Nature Conservation Circle, Solapur

Nature Conservation Circle, Solapur We define conservation as knowledge-driven actions that lead to the effective management and recovery of wildlife.

03 मार्च 2026 जागतिक वन्यजीव दिन विशेष...🐾🦌        साप्ताहिक  #लोक_उद्धार, अक्कलकोट
03/03/2026

03 मार्च 2026 जागतिक वन्यजीव दिन विशेष...🐾🦌

साप्ताहिक #लोक_उद्धार, अक्कलकोट

 #हॅलो_मेडिकल_फाउंडेशन_आयोजित_विज्ञान_जत्रा_प्रसंगी  #वन्यजीव_संवर्धन_व_पक्षीनिरीक्षण_कार्यक्रम_संपन्न_झाला.हॅलो मेडिकल ...
09/01/2026

#हॅलो_मेडिकल_फाउंडेशन_आयोजित_विज्ञान_जत्रा_प्रसंगी
#वन्यजीव_संवर्धन_व_पक्षीनिरीक्षण_कार्यक्रम_संपन्न_झाला.

हॅलो मेडिकल फौंडेशन अणदूर येथे आयोजित विज्ञान जत्रा
या प्रसंगी नेचर कॉन्झर्वेशन सर्कल सोलापूर तर्फे पक्षी निरीक्षण तसेच सर्प, पक्षी व प्राणी यांच्या संवर्धना विषयी जनजागृती पर कार्यशाळेत श्री.भरत छेडा सर उपस्थित विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण माहिती देताना...

#नेचर_कॉन्झर्वेशन_सर्कल_सोलापूर

05/11/2025



#सोलापूर #निसर्गप्रेम #पक्षीनिरीक्षण #मारुती_चितमपल्ली #५नोव्हेंबर #पक्षी_सप्ताह #2025 #सोलापूर_वन_विभाग
#सोलापूर_सामाजिक_वनीकरण_सोलापूर

🌿 भावपूर्ण श्रद्धांजली 🌿अरण्यऋषी | पद्मश्री मारुती भुजंगराव चितमपल्ली (1932 – 2025)आज वृद्धापकाळाने ९३ व्या वर्षी निसर्ग...
18/06/2025

🌿 भावपूर्ण श्रद्धांजली 🌿
अरण्यऋषी | पद्मश्री मारुती भुजंगराव चितमपल्ली (1932 – 2025)

आज वृद्धापकाळाने ९३ व्या वर्षी निसर्गासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे, महाराष्ट्राचे थोर निसर्गसेवक, लेखक, आणि ज्येष्ठ वनाधिकारी “अरण्यऋषी” पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचं दुःखद निधन झालं.

चितमपल्ली सर हे केवळ एक लेखक नव्हते, तर मराठी निसर्गलेखनाला निरीक्षण आणि शास्त्रीय अभ्यासाची पायाभूत तत्वे देणारे पहिले पुरस्कर्ते होते.

त्यांनी ‘पक्षीकोश’, ‘प्राणीकोश’, व ‘मत्स्यकोश’ या अद्वितीय कोशांद्वारे मराठी भाषेला १ लाखांहून अधिक शब्दांची समृद्ध भेट दिली.

🔹 पक्षीशास्त्र आणि वन्यजीव यांचा सखोल अभ्यास व अभ्यासपूर्ण लेखन
🔹 अरण्यातील जीवनाचे ललित लेखनात रूपांतर
🔹 शेकडो दुर्मीळ प्रजातींच्या निरीक्षणावर आधारित लेखमालिका
🔹 ‘पक्षी जाय दिगंतरा’, ‘रानवाटा’, ‘जंगलाचं देणं’, ‘चकवा चांदण’, ‘निसर्गवाचन’ ही त्यांच्या विचारसंपन्न लेखनाची उदाहरणं आहेत.

त्यांची लेखनशैली ही केवळ वैज्ञानिक नव्हती, तर ती मनाच्या गाभ्याला भिडणारी, निसर्गाशी संवाद साधणारी होती.

🔸 ३० एप्रिल २०२५ रोजी त्यांना भारत सरकारने “पद्मश्री” पुरस्काराने गौरवले, ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि निसर्गप्रेमींसाठी अभिमानाची गोष्ट होती.

🕊️ चितमपल्ली सर हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी एक चालतं बोलतं विद्यापीठ होते.
त्यांच्या जाण्याने निरीक्षण, अभ्यास, निसर्गप्रेम, भाषा व साहित्य — या सर्व क्षेत्रांत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीही भरून निघणार नाही.

त्यांचं आयुष्य हे निसर्गसेवेचा मंत्र होतं...
आणि त्यांचं साहित्य हे भविष्यातल्या पिढ्यांना निसर्गाकडे प्रेमाने पाहायला शिकवणारी चळवळ आहे.

🙏 निसर्गाच्या कुशीत शांत विश्रांती लाभो, अरण्यऋषी...
आपण आपल्या सोलापूरचा एक महान रत्न हरवलं आहे.

– Nature Conservation Circle Solapur

🦜 ५ ते १२ पक्षी सप्ताह 🦜 आनंद घ्या पक्षी निरीक्षणाचा, गमती-जमतीचा! 📍 स्थान: एकरुख तलाव. 🕕 वेळ: सकाळी 6:30 वाजता 📅 दिवस: ...
07/11/2024

🦜 ५ ते १२ पक्षी सप्ताह 🦜
आनंद घ्या पक्षी निरीक्षणाचा, गमती-जमतीचा!

📍 स्थान: एकरुख तलाव.
🕕 वेळ: सकाळी 6:30 वाजता
📅 दिवस: 9 नोव्हेंबर (शनिवार) आणि 10 नोव्हेंबर (रविवार)
प्रस्थान तुळजापूर नाका

🍵 चहा आणि नाश्ता उपलब्ध
🔍 पक्षी निरीक्षणासाठी पक्षी लपण गृहाची सोय
नोंदणी आवश्यक!
📞 संपर्क: 9325620937

#पक्षीनिरीक्षण #पक्षीसप्ताह #निसर्गप्रेम #सोलापूर #एकरुखतलाव

Address

Solapur

Telephone

+919822828374

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nature Conservation Circle, Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Nature Conservation Circle, Solapur:

Share