सजला. मुलांच्या निरागसतेचा उत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम मुलांसाठी तसेच पालकांसाठीही संस्मरणीय ठरला.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने आणि बालदिनाच्या महत्त्वावर छोट्या परिचयाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी एकल नृत्य, भाषण, चित्रकला, कविता वाचन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. मुलांनी आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि उत्साहाने सहभाग घेतला. त्यांच्या सादरीकरणांनी वातावरण भारावून गेले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इजी इंग्लिश अकॅडमीच्या संस्थापिका सौ. रूपा अनुप आणि भूमी केक स्टुडिओच्या संस्थापिका अश्विनी पाटील यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. तसेच शाळेतील कर्मचाऱ्यांपैकी अश्विनी भट, पूनम जाधव, शुभांगी भोसले, विद्या देशमुख, नंदिनी शर्मा यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत सक्रिय सहभाग नोंदवला.

कार्यक्रमादरम्यान संस्थापिका आणि संचालिका लिपिका शेलार Lipika Avinash Shelar यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले—
“मुलांच्या डोळ्यांतील चमक आणि त्यांच्या चेहऱ्यावरील निश्छल हसू हेच आमच्या प्रत्येक उपक्रमाचे खरे बळ आहे. प्रत्येक मूल हे एक अद्भुत शक्यता घेऊन जन्माला येते. योग्य संस्कार, योग्य दिशा आणि प्रेम मिळाले तर ते भविष्य उजळवणारा प्रकाश बनते.”

तसेच त्यांनी बालदिनाचे महत्त्व प्रभावी शब्दांत मांडले.

पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. मुलांच्या प्रतिभेला मिळालेल्या या व्यासपीठाने त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास मोठी मदत झाली.

एकूणच, शिवाजी शेलार मेमोरियल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित व लीड अप इंटरनॅशनल प्री-स्कूल येथे पार पडलेला हा बालदिन उत्सव मुलांसाठी आनंद, प्रेरणा आणि शिकण्याचा सुंदर अनुभव देणारा ठरला. पुढील काळातही अशा शैक्षणिक व संस्कारवर्धक उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
#बालदिन

मावळ विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री सुनील अण्णा शेळके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... Sunil Shelke
20/10/2025

मावळ विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री सुनील अण्णा शेळके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... Sunil Shelke

नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔✨  प्रकाशाचा हा सण आपल्या जीवनात आनंद, समृद्धी आणि सकारात्मकता घेऊन येवो. नकारात्मकत...
20/10/2025

नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔✨
प्रकाशाचा हा सण आपल्या जीवनात आनंद, समृद्धी आणि सकारात्मकता घेऊन येवो. नकारात्मकता दूर करून नव्या उमेदीने पुढे जाऊया! 💫
#नरकचतुर्दशी #दिवाळी #शुभेच्छा

👐🌍 International Day of Sign Languages 🌍👐At Shivaji Shelar Memorial Foundation, we believe communication is a human righ...
23/09/2025

👐🌍 International Day of Sign Languages 🌍👐

At Shivaji Shelar Memorial Foundation, we believe communication is a human right, not a privilege. Sign language is more than just a tool — it’s a bridge of love, respect, and inclusion for the deaf and hard-of-hearing community. 💙🤟

On this International Day of Sign Languages, let’s stand together for accessibility and equal opportunities. Every small effort counts in building a world where no voice goes unheard. ✨

💝 Your support helps us continue our mission of service, empowerment, and inclusivity.
👉 Donate today and be a part of positive change.

Address

46/A3, Chandrakant Residency, Satyakamal Colony
Talegaon Dabhade
410507

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivaji Shelar Memorial Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share